नमस्कार मित्रांनो.
१८ फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि याच महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे.चला जाणून घेऊयात. मित्रांनो महाशिवरात्रीचे व्रत सगळे करू शकतात. त्यादिवशी उपवास करून भगवान शिवशंकरांचे ध्यान करायचे असते. सकाळी सर्व विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. नंतर व्रताचा संकल्प करावा.
संकल्प कसा करायचा हातात पाणी घेऊन ईश्वराला प्रार्थना करावी की हे जगत पतये मी महाफलदायी महाशिवरात्रीच व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो. त्याच चांगल फळ मला मिळो आणि अशी प्रार्थना करून झाली की हातातले पाणी तामनामध्ये सोडावे. त्यानंतर मात्र पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावे.
संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन फुले, बेलाची पान, धूप, दीप या सगळ्याने मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि त्यामुळे तुम्ही घरी सुद्धा घरच्या शिवलिंगाची पूजा सुद्धा करू शकता.
उपवास,पूजा आणि जागर हे या व्रताचे तीन अंग आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा करावी अस सुद्धा विधान आहे. यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन कराव. शिवतत्व आकृष्ट करणारे बेल, पांढरी फुले, रुद्राक्षाच्या माळा हे सगळ शिव पिंडीवर व्हाव.
धोत्रा, आंबा त्याच्या पत्री ही पूजेत वाहव्यात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्याने शिवलिंगाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान करावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. त्या मंत्राने अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पूजा करावी. अन्नदान करून आपल्या व्रताची समाप्ती करावी.
आता हे सगळ सगळ्यांना करण शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची विधी विद्वानपूर्वक पूजा करूच शकता आणि ही पूजा करत असताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवा. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृताने स्नान घालाव.
शिवाच्या पूजेत हळदीकुंकू वापरत नाहीत. मात्र भस्म वापरावा. शिव पुजेत पांढरे अक्षदा वापरतात. शिवाअक्षाला तांदूळ कधी कधी गहू आणि पांढरी फुले सुद्धा वाहतात. जिओ पण दिला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.