कुलदेवतेची सेवा कशी करावी? कुलदेवता आणि कुलदेवी पूजनाचे फायदे…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का? कुलदेवतेची सेवा कशी करावी? याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तुम्हाला माहित असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत त्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात. आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात. कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला जाणून घेऊया.

कुलदेवता या शब्दाचा अर्थ ‘कुल’आणि ‘देवता’या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवताची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता जेव्हा पुरुष देवता असते. तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हणतात.

ही झाली कुलदेवतेची प्राथमिक माहिती. पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचं असतं. आपल्या कुलाची देवता की आपली रक्षण करता असते. आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे गरजेचे असते. मुलांची शिक्षण असेल, लग्न असेल.

आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्या मागे कुलदेवाची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारणा असू शकतात. आपल्या कुलाची आई आपल्या कुलाचा देव तो पावला पावली आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतो. आणि म्हणूनच देवाची उपासना होणे हे तितकच गरजेचं असतं. बरं त्याची सेवा उपासना कशी करावी? फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्यात.

१) कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेव्याची मूर्ती किंवा फोटो घरातल्या देवारात ठेवायलाच हवा. नुसतं ठेवायचा नाही त्याची नियमित भक्तिभावाने पूजा देखील करायचे आहे.

२) दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेचा मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर त्या देवीचा एक मंत्र असतो. आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक वेळा तरी करावा. समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी तर “श्री महालक्ष्मीदैव्यै नमः” असा नाम जप तुम्ही नेहमीच करावा. विवाहित मुलीने सासरच्या कुलदेवतेचा जप करावा. आणि ज्यांच्याकडे कुलदेवी आणि कुलदेव असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा.

आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल तर काय कुलदेवता आहे आम्हाला आमची माहीतच नाही. तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही “श्री कुलदेवतायै नमः”असा नाम जप करावा. हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतो असा अनेक साधकांचा अनुभव आहे.”श्री कुलदेवतायै नमः”हा जप देवतांच्या तारक तत्वाशी संबंध असल्यामुळे कुलदेवता या अक्षरातील ‘दे’या शब्दात उतरताना थोडसं लांबाव. यामुळे देवीचे तारक तत्त्व जागृत होऊन या तत्त्वाचा लाभ आपल्याला होतो.

३) तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवताच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहित नसेल तर मंगळवारी उपवास तुम्ही करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे.

४) वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवतेचे दर्शन घ्यावं. आणि घरातील विवाहित महिलांनी देवीच दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवाची उपासना आवश्यक असते अशा कुळात आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची देवता म्हणतात. अध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी. त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मत जलप्रगती होते.

कुलदेवतेची उपासना करूनच अध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारिक उन्नती झाल्याचे व ज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्यची स्थापना केली. तर मंडळी तुम्ही तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *