नमस्कार मित्रांनो.
मंडळी राशींचक्रतील पहिली राशीं म्हणजेच मेष रास नक्की काय आहे या राशीच गुणवैशिष्ट आणि स्वभाव त्याबद्दल जाणून घेणार आहोत. मेष राशीं ही राशी चक्ररातील पहिली राशीं असून त्या राशीच स्वामी ग्रह मंगळ एका वाक्यात मेष राशि बद्दल सांगायच झाल्यास नेतृत्व आणि प्रचंड, आशावाद, आत्मविश्वास, ऊर्जा, उत्सव म्हणजेच मेष राशी.
मेष राशींच्या मंडळींचे आणखीन एक मुख्य लक्षण ते म्हणजे या मेष राशीतील लोक कोणतेही कार्य आणि वस्तू यांच अधिक कौशल्याने आणि व्यवस्थित व्यवस्थापन करतात. ज्यालाच आपण मॅनेजमेंट स्किल म्हणतो. मॅनेजमेंट स्किल यांच्याकडे उत्तम प्रकारे असत.
मेष राशी आग्नी तत्वाचे असल्यामुळे आणि मंगळ उष्ण प्रवृत्तीचा ग्रह या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे काही तापट स्वभावाचे अशी ही राशी असते. परंतु मंडळी जेवढ्या लवकर यांना राग येतो ना तेवढ्याच लवकर राग शांत सुद्धा होतो. मेष राशींतील जातक मानसिक रूपा मध्ये खूपच शक्तिशाली असतात.
त्यामुळे आपल्या सकारात्मक आणि शक्तिशाली मानसिकतेच्या आधारे आपल्या कार्यातील यश आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर मनगटाच्या जोरावर खेचून आणण्यामध्ये यशस्वी होतात. यांच्या मते आपल्या कामाच्या प्रती एकदरीत जीवनाच्या सुद्धा प्रति उत्साहाची भावना ही नेहमीच भरपूर असते. मेष राशीचे चर स्वभावाची असल्यामुळे कामाच्या बाबतीमध्ये अवेग शिलता जास्त प्रमाणात असते.
वेग प्रचंड असतो. कोणतही काम वेगाने करण्याची ही मंडळी नेहमीच इच्छा ठेवतात. एकाद्या विषयातील निर्णय सुद्धा अत्यत वेगाने घेण हा त्यांचा स्वभाव असतो. कोणत्याही कामाचं निर्णय भिजत गोघड ठेवण यांना बिलकुल आवडत नाही. आणि तशी माणसं सुद्धा यांना आवडत नाहीत. आपल्या अजूबाजूला कुटूंबात असतील तर
परंतु कोणत्याही कामाची आखणी कारण ज्याला आपण नियोजन करण अस म्हणतो त्यामध्ये यांना रस नसतो. मात्र काम पूर्णत्वला घेऊन जाण्याची तयारी फार जोमात आणि जोरात असते. हे गतिशील मोकळ्या मनाचे प्रतिस्पर्धी असतात आणि नेहमीच ऊर्जावाण असतात. आणि कुठल्याताही कामाल मनापासून करण पसंद करतात.
कधी कधी काम करण्याच्या नादामध्ये कामाची खरी गरज काय आहे हे लक्षात न घेता सुद्धा कुठल्याही कामामध्ये सामील अगदी बिदस्तपणे होतात.त्यामुळे बऱ्याचदा आपलं वेळी वाया घालवताना ही मंडळी दिसतात. आणि म्हणूच मेष राशींच्या मंडळींना ज्योतिषशास्त्र नेहमी सल्ला देते की नियोजन करून काम करा. यश निश्चितपणे तुमचंच राहील. नाहीतर नुसताच काम करत राहायला.
मेष राशीतील जातक स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करताना दिसू शकतात. स्वाभाविक रूपात प्रत्येक कामाची जबाबदारी घेण्याकडे वाटचाल करतात. आणि पती स्पर्धेची भावना त्यांच्या मनामध्ये ही असतेच. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये हे खूप सुंदर असतं. मेष राशीतील लोक उस्फूर्त आणि उत्साहवर्धक असतात. स्वयंपूर्ण असतात. आपल्या भावांना व्यक्त करणारे लोक यांना पसंत असतात.
तसेच ऊर्जेने भरलेले लोक सुद्धा यांना प्रसन्न असतात. म्हणूनच कामामध्ये आळशी असलेल्या यांचं बिलकुल पटतच नाही. स्वभाव बरेचदा खर्चिक असतो. जास्त खर्चिक असतो. आर्थिक नियोजन करण्याची यांना सवय लावणे अतिशय महत्त्वाचं असतं.भविष्यतील आर्थिक सुबतदा प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये आणि म्हणूनच मेष राशींच्या मंडळींनी कर्ज काढताना सुद्धा फार काळजी घ्यावी लागते.
ज्या कामासाठी आपण कर्ज घेतल असेल ते त्याच कारणासाठी कामासाठी वापराव असा सल्ला मेष राशींच्या जातकांना दिला जातो. प्रेमाच्या बाबतीत मध्ये विचार न करता मेष राशींमधील लोक लवकरच प्रेमा मध्ये पडतात.त्यांना कुठल्या नात्यामध्ये असलं पाहिजे की नाही याचा निर्णय घेण्यामध्ये अधिक वेळ बिलकुल लागत नाही.
मेष राशींतील लोक फार लवकर जाणून घेतात की त्यांच नातं टिकेल किंवा नही टिकणार.आणि या राशींतील लोक नातं तोडण्यास सुद्धा वेळ लावत नाहीत. आणि त्यातून बाहेर ही लवकर येतात.कारण भिजत गोगड त्यांना आवडत नाही. जास्त विचार नाही करत बसत. त्यांचा स्वभाव तस पहिला अतीशय प्रॅक्टिकल असतो. इमोशनल नसतो. आणि म्हणूनच निर्णय घेण्यामध्ये ही मंडळी अग्रेसर असतात.
उगाच इमोशनल होऊन झूरत बसत नाहीत. म्हणूनच त्यांचे भावनिक व्यक्तींबरोबर लवकर जुळत सुद्धा नाही. आणि जुळलं तर जास्त टिकतं सुद्धा नाही. कारण ही मंडळी प्रचंड प्रॅक्टिकल स्वभावाचे असतात. असं म्हटलं जातं की तुम्ही कोणत्याही कार्य करण्याच्या आधी विचार करायला पाहिजे. तथापी मेष राशीतील जातकांसाठी मात्र ही गोष्ट ही वाक्य हे महत्व महत्व ठेवत नाही.
कारण,ते पहिल्या काम करतात कार्य करतात नंतर विचार करतात. किंवा त्याबद्दलचा विचार इतर लोक करतात. आणि बऱ्याच वेळा ते विचार न करता निर्णय घेतात. त्यांच्या निर्भयतेच्या मागे असलेलं कारण नेतृत्वाची असलेली क्षमता आणि जो आत्मविश्वास जो त्यांच्यामध्ये प्रचंड भरलेला असतो. तो त्यांना जन्मताच मिळेलला असतो.
मेष राशींतील जातक नेहमी वास्तविक गोष्टी पसंद करतात. आणि लोकांसमोर खूप सरळ व्यवहार करतात. या राशीतील जातक कधी पाठीत सुरी,खंजीर खुपसत नाहीत. परंतु बऱ्याच वेळा तोंडावरच लोकांचे आलोचना निंदा करू शकतात कारण स्पष्टवेक्तपणा त्यांचा मूळ स्वभाव असतो. करिअर नोकरी, व्यवसाय, याचा जर विचार केला मेष राशीच्या बाबतीत तर या राशीतील लोक आत्मनिर्भर असतात. आणि अशा उद्योगांसाठी चागल्या असतात.
ज्यामध्ये गतीशीलता आणि बरीच ऊर्जा याची आवश्यकता असते. या राशीतील लोक उत्तम सर्जन, टेक्निकल क्षेत्रामध्ये, खेळण्यांमध्ये किंवा सैनिक होऊ शकतात. म्हणजे ज्याला आपण संरक्षण खाता म्हणतो. उत्तम इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर विशिष्टज्ञ , मेकॅनिकल, रक्षक क्षेत्र म्हणजेच मगाचा संरक्षण विभाग मग यामध्ये पोलीस असेल, मिलिटरी असेल इत्यादी मध्ये ही सुद्धा ही मंडळी आपल्या कार्याचे उत्तम प्रदर्शन करतात. धातुविज्ञान, वीज ऑटोमोबाईल क्षेत्रयांच्यासाठी उत्तम मानले गेलेला आहे.
आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर अर्थातचउष्णतेचे आजार, पिताचा त्रास यांसरख्या आजरा पासून यांना संभाळव्या लागतात. तसेच डोकं दुखी, ब्लड प्रेशर आणि रक्तदोष याबाबतीमध्ये जास्त काळजी घेण्याची गरज असते मेष राशीला. असच स्वामी मंगळ असल्यामुळे गणेशाची पूजा करणे उत्तम राहते. मग गणपतीचा कोणताही मंत्र असेल, स्तोत्र असेल याचे आवश्यक बटन कराव.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.