नमस्कार मित्रांनो.
पौष महिन्यातल्या येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात आणि यंदाही अमावस्या आलेली आहे २१ जानेवारी २०२३ ला तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर व्हायला मदत होईल मग कोणते उपाय तुम्ही करायला पाहिजे चला पाहूयात. मौनी अमावस्येच्या त्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करावे यालाच आर्य देणे म्हणतात त्यामुळे गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुख संपत्ती येते.
अजून एक उपाय म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी गाईला दही आणि तांदूळ खायला घाला. त्यामुळे काय होतं मानसिक शांतता मिळते आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात म्हणजे तुमच्या कुंडलीत चंद्राशी संबंधित काही दोष असतील तर ते या उपायांनी दूर होतील चंद्र मनाचा कारक आहे. त्यामुळे मानसिक शांतताही मिळते आणि मानसिक दोषही दूर होतात.
मौनी अमावस्येच्या दिवशी एकादक्षिणावरती शंखात तुपाचा एक दिवा लावा आणि महालक्ष्मीच्या समोर बसून ओम श्री या मंत्राचा अकरा माळा जप करा कमळगटाच्या मागणी करा असं मानलं जातं की यामुळे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि घरात सुख संपत्ती येते मोनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा तुम्ही एक हजार आठ वेळा जप करू शकता.
आणि हा जप करताना भगवान शंकरांना पंचामृताने अभिषेकही करा त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आर्थिक संकट आलेला असू द्या त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा पितृदोष असेल तर मग मोनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीच्या काठी पित्रंसाठी पिंड दर्पण आणि अन्नदान करणे सगळे दोष दूर करणे करणारे ठरतं त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी आणखीन काही गोष्टी तुम्ही करू शकता त्यापैकी एक म्हणजे पिठात साखर मिसळून मुंग्यांना खायला द्या.
अस केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होत आणि माता लक्ष्मीची देखील कृपा होते त्या एवढ्याशा जीवांचे पोट भरण्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळत. त्यानंतर मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर माशांना सुद्धा तुम्ही पिठाचे काही गोळे करून खायला घालू शकता. त्यामुळे सुद्धा तुमच्या समस्या दूर होतील त्यानंतर मौनी अमावस्येला तुम्हाला दानावश्य करायचे त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्याबरोबर होते.
गरीब आणि गरजू व्यक्तींना ज्या गोष्टी तुम्ही देऊ शकतात त्या नक्कीच दान करा त्यामुळे पितरांचा आशीर्वाद नाही मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल जी कुठली गोष्ट सांगितली जाते त्यामध्ये दुसऱ्या जीवाच भल व्हाव दुसऱ्या जीवालाही काहीतरी मदत व्हावी हा यामागचा उद्देश आहे दुसऱ्याच भल केल्यानंतर आपलं भलं होणार यातच काही शंकाच नाही.
या अमावस्येच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी त्यामुळे सुद्धा घरात सुख शांती येते त्यानंतर जर तुम्हाला नोकरी व्यवसायात काही अडचणी येत असतील तर तुम्ही काय कराल ईशान्य दिशेला एक दिवा लावा या अमावस्येच्या दिवशी उत्तर पूर्व दिशा अर्थात ईशान्य कोण या ईशान्य कोणामध्ये तुपाचा एक दिवा लावा . आणि त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि सर्व मनोकामनांची पूर्तता होते
त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करा पिंपळाच्या झाडालाही दूध अर्पण करा आणि तिथे सुद्धा एक दिवा लावा त्यामुळे सुद्धा पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. पूर्वजांनाही समाधान मिळते या व्हिडिओमध्ये भरपूर उपाय सांगण्यात आलेले आहेत यातला एक जरी उपाय तुम्ही श्रद्धा भक्ती ने केला तर नक्कीच तो तुमच्या उपयोगाला येईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.