यश, पैसा, समृद्धीसाठी या राशींनी घालावी सोन्याची अंगठी.. “राजयोग” अनुभवाला.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुम्हाला तुमची रास माहित आहे ना मग ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या माहितीमध्ये आम्ही सांगणार आहोत सोन्याची अंगठी घालण कोणत्या राशींसाठी फायद्याच ठरत. अहो त्यांच्याच राशीत राजयोग येतो अस म्हणा ना काय सांगाव त्यामध्ये तुमची सुद्धा रास असेल मग चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.

मित्रांनो प्रत्येक धातूच एक वेगळ महत्त्व असत.प्रत्येक धातूचे स्वतःचे गुणधर्म असतात. आणि म्हणूनच ज्योतिष शास्त्र मध्ये सोनं,चांदी,तांबे अशा वेगवेगळ्या धातूंना वेगवेगळ्या प्रकारे वापरण्याचा सल्ला दिला जातो. आणि त्यामध्ये सोन्याला तर विचारू नका फारच महत्त्व आहे. सोन्याची अंगठी घालण काही राशींसाठी लाभदायक ठरत. आणि म्हणूनच ज्योतिष शास्त्रामध्ये त्या राशींना सोन धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

बर सोन्याची अंगठी जर घालत असाल तर ती तर्जनी मध्ये घातली पाहिजे. कारण त्यामुळे व्यक्तीची एकाग्रता वाढते. आणि एकाग्रता आपल्याला जीवन जगण्यासाठी फार महत्त्वाची असते. जर एखाद्या व्यक्तीला व्यवहारातील कामांना अडथळे जाणवत असतील तर अशा लोकांनी अनामिकमध्ये सोन्याची अंगठी घालावी. त्यांना व्यवहारी देणाऱ्या अडचणी दूर होतील. आता हा नियम फक्त त्या राशीसाठी आहे ज्या राशींची यादी आता मी सांगते.

१) सिंह रास- त्यामध्ये पहिली रास आहे सिंह रास ज्योतिष शास्त्र नुसार सिंह राशींच्या लोकांसाठी सोन शुभ ठरत. भाग्योदयासाठी या लोकांना सोन्याच्या अंगठीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. ही रास अग्नितत्त्वाची आहे आणि त्यामुळेच या राशीचा स्वामी आहे सूर्य. आणि म्हणूनच या राशींच्या लोकांसाठी सोन लाभदायी ठरत.

२) कन्या रास- कन्या राशीच्या लोकांना सुद्धा सोन वापरणे फायद्याचा ठरत. ही लोक सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट किंवा साखळी घालू शकतात. या राशींच्या कुंडलीत गुरु पाचव्या स्थानी आणि पाचव्या घराचा स्वामी असतो. अशा स्थितीमध्ये गुरुचा शुभ प्रवाहासाठी सोन्याचे अलंकार धारण करणे यांना फायदेशीर ठरत.

३) तूळ राशी- या राशीच्या लोकांनी सुद्धा सोन्याचा धातू धारण केल्यास त्यांच नशिब पालटत. त्यांना विशेषतः सोन्याचे अंगठ्या घालण्याचा सल्ला दिला जातो. या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे त्यांनी सोन्याचा धातू धारण करावा. त्यांचे चित्त स्थिर राहून त्यांची करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते.

मित्रांनो आता याचा अर्थ असा नाही की इतर राशींच्या लोकांनी सोन्याचे अलंकार घालू नयेत. मात्र आपल्या राशीला अनुकूल धातू कोणता आहे जो आपल्यासाठी राजयोगकारक ठरू शकतो. हे जाणून घ्या पण तस तर सगळ्याच राशींसाठी राजयोग कारक ठरणारी एक गोष्ट आहे.

ती म्हणजे प्रामाणिक मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी ही गोष्ट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला रंकाचा राव सुद्धा बनवू शकते. अर्थात तुमची परिस्थिती कशीही असू द्या तुम्ही राजा बनणार यात काय शंकाच नाही. म्हणूनच ज्योतिष शास्त्राचा आधार घेताना तुमचे प्रामाणिक कष्ट तुमची प्रामाणिक मेहनत सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. हे विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *