नमस्कार मित्रांनो.
स्वामीभक्त हा जो अनुभव आहे तो हडपसर मधील आहे. आता हा अनुभव ज्या व्यक्तीला आला त्या व्यक्तीला आल्यानंतर त्या व्यक्तीने हा अनुभव इतर लोकांबरोबर शेअर केला होता. त्यानंतर इतक्या झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचला. खूप लोकांना हा अनुभव माहिती आहे. या ठिकाणी ते दादा म्हणतात की, मी आणि माझी बायको आम्ही दोघी स्वामी सेवकरी आहोत. जसे आम्हाला जमेल तसे रोजचा रोज आम्ही स्वामींची सेवा करत असतो.
फारसा जर वेळ मिळाला नाही तर आम्ही स्वामींची एक माळ तरी जप करतो. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूपाळी आरती संध्याकाळची जी आरती असते ती नित्य नियमाने आम्ही दोघेही करतोच करतो. अजिबात खंड पडून देत नाही. ते म्हणतात आम्हाला कशाचेही कमी नाही. देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने जे काय आम्हाला मिळाल ते भरभरून मिळाल आणि त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत.
परंतु स्वामींच्या चरणांपशी स्वामींच्या सेवेमध्ये आमचे मन रमून जाते. आम्हाला एक शांतता मिळते म्हणून आम्ही स्वामींचं करत असतो. आणि भूपाळी आरती आम्ही कधीही चुकवत नाही. भक्त हो तर बघा दादा म्हणतात की असाच एक दिवस होता रोजच्या प्रमाणे मला भूपाळीला जायचं होतं. माझीजी पत्नी आहे तिला थोडं बरं वाटत नव्हतं ती म्हणाली आज मी काही येत नाही तुम्ही एकटेच जा. तर तिला बरं नव्हतं म्हणून मी एकटाच निघालो.
सकाळच्या वेळीच्या जेमतेम रोजचा रोज पाच ते सहाच लोक आरतीला असतात कारण पहाटेची वेळ असते. एवढ्या लवकर कोणी येत नाही. जास्तीत जास्त दहा जण असतात. परंतु त्यावरती कोणीही नसत. तेथील सर्व काम म्हणजे झाडू मारणे इतर सर्व कामांची व्यक्ती पहिली येते ती व्यक्ती करत असते. त्यादिवशी मी गेलो आणि नेमक तो दिवस असा उगवला त्या दिवशी केंद्रामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणीही नव्हत. आणि माझ्या मनामध्ये काही शंका नाही आली.
मला अस वाटले की, थोड्यावेळाने कोणीतरी येईलच. गेले गेल्या माझी जी कामे आहेत ते मी करायला घेतली. झाडझुड करणं किंवा आरतीची ताट बनवणे, देवाच्या ठिकाणी छान नक्षी काढणे सगळी कामे मी करून घेतली. आणि आरती झाली आरती झाल्यानंतर तरीही कोणीही केंद्रामध्ये आले नव्हते. माझी मी एकट्यानेच आरती केली. आणि अचानक आरती संपायला आली होती अचानक मला असा भास झाला की माझ्यामागे कोणीतरी उभे आहे.
मला असा भास झाल्यानंतर मी मागे वळून बघितलं माझ्यामागे जो माणूस होता तो अगदी उंच असा होता. आरती संपली मी मुजरा केला तरीही तो माणूस तिथल्या तिथेच उभा होता. तो ना स्वामींना मुजरा करत होता ना हात जोडत होता. तो फक्त एक टक बघत होता. मलाही त्यावेळेस त्याचा खूप राग आला. इतका कसा हा कठोर माणूस आहे.
स्वामींकडे आला आणि ह्याला हातही जोडता येत नाही. मग कशासाठी आला हा किंवा मग स्वामी समोर हातही जोडत नाही म्हणून तेव्हा मला राग आला म्हणून मी त्याच्याकडे पुन्हा एकदा वळून बघितल. तेव्हाही मी त्याच्याकडे रागानेच बघितल. आणि त्यानंतर पुन्हा मी स्वामींच्या फोटोकडे मान वळवली. तर आश्चर्य काय झालं बघा भक्तहो या ठिकाणी खरोखर आश्चर्यकारक घटना अशी घडली स्वामींचा जो फोटो होता माझ्यासमोर त्यामध्ये स्वामी महाराज नव्हतेच.
अगदी एखादी कोरी फ्रेम असते पाटी असते तसा तो दिसत होता. अगदी म्हणजे त्यामध्ये स्वामी नव्हतेच असं काही क्षणांसाठी काही वेळेसाठी असं झालं माझ्या मागे एक माणूस उभा होता तर समोर बघितले तर फोटोमध्ये कोणीही नव्हते. पुन्हा जेव्हा मी बघितलं तेव्हा त्या फोटोमध्ये स्वामी महाराजांची प्रतिमा दिसली. आणि जेव्हा मी मागे वळून बघितलं त्या ठिकाणी तो माणूस नव्हता.
अशी वेळ कोणीही नसताना अशी घटना माझ्यासोबत घडली. नेमकं मी त्यावेळेस एकटाच होतो. माझ्या व्यतिरिक्त कोणीही केंद्रात नव्हतं. त्यानंतर त्या माणसाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती जेवढा परिसर आहे. सगळ्या परिसरामध्ये मी त्यांना शोधलं. तेवढ्यात एक दोन भाविक यायला लागले होते त्यांनाही मी विचारले वर्णन केले अशा अशी व्यक्ती तुम्हाला दिसली का भेटली का ज्याला विचारल तो म्हणायचा नाही आम्हाला कोणी दिसल नाही.
आणि त्या क्षणाला माझ्या मनामध्ये विचार आला हे बघा भक्त हो आपल्याला भास होतात त्या दादांनाही वाटले मला बास झाला असेल परंतु एक भाग दोनदा कशी काय होऊ शकतो. दोन वेळा जेव्हा मी मागे वळून बघितलं तेव्हा मला तो माणूस दिसत होता. जेव्हा माझ्या मागे तो माणूस उभा होता तेव्हा फोटोमध्ये स्वामी नव्हते. हा काही भाग नव्हता तर खरोखर स्वामी महाराज त्या ठिकाणी आले होते.
भक्त हो बघा दादा म्हणतात मी स्वामींकडे म्हटलं नाही मला चमत्कार दाखवा चमत्कार तर स्वामींची जरी सेवा करत होतो तरी मी चमत्कार या गोष्टीवर विश्वास हा माझा कमीच होता. आणि खरोखर मला चमत्कार दिसावा आणि स्वामींचे रूप दिसावं म्हणूनच मला ते दर्शन दिलं होत. असा होता त्या दादांचा अनुभव. स्वामीभक्त हो अंगावर शहारे येथील असाच हा अनुभव होता. स्वामी महाराजांनी त्या दादांना अशाप्रकारे चमत्कार दाखवला. आणि त्यांना दर्शन दिल.
दादांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत ही माझी परिस्थिती चांगली होती आणि परंतु ज्या दिवशी मला त्यांचा दर्शन झालं अशा स्वरूपातून त्यानंतर माझी प्रगती होत गेली. माझं जे आयुष्य होतं ते अजून सुंदर बनले. खरंतर त्या दादांनी विचार केला होता हा अनुभव कोणालाही सांगायचा नाही. फक्त घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले.
घरी गेल्यानंतर नात्याने विचार केला स्वामींचा हा महिमा मला समजला तसाच अख्या जगाला समजायला हवा म्हणून हा अनुभव शेअर केला त्यांनी सोशल मीडियाच्या आधारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.