नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये देव देव घरान संबंधित अशी काही माहिती सांगितली आहे. ही माहिती आपण आपल्या देवघरामध्ये पूजा करत असताना किंवा नवीन घरामध्ये देवघराची बांधणी करत असताना लक्षात घेतले पाहिजे. आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी आपल्यातील प्रत्येक व्यक्ती सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून व त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन विधिमतपणे पूजा करत असते.
तर मित्रांनो कोणकोणते नियम आपल्या धर्मशास्त्रात मध्ये देवघरा संबंधित सांगितले आहेत. हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की शक्यतो ज्या घरात ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश विशेषतः सकाळची कवळे ऊन येत असते त्या ठिकाणी आपले देवघर असावे. त्याचबरोबर ज्यावेळी आपण देवघरात मध्ये देवपूजा आरती करण्यासाठी जातो.
त्यावेळी देवघरात प्रवेश करण्या अगोदरच आपल्याला आपल्या अंगावर असणाऱ्या चामड्याच्या वस्तू किंवा जर तुम्ही पैसे ठेवण्यासाठी पाकीट वापरत असाल तर हे पाकीट आणि आपण पॅन्टला लावण्यासाठी जो वापरत असतो तो बेल्ट या गोष्टीचा चामड्याच्या असतात. अशाच चामड्याच्या वस्तू देवघरामध्ये घेऊन जाणे टाळायचे आहे. आपल्या घरातील देव्हारा कोणत्या दिशेला आहे यावरून सुद्धा आपण आपल्या घरातील अनेक गोष्टी लक्षात घेऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील देव्हारा हा पूर्वेच्या किंवा पश्चिमेच्या भिंतीवर असावा. जर आपल्या घरातील देव्हारा हा पूर्व दिशेला असेल तर अति उत्तम कारण जेव्हा आपण सकाळी देवघरामध्ये देव पूजा करतो. त्यावेळी आपले तोंड सुद्धा पूर्व दिशेला होते. आणि त्यामुळे पूर्व दिशेकडून येणारी सूर्याची किरणे आणि शुभ किरणांचे परिणाम देवघरामध्ये पूजा करणाऱ्या व्यक्तीला मिळतात.
आपल्यातील बरेच जण देवघरामध्ये कुलदेवतांचे किंवा इतर देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. पण मित्रांनो ज्यावेळी आपण आपल्या देवी देवतांची मूर्तीची स्थापना करत असतो त्यावेळी त्या मूर्तीची उंची कमीत कमी असावी. शक्यतो या मूर्तीची उंची तीन ते चार इंच इतकीच असावी. आपल्या देवघरामध्ये आपण अगरबत्ती लावण्यासाठी जे स्टॅन्ड किंवा छोटेसे घर ठेवत असतो ते शक्यतो आपल्या डाव्या बाजूस असावे.
त्याचबरोबर आपल्यातील बऱ्याचदा अशा प्रश्न पडलेला असतो की आपल्या देवघरामध्ये शिवप्रतिमा असावे की नसावे कारण ही स्मशान देवता आहे. म्हणूनच आपल्या देवघरामध्ये कधीही शिवप्रतिमा ठेवू नये. जर तुम्हाला महादेवाची पूजा करायचे असेल तर एक छोटेसे शिवलिंग आणून ती आपल्या देवघरांमध्ये स्थापित करावी. त्याचबरोबर सकाळच्या वेळी आपण देवघर स्वच्छ करत असतो.
त्यावेळी आधी ती फुले गोळा करून टाकून देत असतो. पण मित्रांनो ती टाकून देणे अगोदर या फुलांचा सुगंध जरूर घ्यावा. आणि नंतरच ती टाकून द्यावी. किंवा विसरचित करावी. त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या घरातील देवघरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावले असतील किंवा आपल्या कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींची प्रतिमा आपण चांदीच्या पत्रावर कोरून तो पत्रा देवघरामध्ये पूजात असतो.
पण मित्रांनो शास्त्रामध्ये असे करणे अत्यंत अशुभ सांगितले आहे. मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरातील किंवा कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तींची प्रतिमा लावायची असेल तर वास्तुशास्त्रानुसार त्यांची प्रतिमा किंवा आतून दक्षिण दिशेला भिंतीवर लावावा. मित्रांनो या शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की देव घरामध्ये एकाच देवीदेवतेचे एका पेक्षा जास्त प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.