फेब्रुवारी १८ महाशिवरात्री- महाशिवरात्रीला कोणत्या प्रकारच्या शिवलिंगाचे पूजन करावे?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

महाशिवरात्रीला महादेवाची पूजा केली जाते शिवलिंगाला अभिषेक केला जातो. पण कोणत्या प्रकारच्या शिवलिंगाची पूजा केली असता काय फळ मिळत चला जाणून घेऊया. मित्रांनो शिवलिंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगाचे पूजा करण्याचे फळ सुद्धा वेगवेगळ्या असत.

चला तर मग बघूया कोणत्या प्रकारच्या शिवलिंगाची पूजा केल्याने काय फळ मिळत किंवा तुमची एखादी विशिष्ट समस्या असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या शिवलिंगाचे पूजन या महाशिवरात्रीला करायला हवा.

१) स्फटिकाचे शिवलिंग- स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केली असता मनोरथ सिद्धी होते.
२) चांदीचे शिवलिंग- चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास राज्यप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो.
३) सोन्याचे शिवलिंग- सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सत्य लोकांची प्राप्ती होते आणि लक्ष्मी प्राप्त होते.

४) हस्तीदंताचे शिवलिंग- हस्तीदंताचे शिवलिंगाची पूजा केल्यास सेनाप्रतित्व प्राप्त होते.
५) तांब्याच्या शिवलिंग- तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास पुष्टी आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते.
६) पितळेचे शिवलिंग- पितळाच्या शिवलिंगाची पूजा केल्या समाधान प्राप्त होत.

७) काशाचे शिवलिंग- काश्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास कीर्ती मिळते.
८) लोखंडाचे शिवलिंग- लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शत्रु नाश होतो.
९) शिश्याचे शिवलिंग- शिश्याचे शिवलिंगाची पूजा केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते.
१०) गंधाचे शिवलिंग- गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सौभाग्य मिळते.

११) त्याचबरोबर धान्यापासून किंवा पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाचे पूजन केल तर रोग नाश होतो,आरोग्याची प्राप्ती होते आणि सुख मिळते. खास करून उडद्याच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास स्त्री प्राप्ती होते अर्थात त्यांची विवाह जमत नाहीत असे लोक उद्याच्या पिठापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजन करू शकतात. त्यामुळे त्यांचा विवाह ठरेल.

१२) लोण्याच्या शिवलिंगाचे पूजन केल्यास सुखाची प्राप्ती होते.
१३) गाईच्या शेणाचे शिवलिंग- गाईच्या शेणाचे शिवलिंग केलेल्या त्याचे पूजन केल्यास रोग नाश होतो.
१४) गुळाचे शिवलिंग- गुळापासून केलेल्या शिवलिंगाची पूजन केल्यास अन्नधान्याची प्राप्ती होते. आयुष्यामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही.

मित्रांनो तर या प्रकारे तुमची जी समस्या असेल त्याप्रमाणे तुम्ही शिवलिंगाची निवड करू शकता आणि त्या महाशिवरात्रीला पूजन करू शकता. त्याचबरोबर महाशिवरात्रीची पूजा करताना काही गोष्टींची काळजी मात्र घ्या. ती म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये महादेवांना तुळस चुकूनही वाहू नका. खरंतर ती एरवी सुद्धा वाहू नये.

फक्त शाळीग्रामवर राहिलेली तुळसच शिवलिंगाला चालते. तसेच शिवतीर्थ पिऊ सुद्धा नाही. मात्र स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिण्यास काहीच हरकत नाही. शिव पूजा झाल्यावर निरंजन ओवाळून होताच लगेच वेळ न दवडता नैवेद्य दाखवावा. शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये. तसच शंकाचे पाणी सुद्धा शिवाला वाहू नये. त्याबरोबर महादेवांना अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते. का ते हे सुद्धा जाणून घ्या.

महादेवांचे पितृगन इत्यादी गण ते आपण जेव्हा शंकराचा अभिषेक वगैरे करून त्याची पूजा करत असतो त्यावेळी महादेवाच्या साळूकाच्या टोकाशी तीर्थ करता किंवा प्रसादाकरता बसलेले असतात. आपण महादेवांना नेहमीसारखी प्रदक्षिणा घातली तर त्या रुद्रगाणांना पितृगणांना सुद्धा होईल म्हणून भगवान शिव शंकरांना अर्धीच प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *