२५ जानेवारी २०२३ माघी गणेश जयंती या गोष्टी नक्की करा होईल बाप्पाची कृपा..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

गणपती बाप्पा जर आपल्यावर प्रसन्न झाला तर आपल्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतात. मग तुम्हाला गणपती बाप्पाला प्रसन्न करून घ्यायचाय का गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर व्हावी असं तुम्हाला वाटतंय का? मग एक उत्तम संधी आली आहे, येत्या २५ तारखेला आहे. माघी गणेश जयंती आणि या दिवशी जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर गणपतीची कृपा आपल्यावर झालीच म्हणून समजा कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया.

२५ तारखेला आहे, माघी गणेश जयंती आणि या दिवशी तुम्ही विशिष्ट प्रकारे गणपतीची पूजा केली तर गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं सकाळी लवकर उठून नित्य कर्म झाल्यानंतर गणेश पूजनाचा संकल्प करायचा. चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने गणपतीला अभिषेक करावा. गणपतीसह महादेव गौरी नंदी कार्तिकेय शिव कुटुंबाची सुद्धा पूजा विधिपूर्वक करावी.

गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुलं दुर्वा हे सुद्धा वाहवें गणपती अथर्वशीर्ष चा पाठ करून नव्हे तर दाखवावा पण थांबा थांबा थांबा तुम्हाला नैवेद्य कशाचा दाखवायचा आहे मागे गणेश जयंतीला गणपती बाप्पाला तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य तिळगुळाचे लाडू घ्यायला विसरू नका.

नैवेद्य झाला की आरती करून सगळ्यांना प्रसादाचे वाटप करा गणपतीचा जप करा नामस्मरण करा. तसेच आपले कुळधर्म कुणाचार्याप्रमाणे सगळे विधी करा आणि हे सगळ केल्यानंतर गणपती बाप्पाकडे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. मित्रांनो तुम्हाला आता शंका असेल की आताही आणि जयंती येते आहे ती नक्की कुठली कारण की भाद्रपद महिन्यामध्ये आपण गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केलाच की हो ना दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी होते.

आताही गणेश जयंती आली आहे ती कुठली आहे तर मराठी वर्षात आपण लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे करतो. आता ३ जन्म कोणते तर राक्षसांना मारण्यासाठी गणपती बाप्पांनी वेगवेगळे तीन अवतार घेतले होते. त्यापैकी पहिला अवतार म्हणजे वैशाख पौर्णिमेला घेतलेला पुष्टी पती विनायक त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी चा जन्म आणि तिसरा जन्म म्हणजे माघ महिन्यातील चतुर्थी तिथीला घेतलेला अर्थात गणेश जयंतीला २०२३ मध्ये येत्या २५ तारखेला ही गणेश जयंती आहे.

पौराणिक मान्यतेनुसार माघ मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला. गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या तो हा दिवस हा अवतार गणपती बाप्पांनी नराटक नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी पिता ऋषिकेश आणि माता अदिती यांच्या पोटी घेतला होता.

या अवतारात राक्षसांना मारून सज्जनांचे रक्षण केले साधुसंतांच्या हाकेला धावून येऊन गणपती बाप्पा नेहा अवतार धारण केला होता. मग मंडळी हे सगळं तुम्हाला आधी माहित होतं का? माघी गणेश जयंतीला तुम्ही काही करता का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *