मकर संक्रातीला सूर्य आणि शनिची युती, ‘या’ ४ राशींनी काळजी घ्या, त्रासातून जावे लागेल..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी १४ जानेवारीला सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. आत्ताच्या घडीला मकर राशीत शनि आहे. सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशानंतर सूर्य आणि शनी यांची युती होईल. सूर्य मकर राशीत गेल्याने काही राशींवर अशुभ प्रभाव पडेल.

या काळात या ४ राशींच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. या राशींना ताण तणावातून जावे लागेल. यावेळी त्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या चार राशी ज्यांच्यावर सूर्याचा अशुभ प्रभाव पडेल.

१) सिंह रास- सिंह राशींच्या लोकांनी सूर्य संक्रमणाकडे आर्थिक स्थितीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यावेळी कोणाला जास्त पैसे उधार देऊ नका. असे केल्याने तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे बजेट लक्षात घेऊन. सर्व कामे करावी लागतील. या काळात तुम्हाला मातृपक्षाकडून काही अप्रिय बातमी मिळू शकेल त्यामुळे तुमचे मन दुखी होईल.

२) तुळ रास- तूळ राशींचे लोकांचे कौटुंबिक जीवन सूर्य संक्रमणाच्या प्रभावाने प्रभावित होईल. या काळात तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून काही अप्रिय बातमी मिळू शकते.

या काळात तुम्ही प्रवासाला जात असाल, तर थोडी काळजी घ्या. तुमचे सामान चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या पालकांची तब्येतीची थोडी काळजी घ्यावी लागेल. या काळात सरकारी कामात विलंब होऊ शकतो. ज्यावेळी शक्य तितका संयम ठेवा.

३) धनु रास- धनु राशींच्या लोकांना सूर्यभ्रमणात काही अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागू शकते. यावे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाशीही बोलताना शब्द जरा जपून वापरा. यावेळी तुम्ही कोणतीही रणनीती बनवा ती गोपनीय ठेवा.

कोणालाही तुमचे गुपित सांगू नका. या काळात आरोग्याची अधिक काळजी घ्या. या काळामध्ये तुमच्या डोळ्यांच्या संबंधित समस्या असू शकतात. यावेळी कुटुंबाकडे लक्ष द्या आणि यावेळी नातेसंबंधात अंतर देऊ नका.

४) कुंभ रास- कुंभ राशींच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण काही विशेष असणार आहे. सूर्याच्या अशुभ प्रभावामुळे तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते. आणि एवढेच नाही तर या काळात तुमचा खर्चही जास्त असेल.

ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खालावेल. तुमचं वाईट झाल्याने काही लोक खूप खुश होताना दिसतील. आपापसातील वादग्रस्त प्रकरणे सोडवणे हुशारीचे ठरेल. कर्जाच्या रुपात कोणालाही जास्त पैसे देऊ नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *