नमस्कार मित्रांनो.
मंडळी हनुमानाला समस्या निवारक पवनसुत बजरंग बली असे म्हणतात. ज्या ठिकाणी हनुमानाची नियमित पूजा केली जाते, तिथे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते असे सांगतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक घरात हनुमानाची मूर्ती आणि फोटो पाहायला मिळेल. पण वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची मूर्ती योग्य दिशेला आणि योग्य जागी ठेवल्यास जीवनात खूप फायदा होतो. श्री राम आपल कल्याण करतात असे सांगितले जाते.
तर मग जाणून घेऊयात बजरंग बलीचा फोटो घरात लावताना कशी काळजी घ्यावी लागेल. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची मूर्ती अशा प्रकारे घरात ठेवा. वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची मूर्ती आणि प्रतिमा अशा प्रकारे ठेवावे की हनुमानाचे तोंड दक्षिण दिशेकडे असेल. हनुमान काळाचा नाश करणारे असून दृष्टांना यमलोकांत आणतात. त्यामुळे हनुमानाचे मुख दक्षिण दिशेकडे असावे.
माता दुर्गा आणि माता काली यांना देखील त्याच दिशेला ठेवण्याचा प्रघात आहे. त्यांनी दक्षिण दिशेला असलेल्या लंकेत जास्तीत जास्त जास्तीत जास्त पराक्रम दाखवला आहे.म्हणून हनुमानाचे तोंड दक्षिण दिशेकडे असले पाहिजे. अशा हनुमानाच्या प्रतिमेमुळे आत्मविश्वास जास्ती वाढतो.
जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी पूजाग्रहात ध्यानस्थ बसलेल्या हनुमानाचे चित्र लावावे. त्यामुळे भक्तीची भावना निर्माण होते. या दोन्ही प्रतिमा घरात ठेवल्यास आणि नियमित पाहिल्यास आत्मविश्वास वाढतो आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात.
हनुमानाची अशी प्रतिमा प्रगतीचे द्वार उघडेल. प्रत्येक व्यक्तीला करिअरमध्ये प्रगती करायची असते, परंतु नकारात्मक ऊर्जा आणि घरात असलेल्या ग्रहांच्या प्रतिकूल प्रभावामुळे अनेक वेळा माणूस अडकून राहतो. आणि मेहनत करूनही त्याला यश मिळत नाही.
हनुमानाची अशी प्रतिमा ज्यामध्ये हनुमान हातात पर्व घेऊन जाताना दिसत असेल ते चित्र त्यांचे तोंड दक्षिणेकडे असे ठेवावे. हे देखील लक्षात ठेवा की हे चित्र असे असावे की ते जाताना दिसले पाहिजे. त्यामुळे करिअर मध्ये प्रगती होते. पंचमुखी हनुमानाची प्रतिमा लावल्याने फायदा होतो. काही प्रतिमेमध्ये हनुमान पंचमुखी स्वरूपात दाखवले आहेत.
अशी अख्यायिका आहे की अहिरावनाचा अंत करण्यासाठी हनुमानांनी त्यांचे दिव्य रूप धारण केले. ज्यामध्ये त्यांचे पाच चेहरे प्रकट झाले होते. शास्त्रानुसार हनुमानाची अशी प्रतिमा आणि मूर्ती घरात ठेवल्याने सर्व दिशांचे वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते. हनुमानाची प्रतिमा फोटो इथे कधीच लावू नका.
घरातील बेडरूम मध्ये कधीही हनुमानाचे चित्र लावू नये. हनुमानांनी सूर्याची कन्या सुवर्णकला हिच्या सोबत विवाह केला होता. पण हनुमान गृहस्थ जीवनात कधीच राहिले नाहीत. म्हणूनच हनुमानास बालब्रह्मचारी म्हणतात. ब्रह्मचारी असल्याने गृहस्थांनी बेडरूम मध्ये हनुमानाची प्रतिमा किंवा फोटो कधीच लावू नये.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.