कसा असतो वृषभ राशीचा स्वभाव? गुण, वैशिष्ट्य, जाणून घ्या अजून बरेच काही वृषभ राशी विषयी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी राशी चक्रातील दुसरी रास म्हणजे वृषभ. मेष राशी नंतर येणारी रास वृषभ. नक्की काय आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य आणि स्वभाव याबद्दल आपल्याला आज जाणून घ्यायचा आहे. आजच्या या लेखामध्ये . मंडळी वृषभ राशि बद्दल एकाच शब्दात सांगायचं म्हटलं तर जगायचं तर भरभरून जगायच. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून स्थिर स्वभावाची राशी पृथ्वी तत्वाची राशी असल्यामुळे आपल्याला जे हवा आहे.

त्याची जीवनामध्ये अचूक निवड करून ते प्राप्त करून घेणारी आणि जे नको आहे ते त्याच वेळेला सोडून देणारी राशी म्हणजे वृषभ राशी. वैश्य वर्ण व्यापारी वर्गाची राशी आहे. त्यामुळे व्यापारी तत्व मुळातच स्वभावातच यांच्यात अगदी ठासून भरलेला आहे. त्यामुळे नोकरी करत असलेल्या मंडळींनी तरी सुद्धा व्यापार करायला पुढाकार घेतात त्यांना आवडतं व्यापार करण. त्यामुळे कला विद्या शिकवत त्यामध्ये स्वतःचा करिअर निर्माण करणारी की वृषभ राशी आहे.

मंडळी जीवनामध्ये पैशाला महत्त्व देणारी राशी असल्यामुळे आर्थिक सुबत्ता मिळवण्याकडे सुद्धा यांचा सगळ्यात जास्त कल असतो. अर्थात पत्रिकेमध्ये जर शुभ ग्रह योग असतील तर पैशासाठी काबाड कष्ट करून मेहनत करून श्रमाला महत्त्व देऊन एखादी कला विद्या याच्या मध्ये पारंगथा मिळवून पैसा कमावतात आणि याच्या उलट यांच्या मूळ कुंडली मध्ये ग्रह अशुभ योगा असेल तर मात्र पैसे कमवण्यासाठी कोणत्याही थराला वृषभ राशीची मंडळी जाऊ शकतात. अरे जीवनामध्ये मार्गाचा वापर करून पैसा कमावतात त्यामुळेच जुगार, सट्टा यामध्ये यांचा कल जास्त वाढतो. आणि असलेला पैसा जाऊन कर्जबाजारी सुद्धा होतात. अशी ही वृषभ राशि.

मंडळी अशी ही वृषभ राशी म्हटलीना तर आष्युआरामात जगणारी तर काहीशी आळशी अशी जर ही राशी असली तरी ज्या वेळेला त्यांच्या जीवनाला काही ध्येय प्राप्त होत किंवा कुटुंबाची, कामाची, महत्वपूर्ण जबाबदारी अंगावर येऊन पडते ना तेव्हा मात्र स्वतःला कामाबद्दल इतक वाहून घेतात की परिपूर्ण यश मिळवूनच थांबतात. आणि अत्यंत यशस्वी जीवन जगतात. स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला, आपल्या मित्र परिवाराला सुद्धा आपल्याबरोबरच त्याच उच्च पातळीवर नेऊन ठेवण्याची धबक सुद्धा या वृषभ राशीच्या लोकांना मध्ये असते.

ती वापरण्याची संधी मात्र त्यांच्या आयुष्यात मध्ये यावी लागते. आणि ते वापरतात संधी आली की सोडत नाहीत. अशी ही वृषभ राशि राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये भाग घेणारी असते. एखाद्या वकिलाप्रमाणे हुशार व्यक्तिमत्त्वाची वृषभ राशि आहे. त्यामुळे मध्यस्थी करण्यामध्ये, तडजोड करण्याबद्दल समाजातले कुटुंबातील प्रश्न सोडवणे मध्ये यांचा हात कोणीही धरू शकत नाही. म्हणूनच राजकीय वर्तुळामध्ये यांची उठ बस असतेच सामाजिक जीवनामध्ये यांची उठ बस असतेच.

संधी मिळाली तर राजकीय जीवनामध्ये उतरून यशस्वी राजकारकीर्द करणारी ही ती वृषभ राशि आहे. व्यवहार कुशलता, कामाबद्दल चिकाटी पण यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सरकारी कामे पूर्ण करून घ्यायला वृषभ राशीची मंडळी फार महत्वपूर्ण असतात. कारण सरकारी काम भेटलं की आपल्याकडे कोण आहे बघा,’सरकारी काम आणि सहा महिने थांब ‘विलंब पण हा विलंब सहन करण्याची ताकद वृषभ राशीच्या लोकांमध्ये असते. आणि मंडळी चिकाटी इतकी असते किती थांबायला तयार असतात परंतु कामातील यश मिळाले पर्यंत माघार घेतच नाहीत. कारण स्वभावामध्ये असलेल्या चिकाटी वृत्तीचा त्यांचा स्वभाव.

शुक्र ग्रहाच्या अमंलाखाली येणार ही राशी असल्यामुळे प्रेम आणि सौंदर्ययाची चाहती असलेली ही राशी आहे. त्यामुळे जीवनामध्ये चांगल्या प्रतीचे सुख आणि आनंद मिळवण्याची नेहमीच अंतरिक महत्वंकक्षा असते. नेहमी जागृत असते. तसेच या राशीची माणसं निर्मिती क्षम सृजनशील असतात. कोणताही गाजावाजा न करता एखाद काम कस कराव. हे ही स्थिरपणे शांतपणे हे ह्याच्याकडून खरोखरच शिकण्यासारखं असत.

सत्तेची लालसा, विलास प्रियता, चिकित्सापणा,काहीसा हेखोरपणा,आडमुठेपणा सुद्धा या राशींच्या जातकामध्ये आढळला जातो. कारण चांगला डी वाईट हे प्रत्येक राशीमध्ये असतं. आरोग्याच्या बाबतीमध्ये विचार करता कपजन्य आजार कफाचा त्रास, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन त्रास फार लागतो. कंठ, घसा, तोंड,जीभ, घशाचे आजार अशा आजारांचा धोका मात्र एकदा असतो.

मंडळी यांचा जर करिअरचा विचार केला तर नाटक, सिनेमा, मिडिया, फॅशनल फॅशन, अकाउंटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट अशा कार्यक्षेत्रामध्ये ही मंडळी जास्त प्रभावीपणे यशस्वी होतात. यांच्यामध्ये चिकाटी चांगली असल्यामुळे वयाच्या कोणत्याही वेळेत ही मंडळी आपले कार्यक्षेत्र बदलू शकतात. आणि बदललेल्या नवीन कार्यक्षेत्रेमध्ये सुद्धा यशस्वी होऊन दाखवण्याची यांची तयारी असते. बाबाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकाराहून काम करण हे यांच्या स्वभावाला सहाजसे राहत.

यामुळे समाजामध्ये नेहमी की मंडळी नेहमी हसतमुख कामाच्या आणि कार्याच्या बाबतीमध्ये आदर्श हमखासपणे निर्माण करतात. अगदी कोणाची साथ मिळाली नाही तरीही स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मोठी होणारी राशी म्हणजेच हीच राशीचक्रातील दुसरी राशी म्हणजे वृषभ रास हे शुक्र ग्रहाच्या अबला खाली. शत्रूला सुद्धा आपलस करणाऱ्यांमध्ये ही मंडळी नेहमी यशस्वी होतात. सगळ्यांना बरोबर घेऊन चालायला त्यांना मनापासून आवडत.

त्यामुळे स्वतःबरोबर इतरांचाही लाभ कसा होईल. हे बऱ्याचदा यांच्याकडून जाणीवपूर्वक पाहिलं जातं कारण हे आधार असतात. राशी स्वामी शुक्र असल्यामुळे महालक्ष्मीची उपासना करणे जास्त लाभाचं राहत. मग तो लक्ष्मीचा कोणताही मंत्र असो तंत्र असो अवश्य वृषभ राशीच्या लोकांनी माता लक्ष्मीची उपासना अवश्य करावी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *