घरातला वास्तुदोष दूर होईल, महाशिवरात्रीला ‘या’ गोष्टी करा…!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या घरात किती तरी वास्तुदोष आहे अस तुम्हाला वाटतंय का? म्हणजे घरात माहित नाही पण का सतत भांडण होतात, कटकटी होतात, पैसा टिकत नाही,सततची आजारपणा ही सगळी वास्तुदोषाची लक्षण आहेत. आणि अस जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर आता महाशिवरात्री येथे आहे आणि त्या दिवशी तुम्ही काही खास उपाय अगदी साधे सोपे सरळ उपाय करू शकता.

ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल. कोणत्याही ते उपाय चला जाणून घेऊयात. माघ वद्य चतुर्दशीला वर्षातील सगळ्यात मोठी शिवरात्र साजरी केली जाते. तिलाच आपण महाशिवरात्र म्हणतो. या दिवशी मोठ्या उत्साहाने सगळीकडे महादेवाची पूजा केली जाते. खास करून या दिवशी शिव शंकरांची माता-पार्वतीसह पूजा केली जाते आणि आपण केलेली पूजा महादेवांपर्यंत पोहोचली तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

यासाठी शिवलिंगावर दूध,चंदन,भस्म, धोतऱ्याची फुले हे सगळ अर्पण केले जाते आणि याच पूजेला जोड द्यायचे आहे एका उपासनेची जेणेकरून उपासनेच्या प्रभावाने दोष मिटतील. यंदा महाशिवरात्र १८ फेब्रुवारीला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतील.

म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव शंकरांना अभिषेक करून जलधारीचे पाणी घरी आणावे.त्यानंतर ओम नमः शिवाय म्हणत ते पाणी घरभर शिंपडाव अस केल्यामुळे अगदी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि घरात आनंदाची वातावरण निर्माण होते. उपाय अगदी साधा सोपा आहे.

१) महाशिवरात्रीला सगळीकडेच महादेवाचा अभिषेक केला जातो. तुम्ही सुद्धा अशा एखाद्या मंदिरात जा. अभिषेकाचे पाणी थोडे घरी आणा आणि घरामध्ये ते शिंपडा किंवा मंदिरात जाण शक्य नसेल तर तुम्ही घरी अभिषेक करू शकता आणि त्याचही पाणी तुम्ही घरात शिंपडू शकता.

एकाच घरात कलह, रोगराई किंवा अशा इतरही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करण शुभ असत. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते. त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र,महारुद्र अन्य कोणताही अनुष्ठान या दिवशी केले तर ते निश्चित फलदायी ठरते.

२) घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावा. तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुसत्याच लावलेल्या रोपा जवळ तुपाचा दिवा लावा अस केल्याने सुद्धा घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो. नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावा. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकीय आणि गणपती बाप्पा यांचे चित्र घरात लावल्याने घरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण होते. तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचारही शुद्ध होतात. भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श मानला जातो.

त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जगण्याची प्रेरणा करते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान श्री शंकरांना बेलपत्र नक्की वाहा. रुद्राभिषेक चालू असताना म्हणून ओम नमः शिवायचा जप करत राहा आणि हा जप करत भगवान शिव शंकरांना बेलपत्र वाहा. त्यामुळे आपल्या मनात असलेले नकारात्मक विचार सुद्धा दूर होतील.

शिवरात्रीच्या दिवशी महादेवांना दहीभाताचा नैवेद्य दाखवा. तसंच एखाद्या गरजवंताला पोटभर अन्न खाऊ घाला. त्यामुळे सुद्धा वास्तु पिडा कमी होते. मंडळी येत्या महाशिवरात्रीला यातला कुठलाही एक उपाय करू बघा. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा भोलेनाथ नक्कीच दूर करतील.ओम नमः शिवाय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *