११ फेब्रुवारी २०२३ औदुंबर पंचमी उंबराचा एक उपाय करा पैशाची समस्या लगेच सुटेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो काही झाडांमध्ये फक्त औषधी गुणधर्म असतात असे काही नाही. तर दैवी गुणधर्म सुद्धा असतात. त्यात झाडांपैकी एक झाड आहे उंबराच झाड त्यालाच आपण औदुंबर असे म्हणतो. आता येत्या ११ फेब्रुवारीला आहे. औदुंबर पंचमी आणि त्यानिमित्ताने आपण औदुंबराच्या झाडाचे अर्थात उंबराच्या झाडाचे काही उपाय केले तर आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली दिसून येईल. कोणत्या आहेत ते उपाय चला जाणून घेऊयात.

भगवान श्रीहरी विष्णूनी नरसिंह अवतारात हिरण्य कश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला. त्या राक्षसाशी झालेल्या लढाईत भगवान नरसिंहना जखमा झाल्या त्यांच्या नाखांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांनी आपली नख उंबराच्या खोडात खूपसुन विषबाधेचा समन केल. माता लक्ष्मीने उंबराची फळ वाटून त्याचा लेप नरसिंह भगवानाच्या जखमांना लावला‌. मग त्या जखमांमधून होणारा दाह थांबला.

अशी पौराणिक कथा आपण ऐकली असेल आणि ही कथा उंबराच्या झाडाचे महत्व स्पष्ट करते.ज्योतिष शास्त्रानुसार सुद्धा या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाची आहे. जो शुक्र ग्रह आपल्याला धन वैभव देतो आणि हाच शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपण करू शकतो. कारण शुक्र बलवान झाला तर आपली आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत होईल.

मित्रांनो अस मानल जात की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो. त्याचबरोबर पैसेशाशी संबंधित समस्या ही दूर होतात. आता तुमच्या घराच्या आसपास कुठे उंबराच झाड नसेल आणि तुम्हाला रोज पाणी घालायला जमत नसेल तर कमीत कमी येत्या औदुंबर पंचमीला तरी उंबराच झाड शोधा आणि त्याला पाणी घाला.

त्या झाडाखाली एक छोटासा दिवा लावा. वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐशु आरामाचा ग्रह आहे. असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला दोन आणि ऐश्वर्याची कधीही कमी भासत नाही पण त्यांच्या कुंडलीत शुक्रच कुमकुवत असतो दारिद्र्य त्यांची पाठ कधी सोडत नाही. हार्दिक समस्या आणि तंगी कायम राहते.

आणि म्हणूनच या शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळाव म्हणून उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवाना मध्ये समिधा म्हणून अर्पण करतात.”ओम शम शुक्राय नमः”या मंत्राचा जप करत उंबराच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र बलवान होतो. दत्तकृपे साठी सुद्धा या झाडाची पूजा नक्की करावी.

मित्रांनो आता बघूया समृद्धीसाठी काय उपाय करता येईल. शक्य असल्यास रोज नाहीतर तर गुरुवारी किंवा कमीत कमी येत्या औदुंबर पंचमीला तरी मी औदुंबराला पाणी घाला.११ प्रदक्षिणा घाला. या झाडाखाली बसून,”अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त”या मंत्राचा जप करा. घरात सुख शांती कायम राहते. ज्योतिष शास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन अथवा संपत्ती संबंधित काही वाद असतील समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता.

कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घराच्या कुंडीत टाका. आता जर काही मानसिक त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही उंबराच्या झाडाचा उपाय करू शकता रोज सकाळी अर्धा तास उंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा‌ महिन्याभरात तुम्हाला स्वास्थ्य सुधारत असल्याचे दिसून येईल. त्यात मात्र सातत्य ठेवायला हव.

एक दिवस खडा एक दिवस केल एक दिवस नाही केल अस नाही चालणार. उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो. दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने याचा सानिध्य सर्वार्थाने चांगला आहे. तर मित्रांनो येत्या औदुंबर पंचमीला यातला एक तरी उपाय नक्कीच करून बघा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *