१५ जानेवारी २०२३ मकर संक्रांत पैशांचा प्रश्न सुटेल, फक्त करा “हा” उपाय.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मकर संक्रात हा दिवस सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी खास आणि महत्त्वाचा मानला जातो. सूर्यनारायण या दिवशी मकर राशित प्रवेश करतो. तर तुम्ही या दिवशी खास उपाय केलेत तर तुम्ही तुमच्या आर्थिक समस्या सोडवू शकता. इथे आम्ही तुम्हाला सात उपाय सांगणार आहोत. त्या उपायांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय केलात , तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. चला जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय.

१) जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्य निच स्थाना मध्ये असेल तर त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये सूर्य यंत्रची पूजा करावी आणि एका सूर्य मंत्राचा पाचशे एक वेळा जप करावा. असं केल्याने कुंडलीतील दोष दूर होतो आणि पैशांची समस्या ही सुटते. बर तो मंत्र कोणता आहे,”ओम घृणि सूर्याय नमः”हा तो मंत्र आहे. आता जर तुमच्याकडे सूर्य यंत्र नसेल तर तुम्ही काय करायचं मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला एका तांब्याच्या कलशामध्ये जल अर्पण करायचे.

एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये कुंकू, लाल फुल आणि गंगेचे पाणी टाकायचं आणि त्यानंतर हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. सूर्य उगवायचा वेळेला. आणि तेव्हा सुद्धा या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा. असं केल्याने प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. आणि नशिबाचे दार उघडते असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवसापासून तुमचे भाग्य उजळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर गरीब गरजू व्यक्तींना ब्लॅंकेट, उबदार कपडे, तूप ,कच्ची डाळ, तांदळाची खिचडी अशा वस्तू दान केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

२) आणखीन एक उपाय म्हणजे तंत्रशस्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी वाहत्या पाण्यात गुळ आणि तांदूळ प्रवाहित करावेत. हे करणं शुभ मानलं जातं.

३) सूर्यनारायणाला प्रसन्न करण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे गुळ आणि दूध एकत्र करून शिजवलेला भात खावा. हा उपाय केल्याने सुद्धा सूर्यदेव प्रसन्न होतात. आणि जर सूर्यनारायण प्रसन्न झाला तर तुम्हाला पद प्रतिष्ठा सगळंच मिळतं.

४) मकर संक्रातीच्या दिवशी वाहत्या पाण्यात तांब्याचे नाणे, तांब्याचा चौकोनी तुकडा प्रवाहित केल्याने कुंडलीतील सूर्यदोष दूर होतात.

५) त्याचबरोबर लाल कपड्यात गहू आणि गुळ बांधून दान करावे या दिवशी त्यामुळे प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते.

६) मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी जिथे मोकळं वातावरण असेल अशा ठिकाणी बसा म्हणजे तुम्हाला मोकळा आकाश दिसेल अशा ठिकाणी एक आसन टाकून बसा. आणि सूर्यनारायणाची पूजा करा. सूर्यनारायणाला गुळ अर्पण करा लाल फुले अर्पण करा. आणि एका मंत्राचा एक हजार वेळा जप करा. तो मंत्र कोणता आहे सांगते तो मंत्र आहे,”ओम भास्कराय नमः”या मंत्राने प्रसन्न होऊन सूर्यनारायण एवढी संपत्ती येतात की सात पिढ्या काहीच ती संपणार नाही असं म्हटलं जातं.

७) मकर संक्रांतीच्या सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी रुद्राक्ष जप माळीने एका विशिष्ट मंत्राचा तर तुमच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात. तो मंत्र याप्रमाणे आहे,”ओम आदित्यायवश विदमहे दिवाकराय धीमहि तन्न: सूर्य:प्रचोदयात्”

मंडळी मंत्रणांमध्ये मध्ये शक्ती असते ताकद असते फक्त ते म्हणताना तुमचा श्रद्धा भाव हवा. आता या उपायांपैकी कोणताही एक उपाय निवडा मकर संक्रांतीच्या दिवशी करून बघा. सूर्यनारायणाची कृपा तुमच्या आमच्यावर हो हीच सदिच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *