६ फेब्रुवारी २०२३ गुरुप्रतिपदा करा ही छोटीशी सेवा स्वामी कृपा होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

६ फेब्रुवारीला आहे गुरुप्रतिपदा. ही गुरुपृतिपदा का साजरी केली जाते कशी साजरी केली जाते. तसेच भक्त जण या दिवशी कोणती सेवा करतात चला जाणून घेऊयात. माघ कृष्ण प्रतिपदा या स्थितीला श्री गुरु प्रतिपदा अस म्हटल जात. आणि याच कारणही तसंच आहे. भगवान श्री गुरु दत्ताचे द्वितीय अवतार श्री नृसिंहसरस्वती महाराज स्वामी याच पावन तिथीला शैल्यगमन केल होत.

गुरु प्रतिपदा या दिवशी नृसिंहसरस्वती महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. गुरु प्रतिपदेचा उत्सव श्री क्षेत्र गाणगापूर खूपच दिव्य स्वरूपात साजरा होतो. अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक उपासक संन्यासी आणि भक्त मोठ्या प्रमाणात इथे दर्शनाला येतात.

श्री चरणी अभिषेक,नैवेद्य, पालखी असे सेवा करतात. देववाडी सोडून निघाल्यानंतर दुःखी झालेल्या ६४ योगिनीची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात,जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसह आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल.

भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्य गमनापूर्वी आपल्या भक्तांना अभय वचन देताना म्हणतात,”कल्पवृक्षातें पूजोन | यावें आमचें जेथ स्थान | पादुका ठेवितो निर्गुण | पूजा करावी मनोभावे ||” भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करण वाडीला गमन केले होते.

श्री शेत्र नृसिंह वाडी येथे बारा वर्षे राहिल्यावर अनेक लीला केल्यानंतर त्यांनी तिथून अश्विन कृष्ण द्वादशीला श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून मग कृष्णप्रतीपदीच्या पावन तिथीला निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले.

गुरुप्रतिवेदीला मोठ्या संख्येने भक्त भाविक गाणगापूर मध्ये येतात आणि स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतात. पण सर्वांना या दिवशी गाणगापूरला जाणे शक्य नसते. अशावेळी सामान्य दत्तभक्त आहे त्याने घरात राहून काय कराव बर जेणेकरून स्वामी महाराजांची कृपा त्याच्यावर होईल. तर अशा सामान्य गुरुभक्त ने गुरु प्रतिभेचे दिवशी कमीत कमी श्री गुरुचरित्राचा ५२वा तरी अध्याय वाचावा.

सकाळी उठाव स्नान करावे त्यानंतर सर्वात पहिल्यांदा काम करायचा आहे ते म्हणजे जर तुम्ही गुरु मंत्र घेतलेला असेल तर त्या गुरु मंत्राचा जप करावा. किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. त्यानंतर श्री गुरुचरित्र चा ५२ वा अध्याय वाचावा. आपली ही छोटीशी सेवा श्री गुरुदत्तांच्या चरणी अर्पण करावी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *