नमस्कार मित्रांनो.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव माता-पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी सृष्टीची सुरुवात झाली असा उल्लेख गरुड पुराण आणि कंदपुराणात मिळतो. पंचांगानुसार महाशिवरात्रीचा उत्सवासोबतच शनि प्रदोष आणि सर्वार्थ सिद्धी योग हाही शुभ संयोग आहे. अशा परिस्थितीत त्याचा धार्मिक महत्व आणि ज्योतिषी महत्व अधिकच वाढला आहे.
या दिवशी कालसर्प योग असणाऱ्या व्यक्तींना कायही सोपे उपाय केल्यास त्याच्या राशीतील कालसर्प योगाचे निवारण होईल असे शास्त्र सांगत. तर पाहूयात कोणत्या आहेत ते उपाय त्यांनी कालसर्प योगाचा निवारण होऊ शकत.
सर्वात आधी कालसर्प योग म्हणजे काय ते जाणून घेऊयात. ज्योतिष शास्त्रानुसार जर कुंडलीत राहू आणि केतू यांच्यामध्ये एखादा ग्रह आला तर या दोषाला कालसर्प योग असे म्हणतात. आता कालसर्प योग निवारासाठी काय करावे ते जाणून घेऊयात-
१) जर एखाद्या व्यक्तीने महाशिवरात्रीला उज्जैन मधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग किंवा नाशिक मधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग किंवा प्रयागराज तक्षकेश्वर ज्योतिर्लिंग महादेव मंदिरात रुद्राभिषेक केला तर कुंडलीच्या संबंधित या दोषापासून मुक्ती मिळते अस म्हणतात.
२) कालसर्प योग टाळण्यासाठी महाशिवरात्रीला भगवान शंकरांना चांदीच्या नागाची जोडी अर्पण करावी अस सांगण्यात येत. महाशिवरात्रीच्या दिवसापासून ३) महामृत्युंजय मंत्राचा जप दिवसातून दोन वेळा करावा असे सांगितले जाते.
४) जर तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोष तुमच्या सर्व त्रासांना कारणीभूत ठरत असेल तर या महाशिवरात्रीला त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही भगवान शंकराची साधी पूजा करावी.
५) सातव्या घरात केतू आणि आठव्या घरात राहु कालसर्प दोष व राशीतल्या विवाह मध्ये बाधा आणतात. कालसर्प योग वैवाहिक जीवनावर खूप वाईट परिणाम करतात आणि वैवाहिक जीवन कमकुवत करतात. यामुळे नात्यांमध्ये अनेक समस्या तणाव निर्माण होतो आणि वैवाहिक जीवन सुद्धा कठीण होत. अशातच महाशिवरात्रीच्या दिवशी “ओम नागकुलाय विद्महे विषदन्तय धीमही तन्नो सर्प:प्रचोद्यात” या मंत्राचा जप करावा.
६) महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दूध व जल अर्पण करून रूद्र अभिषेक करावा अस ही सांगण्यात येत. तर महाशिवरात्रीच्या उत्सवा सोबतच, शनि प्रदोष आणि सर्वाथ सिद्धी या शुभ संयोगामध्ये तुमच्या राशीतील कालसर्प योगाचे निवारण करू शकता.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.