मकर संक्रात केव्हा १४ किंवा १५ जानेवारी संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मकर संक्राती हा सण हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. प्रत्येकाच्या मनामध्ये या सणाविषयी वेगळ्या आकर्षण असते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असा हा सण असतो म्हणजे या सणांमध्ये आपले नातेसंबंध जुळत असतात. नात्यांमध्ये आलेली कटूता दूर होत असते किंवा मैत्रीमध्ये आलेली कटुता देखील दूर होत असते. सर्व काही विसरून या दिवशी तिळगुळ देऊन गोड गोड बोलायचे असते.

आणि नव्या जीवनाची सुरुवात पुन्हा एकदा किंवा एका नव्या नात्याची सुरुवात पुन्हा एक वेळा करायचे असते म्हणून हा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या सणामुळे आपल्या मनातील जवळीक आपुलकी वाढते. एकमेकांविषयी प्रेम निर्माण होते. त्यामुळे या सणाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आकर्षण असते. अनेक लोक मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट बघत असतात.

मित्रांनो अनेक वेळा असे होते की आपलं कोणासोबत तरी भांडण असते किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत दुरावा असतो. त्यामुळे हा दिवस जवळीक साधण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कितीही तुटलेले नाते जरी असले तरी या दिवशी ते जुळू शकते. यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. विशेष करून महिलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

संक्रांतीचा हा पर्व महिलांसाठी अतिशय शुभ आणि आनंदा एक मानला जातो. नवा उत्सव देणारा नवा आनंद देणारा हे सर्व मानले जाते. मकर संक्रातीचा दिवस हा लहानांपासून थोरापर्यंत सर्वांच्या आवडीचा हा सण असतो. कारण या दिवशी गोड गोड खायचे असते आणि गोड गोड बोलायचे असते. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांविषयी आदर, सन्मान व्यक्त करत असतो. या दिवशी कोणी कोणासोबत भांडण देखील करत नाहीत.

प्रत्येक जण प्रेमाने आपुलकीने वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा दिवस आनंदाचा उत्तम दिवस मानला जातो. मित्रांनो आयुर्वेदिक दृष्ट्या या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. कारण‌ तीळ आणि गुळ हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानलेले आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये तीळ आणि गुळाचे जेवण केल्याने आपले स्वास्थ्य चांगले राहते आणि उत्तम राहते. मकर संक्रातीच्या दिवशी तिळगुळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले जाते.

मित्रांनो पण यावेळी अनेक लोकांच्या मनामध्ये मकर संक्रांति विषयी संभ्रम निर्माण झाला आहे. मकर संक्रांत १४ जानेवारीला की १५ जानेवारीला याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण आहे. कारण ज्योतिषानुसार यावेळी १४ जानेवारी रोजी सूर्यदेव मकर राशि मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्याच्या राशी परिवर्तनाला म्हणजेच सूर्याच्या मकर राशीमध्ये होणाऱ्या राशी परिवर्तनाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. यावेळी सूर्यदेव रात्रीच्या वेळी मकर राशि मध्ये प्रवेश करणार आहे.

मित्रांनो १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून १४ मिनिटानंतर सूर्यदेव मकर राशि प्रवेश करतील. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण हा १४ जानेवारी रोजी येत आहे. कारण सूर्याचे मकर राशि मध्ये प्रवेश करण्याबरोबरच मकर संक्रांतीची तारीख निश्चित होत असते. पण यावेळी अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य जरी १४ जानेवारी रोजी मकर राशि प्रवेश करत असला तरी रात्रीचा प्रहार असल्यामुळे रात्रीच्या वेळेस स्नान आणि दान वर्जीत मानण्यात आले आहे.

त्यामुळे उदय तिथीनुसार म्हणजे मान्यता आहे की उदय तेथेनुसार जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा मकर संक्रात स्नान आणि दानधर्म संपन्न होईल. त्यामुळे यावर्षी १५ जानेवारी रोजी मकर संक्राती हा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे १५ जानेवारी रोजी आपण मकर संक्रांतीच्या या शुभ प्रभावाचा आपण आनंद घेऊ शकता आणि एकमेकांना तिळगुळ भरून गोड गोड बोलू शकता.

या दिवसांमध्ये आपले नातेसंबंध पुन्हा एकदा मजबूत बनवू शकता. या दिवसापासून आपले अनेक दिवसांचे तुटलेले नाते जुळून आणू शकता. मित्रांनो हा दिवस अतिशय आनंददायक आहे. वर्षातून एक दिवस येणार हा सण अनेक दिवसापासून तुटलेले नाते पुन्हा एकदा घट्ट आणि मजबूत बनवतो. अनेक दिवसापासून तुटलेले संबंध जुळून येतात. त्यामुळे हा दिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करायला हवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *