आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे ६ सोपे उपाय..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. सूर्य देवाची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वात उत्तम दिवस मानला जातो.ज्योतिष शास्त्रात सुर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्य देवाची कृपा असेल तर माणसाच्या आयुष्यात खूप प्रगती होते आणि त्यांचे आरोग्य नेहमीच चांगले राहते.

कुंडलीतील बलवान सूर्य जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती घेऊन येतो. जर सूर्य कमजोर असेल तर व्यक्ती नेहमी आजारी राहतो. धनाची हानी होते आणि कामही बिघडू लागते. रविवारी खास उपाय केल्याने धन आणि जीवनातील अडचणी दूर होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात रविवारी कोणती उपाय केले पाहिजेत.

मित्रांनो जर तुम्ही रविवारी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल तर एखादे सोपे काम तुमच्या यशाचे दरवाजे उघडू शकते. तुम्हाला फक्त हा छोटासा उपाय करायचा आहे.

१) घरातून बाहेर पडण्यापूर्वी गाईला भाकरी खाऊ घालून निघावे. असे केल्याने आजच्या कामासाठी तुम्ही घर सोडत आहात ते काम नक्कीच पूर्ण होईल.

२) रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्यापाशी दोन्ही बाजूला गाईच्या तुपाचा दिवा नेहमी लावावा. असे मानले जाते की यामुळे घरात लक्ष्मीची आगमन होते.

३) ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी शिवमंदिरात देवी गौरी आणि भगवान शंकराला रुद्राक्ष अर्पण करावे. यामुळे संपत्तीचा आशीर्वाद अवश्य मिळतो. जीवनात प्रगती करायची असेल हे खास उपाय नक्की करून बघा.

४) या दिवशी दूध आणि गूळ मिसळून भात खाल्ल्यास विशेष फायदा होतो. या शिवाय लाल कपड्यात बांधून गहु आणि गुळ दान केल्याने फायदा होतो. कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर या दिवशी केलेल्या उपायाने बलवान बनता येते.

५) रविवारी पाण्यात गुळ आणि तांदूळ मिसळून पाण्यात टाकावे. असे केल्याने सूर्याचे कुंडलीतील स्थान उच्च होते आणि सर्व समस्या पासून मुक्ती मिळते. घरात सुख समृद्धी आणायची असेल तर रविवारी आदित्य स्तोत्राचे पठण करा. याच्या पटनाने सूर्य देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.

७) रविवारी कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यापूर्वी गोड पाणी अवश्य प्यावे. रविवारी तुमची इच्छा एका वाडाच्या झाडाच्या पानात लिहून ते वाहत्या पाण्यात वाहून द्या. असे केल्याने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. असा विश्वास तुम्ही तुमच्या मनात ठेवला पाहिजे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *