नमस्कार मित्रांनो.
मंडळी आचार्य चाणक्य हे उत्तम अर्थतज्ञ उत्तम राजकारणी होते. चाणक्यांनी एक नीतीशास्त्र तयार केले आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी ध्येय साधण्यासाठी करण्याचे मार्ग स्पष्ट केले आहेत. याशिवाय चाणक्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितले आहेत. ज्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात उतरवल्या सर्व समस्या सहज दूर होतील.
चाणक्यांनी त्या पाच गोष्टी देखील सांगितल्या आहेत. ज्या वाईट काळ घरात येण्याआधीच सूचित करतात. चाणक्य सांगतात जर एखाद्या व्यक्तीने पाच गोष्टींकडे लक्ष दिले तर तो वाईट काळ येण्याआधीच सावध होईल. वेळीच त्यावर उपाय शोधले पाहिजे . चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते पाच चिन्हे जी वाईट काळ येण्या अगोदरच घडू लागतात.
१) तुळशीचे रोप- आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात सांगितले आहे.जर घरामध्ये किंवा अंगणात लावलेले तुळशीचे रोप सुखायला लागले तर समजून जा तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट घटना घडणार आहे. तुळशीची पाने सुकल्याने घरात आर्थिक संकटे येतात. तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरातील तुळस जर सुखत असेल, तर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे. आणि यामुळे घरात काहीतरी विपरीत घडू शकते. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुमच्या घरातील तुळस सुखायला लागेल तेव्हा काळजी घ्या. आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन तिची क्षमा मागा.
२)काच- ज्या लोकांच्या घरात अनेकदा काचेच्या किंवा काचेच्या वस्तू तुटलेले असतात ते मोठे संकट सुचित करतात. वारंवार पडून फुटलेली काच व भांडी हे सामान फुटणे अशुभ मानले जाते. अनेक वेळा तुटलेली भांडी ही लोक घरात ठेवतात हे देखील अशुभ मानले जाते. म्हणून त्यांना ताबडतोब घराबाहेर काढून टाका. तुटलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा लवकर संचारते. म्हणून घरात कधीच काचेच्या वस्तू तुटलेल्या वस्तू ठेवू नका.
३) भिंती- जर तुमच्या घरातील भिंतीवर नेहमी ओलसरपणा असेल वारंवार दुरुस्त करूनही भिंतीचा ओलावा संपत नसेल, तर योग्य उपाय आवश्यक आहे. घरातील भिंतीवर ओलसरपणा आणि जाळीमुळे घरात राहणाऱ्या लोकांवर वाईट परिणाम सुरू होतो. आशा परिस्थितीत भिंतींना कधीच तडा जाऊ देऊ नका.
४) भांडण आणि तणाव- चाणक्य सांगतात ज्या घरात रात्रंदिवस भांडणे होतात. त्या घरात माता लक्ष्मी आणि कुबेर कधीही राहत नाही. त्यांच्या जाण्याने घरात पैशाची टंचाई चालू होते. आणि घर विनाशाकडे वाटचाल करू लागते.
५) पूजापाठ – हिंदू धर्मात पूजा करण्याची पद्धत दोन वेळा सांगितली आहे. एक सकाळी सूर्योदयापूर्वी आणि एक सूर्यास्तानंतर असे म्हणतात ज्या घरात देवाची पूजा केली जात नाही किंवा त्यांची पूजा करण्यापासून लोक दूर पळतात त्या घरांमध्येच नेहमी संकटे येतात. अशा स्थितीत तुम्ही देवाची आराधना केली पाहिजे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.