१८ फेब्रुवारी २०२३ महाशिवरात्र, शनी प्रदोष एकाच दिवशी! कशी करावी पूजा?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

यंदा १८फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि त्याच दिवशी शनी प्रदोष आहे शिव आणि शनी कृपा प्राप्तीसाठी या दिवशी काही विशेष गोष्टी तुम्ही करू शकता चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी नक्की काय करायचं आहे पूजा कशी करायची आहे सगळे सविस्तर.

दरवर्षी माघ कृष्ण त्रयोदशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते यंदा १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे आणि या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती चा विवाह झाला होता. दर महिन्यातील त्र योदशी स्थिती ही प्रदोष व्रत साठी ओळखली जाते. ती ज्या वारी येते त्या वारानुसार प्रदोष व्रत ठरते यावेळेस शनिवारी आल्यामुळे शनिवारी प्रदोष असणार आहे आणि त्याच दिवशी महाशिवरात्र देखील आलेली आहे.

या दुर्मिळ योगामुळे ज्या व्यक्ती प्रदोष व्रताचे पालन करेल आणि महाशिवरात्रीचा उपवास करेल तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे म्हटले जाते. यंदाच्या वर्षी माघ वैद्य चतुर्दशी प्रारंभ १८ फेब्रुवारी २०२३ रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी होईल आणि माघ वद्य चतुर्दशीची होईल १९फेब्रुवारी २०२३ ला सायंकाळी ४ वाजून १९ मिनिटांनी या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आलेले आहेत.

एक म्हणजे शनी प्रदोष दुसरा म्हणजे सर्वातसिद्धी योग साडेसातीच्या जातकासाठी शनी प्रदोष महत्त्वाचा आहे आणि धनलाभ होण्याच्या दृष्टीने भाविकांसाठी सर्वात सिद्धी योग विशेष फलदायी आणि शिवकृपा प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा महाशिवरात्र महत्त्वाची. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होत आणि या काळाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव शंकरांना पंचामृताने अभिषेक करावा ज्यामध्ये दही दूध तूप मध साखर यांचा समावेश असेल.

त्यानंतर शिवलिंगावर चंदन किंवा भस्म लावावा व त्या शिवलिंगाची विधिवत पूजा करावी ही पूजा करत असताना बेलपत्र धतुरा जायफळ सुपारी ऊस इत्यादी पत्री भगवान शिवाला अर्पण कराव्यात . पूजा मांडून झाल्यावर भगवान शिवशंकरांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि हो महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

मंत्र याप्रमाणे ( ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम पूर्वा रुख्मे बंधनाय मृत्युमक्षियम अमृता) महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात यश प्राप्त होत. तुम्हाला जर महाशिवरात्रीच्या वेळी १०८ वेळा या मंत्राचा जप करायला जमलं तर निश्चितच करा त्याचबरोबर भगवान शिवांचा मूळ मंत्र तर आहेच (ओम नमः शिवाय) हा भगवान शिवाचा मूळ मंत्र आहे.

जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुमच्या आयुष्यात कधी ही कधीही कोणतीही समस्या येत नाही. आणि सगळी नकारात्मकता दूर होते महाशिवरात्रीच्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करा उपासना करा भगवान शिवांची मनोभावे भक्ती पूर्ण अंतकरणाने पूजा करा निश्चितच भोलेनाथांची कृपा तुमच्यावर होईल. ओम नमः शिवाय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *