१८ फेब्रुवारी २०२३ महाशिवरात्री या ६ राशीवर शिवकृपा आता लवकरच या राशींचे भाग्य चमकणार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो यंदा १८ फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री. शिवभक्तांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. पण ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा यंदाची महाशिवरात्र खास आहे विशेष आहे. कारण यंदाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी असे काही योग जुळून आले आहेत. ज्यामुळे सहा राशींची नशीब चमकणार आहे अस म्हणायला हरकत नाही. अहो कोणाला नोकरी व्यवसायात यश तर कोणाच्या वाट्याला आर्थिक लाभ अस सगळ घडणार आहे.

पण कोणत्या आहेत त्या सहा राशी चला जाणून घेऊयात.
मित्रांनो यंदाच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे या दिवशी अनेक प्रकारची दुर्मिळ तर असाच अद्भुत योग जुळून येत असल्याची सांगितले जाते. एक म्हणजे शनी प्रदोष आणि दुसरी म्हणजे सर्वार्थसिध्दी योग आता वळूया त्या सहा राशींकडे.

१) मेष रास- ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशींच्या लोकांसाठी महाशिवरात्री हा उत्सव खूपच छान असणार आहे. महादेवाच्या कृपेने प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहील. महाशिवरात्रीचा काळ उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. व्यवसाय संबंधित लोकांसाठी नव्या संधी चालू येतील.

२) वृषभ रास- ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांना महाशिवरात्र नवनवीन संधी घेऊन येईल. या काळात नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामेही मार्गी लागतील. भगवान शंकराच्या कृपेने संपत्तीत वाढ होईल. व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणुकीचा विचार करताय का अहो मग हा काळ अनुकूल आहे. जोडीदाराचे सहकार्य सुद्धा मिळणार आहे.

३) मिथुन रास- मिथुन राशीसाठी महाशिवरात्रीचा काळ विशेष ठरणार आहे. त्यांचा भाग्य उजळणार आहे असे म्हणायला हरकत नाही. महादेवाच्या कृपेने तुम्हाला जुन्या आजारापासून मुक्ती मिळू शकते. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. त्याचबरोबर नोकरदार लोकांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा व्यवसाय विस्ताराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नवे मित्र जोडले जातील यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

४) तुळ रास- ज्योतिष शास्त्रानुसार महारशिवरात्रीपासून तुळ राशीसाठी चांगले दिवस सुरू होतील. तूळ राशीच्या चौथ्या घरात हा योग तयार होणार आहे. हे स्थान भौतिक सुखाचा आणि मातृ सुखाचा आहे. अशा काळात या स्थितीमध्ये तुमच्या सांसारिक सुखामध्ये वाढ होईल. बँक बॅलन्स वाढेल. भगवान शंकराच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतील. जोडीदाराची सुद्धा तुम्हाला उत्तम साथ मिळेल. तुमच्या क्षेत्रामध्ये भरघोस प्रगती बघायला मिळेल.

५) धनु रास- आता धनु राशिंची नुसतीच साडेसाती संपलेली आहे. आणि त्यामुळेच महाशिवरात्रीच्या या काळामध्ये सर्वार्थाने धनु राशीची लोक प्रगती करणार आहेत. या काळात त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. या दिवशी कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. याशिवाय तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सुद्धा उच्च स्थान प्राप्त कराल.

तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रशंसा होईल. उत्पन्न वाढीचा हा काळ आहे. संधी ओळखून संधीचा सोन मात्र तुम्हालाच करायचा आहे. जोडीदाराशी मतभेद परवडणार नाहीत. नात्यात झुकता माप घ्यावा लागेल. आणि तसेच करणे तुमचा फायदाच ठरेल.

६) कुंभ रास- महाशिवरात्रीच्या दिवशी घडणाऱ्या दुर्मिळ योगांमुळे कुंभ राशींच्या लोकांचा नशीब चमकणार. या काळात या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच रखडलेली कामे पूर्ण होतील. येणाऱ्या काळात आर्थिक स्थैर्य लाभल्याने कौटुंबिक सहल सुद्धा तुम्ही आयोजित कराल.

जोडीदाराच्या साथीने व्यवसायात प्रगती कराल. हा काळ आनंदाचा आणि समाधानाचा ठरला आनंदाचा आणि समाधानाचा ठरेल. या होत्या त्या ६ राशी पण तुमची जर रास या यादीमध्ये नसेल तर नाराज होऊ नका‌. कारण याच काळात आणखीन एक योग जुळून येत आहे. ज्याचा लाभ बाराही राशींना होणार आहे.

त्यादिवशी मालव्य शुभ राजयोग जुळून येत आहे आणि या शुभ योगात भगवान शिवाची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कामामध्ये अडचणी येत असतील तर त्याही दूर होतील. हळूहळू सगळी कामे मार्गी लागतील. तेव्हा येत्या महाशिवरात्रीला महादेवाची साधना,उपासना, नामस्मरण आणि महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायला विसरू नका. बोला “ओम नमः शिवाय”.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *