नमस्कार मित्रांनो.
सोन्या-चांदीच्या बांगड्या उत्तमच असतात वास्तुशास्त्रामध्ये या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे. कारण त्यांच्या घर्षनाणे त्यांच अस्तित्व शरीरात जात असत आणि आपण स्वस्थ राहत असतो. त्याचबरोबर काचेच्या बांगड्यांना देखील वास्तुशास्त्रामध्ये अन्य साधारण असं महत्त्व दिल गेलेल आहे. माता लक्ष्मीला काचेच्या बांगड्या अत्यंत प्रिय आहेत. त्याचबरोबर सर्व देवी देवतांनी काचेच्या बांगड्या घातलेल्या पाहायला मिळत. असा उल्लेख शास्त्रामध्ये आहे.
त्यामुळे काचेच्या बांगड्या घातल्याने त्याही योग्य रंगाच्या राशीनुसार घातल्या तर निश्चितच तुम्हाला अपेक्षित फलप्राप्ती होते. व आपल्या पतीचे भाग्य चमकते पत्नीने घातलेल्या बांगड्यांशी पतीच्या उन्नतीचा संबंध असतो असे शास्त्र सांगते. त्यामुळे योग्य रंगाच्या राशीनुसार बांगड्या घातल्या तर निश्चितच पतीची भरभराट होईल यात शंकाच नाहीये.
काचेच्या बांगड्या हातात घातल्याने घरातील नकारात्मकता दूर जाते व घरातील वातावरण प्रसन्न राहून भरभराटीला लागते. मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या कधीच घालू नयेत कारण त्या नकारात्मकतेला निमंत्रण देतात. शास्त्रात बांगड्यांचे तत्व व राशीनुसार त्यांचे रंग सांगितले गेलेले आहेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कोणत्या रंगाच्या बांगड्या पत्नींनी घालाव्यात म्हणजे पतीचे भरभराट होते.
मेष रास- मेष राशीच्या महिलांनी लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. त्यामुळे त्यांच्या पतीचे नशीब चमकते, निदान दोन बांगड्या तरी मेष राशींच्या महिलांनी घालाव्यात.
वृषभ रास- वृषभ राशीच्या महिलांनी गोल्डन कलरच्या अर्थात सोनेरी कलर च्या बांगड्या घालाव्यात. त्यात तुम्ही पितळेच्या किंवा सोन्याच्या बांगड्या देखील घालू शकता. त्यामुळे पतीचे प्रमोशन होते उन्नती होते व तुमच्या पतीची प्रगती वरच्या पायरीवर होते.
मिथुन रास- मिथुन राशींच्या महिलांनी गुलाबी रंगाच्या बांगड्या घालाव्यात. ज्यामुळे त्यांचा आयुष्य गुलाबाप्रमाणे सदैव टवटवीत राहते, व निश्चितच पतीचे भाग्य चमकते.
कर्क रास- कर्क राशीच्या महिलांनी सदैव ऑरेंज किंवा येल्लो कलरच्या बांगड्या घालाव्यात, त्यामुळे त्यांच्या पतीच्या आयुष्याला नवीन आकार मिळतो व उन्नतीचे नवीन दरवाजे उघडले जातात.
सिंह रास- सिंह राशीच्या महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. हिरव्या रंगाच्या बांगड्या कायमच सिंह राशींच्या संसारात आनंदाचे भर टाकतात. व पतीला उत्साह देऊन खऱ्या अर्थाने प्रगतीचे आनंदाचे द्वार उघडतात.
कन्या रास- या राशींच्या महिलांनी आमसुली किंवा वांगी कलरच्या बांगड्या घालाव्यात या रंगाच्या बांगड्या सदैव त्यांच्या संसारात उत्साह वर्धक ठरतात व पतीला कामात तेजबळ निर्माण करून उन्नतीचे दरवाजे उघडतात.
मकर रास- मकर राशीच्या महिलांनी कोणत्याही दोन कलरच्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे अडकलेली कामे लवकर मार्गी लागतात. शक्यतो कोणताही कलर चालेल पण त्यात दोन कलरच्या बांगड्या मकर राशीने घालणं अपेक्षित आहे.
कुंभ रास- कुंभ राशींच्या महिलांनी कायम गडद रंगाच्या बांगड्या घालाव्यात रंग कोणताही असो तुम्हाला आवडतील तो रंग घाला पण तो डार्क असावा किंवा हिरवा रंग घालावा.
मीन रास- मीन राशींच्या महिलांनी ऑरेंज कलर च्या बांगड्या घालाव्यात आणि त्याचबरोबर कोणत्याही रंगाची एक बांगडी अशा दोन रंगांच्या बांगड्या घालाव्यात. दुसरा कोणताही कलर चालेल मात्र ऑरेंज रंगाबरोबर आणखीन एक रंगाच्या बांगड्या मीन राशींच्या व्यक्तींनी घातल्यास उत्तमच.
तर अशाप्रकारे जर तुम्ही बांगड्या घातल्यात त्यांची रंगसंगती कलर राशीनुसार जुळवली तर नक्कीच तेजबळ वाढते आणि पतीची भरभराट होते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.