कसा असतो मिथुन राशीचा स्वभाव? गुण, वैशिष्ट्य, जाणून घ्या अजून बरेच काही वृषभ राशी विषयी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

राशी चक्रातली तिसरी राशी ही मिथुन राशी. नक्की काय आहे मिथुन राशीचे गुणवैशिष्ट्य राशीचक्रातल्या आणि स्वभाव याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मिथुन राशि बद्दल एका शब्दात जर सांगायच झाल एवर ग्रीन पर्सनॅलिटी बहू आयावी गुणवैशिष्ट्य असंच म्हणता येईल. मिथुन राशि चक्रातील तिसरी राशी. मेष, वृषभ आणि तिसरी म्हणजे मिथुन.

ही तिसरी राशी असून या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. वायु तत्वाची राशी असल्यामुळे ही सदैव नवनवीन माहितीच्या आणि गोष्टींच्या शोधात की राशी असते. वर्ण शूद्र असल्यामुळे पडेल ते काम करण्याची यांची वृत्ती असते. कोणत्याही कामात लाज न बाळगता सदैव काम करत राहण अगदी उत्साहाने मनापासून सर्व प्रकारच्या कामात लक्ष द्यायला यांना फार आवडत. त्यांच्याकरता कुठलंही काम कमी आधी अस काही महत्त्वाच नसत.

प्रत्येक कामाला ते तेवढेच महत्त्व देतात. अगदी मनापासून ते काम करतात. यांच्या स्वभावात तर्कबुद्धी अतिशय सुंदर असते. हास्यविनोद हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. उगाच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करण यांना आवडत नाही. सतत नवनवीन गोष्टी करत राहण माहिती करून घेण यांना आवडत. परंतु त्या गोष्टीतील नाविन्य एकदा संपलना त्या गोष्टीकडे नंतर ढुंकून सुद्धा पाहिले जात नाही.

अशी ही मिथुन राशी. हीच गोष्ट बऱ्याचदा नातेसंबंधांमध्ये सुद्धा घडताना दिसते. नवनवीन लोकांशी मैत्री करणे, नवीन क्षेत्रातील लोकांशी संबंध वाढवणे. त्यामुळे यांचा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जो आहे तो फार मोठा असतो. यांच्या बोलक्या स्वभावामुळे कोणीही कुठेही कोणत्याही वयोगटातील व्यक्तींबरोबर यांची सूर अगदी सहजपणे जुळतात.

अगदी लहान मुलांपासून ते वयोवृत्त व्यक्ती यांच्या मित्र परिवार यादीमध्ये अगदी भरभरून भरलेले असतात. मिथुन राशीच्या जातकांची स्मरणशक्ती, हजर जबाबीपणा हा चांगला असल्यामुळे बुध हा राशीचा स्वामी ग्रह आहे. कोणत्याही प्रसंगातून आपल्या बुद्धीच्या जोरावर हे अगदी सहज बाहेर पडू शकतात. प्रसंगावधान अडचणीतून कितीही भली मोठी अडचण असू द्या मार्ग काढू शकतात.

अशी ही मिथुन राशी. बुध हा मिथुन राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे एखाद्या गोष्टीची जाहिरात करून खूप चांगल्या प्रकारे मार्केटिंग क्षेत्रामध्ये सहजपणे यशस्वी होणारी अशी ही मिथुन राशी. कम्युनिकेशन स्किल,मार्केटिंग, सेल्समॅन अबिलिटी यांच्यामध्ये अतिशय उत्तम असते. त्यामुळे मीडिया, जाहिरात, सेल्समन अशी जी कार्यक्षेत्र आहेत त्याचबरोबर अकाउंटिंग, एलआयसी किंवा गुंतवणूक सल्लागार अशा क्षेत्रांमध्ये यांचा जम फार लवकर चांगल्या प्रकारे बसतो.

फिरण्याची आणि नवनवीन ठिकाणी भेटी देण्याची त्यांना फार हौस असते, आवड असते. तसेच विविध भाषांचा अभ्यास करून दुभाषी म्हणून काम करण बऱ्याचदा नोकरीबरोबर जोड व्यवसाय करायला या मंडळींना मनापासून आवडत. अकाउंटिंग रायटिंग असेल की व विविध वस्तूंचे मार्केटिंग असेल, एलआयसी, पोस्ट ऑफिस, गुंतवणूक किंवा म्युचल फंड अशा क्षेत्रांमध्ये सल्लागार किंवा मार्केटिंग, एजंट म्हणून काम करतानाही मंडळी आढळतात अगदी नोकरी करत करत सुद्धा.

पत्रकारिता करणे हा सुद्धा यांचा आवडता विषय असू शकतो. सध्याच्या काळानुसार इव्हेंट मॅनेजमेंट, सहलींचा आयोजन करणे किंवा टूर गाईड म्हणून सुद्धा ती मंडळी आपली कारकीर्द यशस्वी करू शकतात अशी ही मिथुन राशी. प्रत्येक क्षेत्रामध्ये यांना यायला रस असतो. आपण दुसऱ्यांची संवाद साधत असतो परंतु जेव्हा आपण मिथुन राशींच्या मंडळींना बोलताना ऐकतो व त्यांच बोलण ही कला आहे आपल्याला त्याच वेळेला समजत. इतक त्यांच बोलण प्रभावी असत.

समोरच्याला भुरळ पाडणारा असत केवळ ना केवळ आपल्या बोलण्यामुळे या राशीच्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला आपलेसे कधी करून घेतात ते समोरच्यालाही कळत नाही. लहान सहान गोष्टी ही अगदी मनोरंजन करून सांगण्याच वैशिष्ट्य या व्यक्तींमध्ये ठासून भरलेला असत. एखाद्याची नक्कल करणार सुद्धा या व्यक्ती वाकपदार असतात. त्यामुळे कलाक्षेत्रात सुद्धा यांना करियर करायला चांगली संधी असते.

खूप सुंदर असे नाट्य म्हणा युवा चित्रपट म्हणा सृष्टी मध्ये वावरताना दिसतात. मात्र द्विधा मनस्थितीची राशी मिथुन असल्यामुळे स्वतःच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतेवेळी मा त्र थोडासा गोंधळून जातात. निर्णय घ्यायला विलंब लावतात किंवा घाई गडबडीत चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता यांच्या बाबतीमध्ये सर्वाधिक असते. विशेष करून हे तेव्हा घडते त्यांच्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह अशुभ स्थितीवर असतो.

त्यामुळे आपणच घेतलेल्या निर्णयामध्ये थांब न राहिल्यामुळे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना मात्र त्रास भोगावा लागतो. प्रत्येक राशीचे मंडळी चांगले गुणधर्म असतात तसे वाईट गुणधर्म सुद्धा असतात. इथून राशी सुद्धा बुध ग्रह अशुभ स्थितीत किंवा या बुध ग्रहाची युती किंवा योग अशुभ झालेले असतील दृष्टी अशुभ पडलेली असेल तर ही मंडळी आपल्या फायद्यासाठी समोरच्याला फसवायला मागे पुढे पाहत नाही.

खोटी कागदपत्र तयार करणे, खोट्या सह्या करण, खोट बोलण, खोटी साक्ष देणे अशा काही वाईट सवयी यांच्या मिथुन राशीच्या बुध ग्रह अशुभस्थितीवर असेल बिघडलेला असेल यांच्यामध्ये प्रामुख्याने या गोष्टी दिसतात. दुसऱ्याच्या पैशावर आयुष्य करणे सुद्धा त्यांचा वाईट गुणधर्माचा एक भाग आहे. दुसऱ्याच्या जीवावर पैशावर ऐश्वर्याचे जीवन जगण हा सुद्धा त्यांच्या स्वभावाचा एक पैलू असतो.

बुध ग्रह पत्रिकेत बिघडलेला असेल बऱ्याचदा यांचे या स्वभावामुळे नंतर लोकांच्याशी नातं तोडतात आणि लांब राहतात. कधी कधी दुसऱ्याची खिल्ली ही मंडळी एवढी उडवतात समोरच्याला यांचा अगदी राग सुद्धा येऊ शकतो. प्रकरण भांडणापर्यंत जाऊ शकत. यांच्या वागण्यातील ही परिस्थिती लोकांच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा यांची समाजामध्ये प्रचंड अवेलहना सुद्धा होते अर्थात यांचा यांच्यावर काही परिणाम होत नाही.

अशी ही मिथुन राशी.चांगले स्वभाव वाईट स्वभाव त्यांच्या स्वभावातील कमतरता म्हणजे काय तर दुसऱ्यांना जे काय करू नका अस सांगतात ना त्याच गोष्टी ही मंडळी स्वतः करतात. म्हणजेच आपणच नियम बनवतात आणि आपणच ते नियम स्वतः मोडतात. कारण नियम हे मोडण्यासाठी असतात असे काही त्यांचे विचार असतात. मिथुन राशीच्या व्यक्ती बऱ्याच जिद्दी आणि हट्टी स्वभावाच्या असतात. या व्यक्ती कुशल अधिकारी, व्यवस्थापक, शिक्षक सुद्धा होतात.

यांना नेहमी आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायला आवडतात. तसेच दुसऱ्यांना अधिकाधिक संधी द्यायला मदत करायला या मिथुन राशीच्या मंडळींना मनापासून आवडत बुध ग्रह चांगला असेल तर. तसेच लोकांच्या आनंदामध्ये आनंद मिळत असतो समोरच्या व्यक्तीला आनंदी पाहिला यांना फार फार आवडत. अगदी आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून आजूबाजूच्या लोकांना आनंदी कस करायच त्याची गुरुकिल्ली याच मिथुन राशीकडे असते.

आरोग्याचा विचार केला मिथुन राशीचा तर कशाचे आजार, फूड पॉइझनिंग यांसारख्या आजारांची शक्यता यांच्या बाबतीमध्ये भविष्यात आढळण्याची शक्यता असते. तसेच काही वेळेला अडखळत बोलणे म्हणजे वाचेचा दोष त्याचा त्रास होण्याची शक्यता अर्थात सगळ्या राशीसाठी नाही काही मिथुन राशीसाठी अशी आहे. मिथुन राशि कधी गोड, कधी आंबट.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *