नमस्कार मित्रांनो.
स्वामीभक्त नमस्कार मी मुलुंड येथे राहते असं ताई म्हणतात. माझ्या कुटुंबात मध्ये मी माझा नवरा आणि आमची दोन मुलं आसामच्या चौघांचा चौकोनी कुटुंब आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आमच्या घरामध्ये कधी काही अडचणी आल्या नाहीत. मी लग्ना अगोदर लहानपणापासून श्री स्वामी समर्थांची पूजा करायची. आमच्या जवळ एक केंद्र होतं मी जमेल तस आरतीलाही हजेरी लावायची.
आणि स्वामींच्या कृपेने आणि खरतर मनोमन माझी इच्छा होती की जेव्हा मला स्थळ येईल स्वामी सेवेकरांचं असावं आणि नशिबाने तीही इच्छा माझी स्वामिनी पूर्ण केली. आणि माझा नवरा ही स्वामी सेवेकरी निघाला. आमच्या घरामध्ये स्वामींचं आम्ही दोघेही नवरा बायको करतो आणि तसेच लहानपणापासून आमच्या मुलांनाही ती सवय लावली आहे. तर आम्ही जमेल तसं करतच असतो.
परंतु एकदा असंच मनामध्ये विचार आला की जसा आपण पहिल्यापासून गुरुचरित्र पारायण अशीच पारायण करायचं ती सेवा कुठेतरी मागे पडले आहे. आपल्याकडून ते होत नाही. कदाचित जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून असा असावा. परंतु तरीही राहून राहून विचार येत होता आपण करायला हवं. आणि एकदा असंच मनामध्ये ठरवलं. की आपण स्वामी चरित्र सारामृतचे २१ पारायण करायची. मी ते ठरवल्यानंतर लगेच गुरुवार बघून सुरुवात केली.
बघा माझी काय अशी इच्छा नव्हती की माझी इच्छा स्वामिनी पूर्ण करावी. म्हणून मी पारायण करण्याचा विचार केला असा अजिबात नाही. किंवा मग संकट आहे अडचणी आहे म्हणून तसा विचार केला तर तसंही नाही. खरंतर कोणीही स्वामी कडे आपली अपेक्षा आहे इच्छा आहे म्हणून असं करू नये आपले निरपेक्ष भावनेने आपली सेवा करावी. त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळते.
आणि मी स्वामींकडे कधी असेही म्हटले नाही. स्वामी तुम्ही मला कधीतरी दर्शन द्या कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये या किंवा मला प्रचिती तरच मी तुमची सेवा करीन. खरोखर असं माझ्या मनामध्ये कधीच नाही आलं. आणि जी अपेक्षा मी केली नव्हती ती गोष्ट या पारायण काळामध्ये माझ्यासोबत घडली. आणि खरोखर जेव्हा माझ्यासोबत ते घडलं तेव्हा मी आश्चर्याचा झटका बसला.
स्वामीभक्त म्हणूनच मला असं वाटलं की हा अनुभव मी सर्वांना सांगायलाच हवा कारण ज्यांचा कुणाचा विश्वासा कमी असेल स्वामींवर तो आता पक्का होणार आहे. तर बघा झालं काय जेव्हा स्वामीचरित्र सारामृत २१ पारायण करायला घेतली २१ दिवसांमध्ये मला कसलीही अडचण आली नाही. अगदीच म्हणजे माझं पारायण अगदी व्यवस्थित पार पडला आणि एकविसाव्या दिवशी उद्यापन घरातली घरात छोटासा उद्यापन करायचं ठरवलं होतं.
उद्यापन म्हणजे काय तर नैवेद्य स्वामी महाराजांना प्रसाद आपण बनवतो तो नेहमी तसं मी करायचं ठरवलं आणि त्यादिवशी नैवेद्याला मी पुरणपोळी, वरण-भात, घेवड्याची भाजी आणि गोड पदार्थ अजून एक असं खीर असा मी सगळा स्वयंपाक केला होता. कांदा भजी जे स्वामी महाराजांचा आवडीचा आहे. हे सर्व मी स्वयंपाकामध्ये बनवलं होतं. संध्याकाळच्या वेळी आरतीची वेळ झाली नेमकं त्यावेळेस माझा नवरा आणि माझी दोन्ही मुले त्यावेळी घरी नव्हती.
कामानिमित्त ते बाहेर होते आणि मुलंही शाळा आणि कॉलेज मुळे ते येऊ शकत नव्हते. त्यांचे क्लासेस वगैरे होते. म्हणून माझं मीच आरती करायचं ठरवलं. आणि म्हटलं आता आपण उपवास सोडून घेऊया. आरती झाली स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला. सहा साडेसहाला मी आरती केल्यानंतर सात वाजले म्हणून आता आपण जेवायला बसुया. तर जेवायला घेणार तेवढ्यातच दरवाज्याची बेल वाजली.
मला असं वाटलं की मुलं आले असतील नाहीतर माझा नवरा आला असेल म्हणून मी दरवाजा उघडायला गेले तर दरवाज्यामध्ये उंच असे एक व्यक्ती थोडसं वयस्करच वाटली मला ही व्यक्ती आणि त्या व्यक्तीकडे बघितले तर माझ्या मनामध्ये अशा काही शंका आल्या नाहीत. अशी व्यक्ती आली तर आपण दहा पाच रुपये देऊया. म्हणून मी पर्स काढायला गेले आणि हातामध्ये एक वीस रुपये घेऊन आले.
तर ती व्यक्ती मला बोलली मला पैसे नको आज मला तुझ्या घरचं थोडसं जेवायला मिळालं तर बरं होईल. खूप उपाशी आहे मी मला खूप भूक लागली आहे. असं बोलल्यानंतर माझ्या मनामध्ये अजिबात शंका आली नाही ही व्यक्ती कोणी चोर असू शकते लबाड असू शकते.अस अजिबात विचार का आला नाही मला खरंच कळालं नाही. तर मी काही विचार न करता काही विलंब न करता त्या व्यक्तीला घरात बोलवलं आणि एक पाठ दिला पाटावर जेवायला बसवलं.
सर्व ताट वाढून आणल. जे जे पदार्थ केले होते ते सर्व पदार्थ मी त्यांना वाढलं आणि जेवायला दिलं. तेही अगदी तृप्त होईपर्यंत जेवले. त्यांच्या चेहऱ्यावर एक मला समाधान दिसले. खूप आनंदी चेहरा वाटला मला तो. त्यानंतर त्यांनी मला आशीर्वाद दिला खरोखर ते मला बोलले की तुझे काही करते ते योग्य मार्गाने करत आहे. आतापर्यंत ही तुझी भरभराट आहे आणि इथून पुढे अजून भरभराट होणार आहे असं बोलून ती व्यक्ती निघून गेली.
त्यानंतर अचानक माझ्या लक्षात आलं की आपल्या घरी असेल तर कोणी येऊ शकत नाही. आमची जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी जवळपास ज्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी अगदी कडक नियम आहे. कोणी फेरीवाला किंवा कोणी किंवा जे रस्त्यावर फिरतात त्या लोकांना आमच्या बिल्डिंगमध्ये अजिबात एन्ट्री मिळतच नाही अजिबात नाही. वॉचमन त्याच ठिकाणी त्यांना अडवतात. जेव्हा कोणाच्या घरी पाहुणे येतात त्यांना देखील कॉल केला जातो आधी विचारलं जातं आणि मगच ते वरती येतात.
परंतु अचानक हा माणूस कसा आला प्रश्न पडला आणि तेवढ्यात नवरा आला त्यांनाही घडलेली हकीकत मी सांगितले. सुरुवातीला ते माझ्यावर ओरडले अनोळखी व्यक्तीला घरात कसे घेतलं तेव्हा मी त्यांना तेच सांगितलं माहित नाही तेव्हा असं कसं घडलं. ती व्यक्ती कशी आली म्हणून आम्ही तातडीने खाली गेलो वॉचमनला विचारलं असा माणूस आला होता का तर तो बोलला नाही. तर मला असं वाटलं वॉचमेन खोटं बोलत असेल.
म्हणून आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा चेक करायचा विचार केला आणि त्यावेळेस आम्ही फुटेज चेक केले. तर त्यामध्ये ती व्यक्ती दिसलीच नाही. तर असं वाटलं असेल की बिल्डिंग खूप मोठी आहे फिरता फिरता माणूस तो उशिरा आला असेल वेळेचा आधीच फुटेज आपण बघूया म्हणून आम्ही दिवसभराची फुटेज आणि रात्रीचे नऊ वाजेपर्यंत सर्व फुटेज आम्ही बघितले त्या ठिकाणी एकही व्यक्ती अशी भेटली नाही आणि आम्ही दोघेजण घरी जाऊन विचार करत बसलो की अस कस झाल.
त्यावेळेस खरोखर माझ्या मनात विचार आला की आपोआप तोंडातून शब्द आले की अहो ते स्वामी महाराज होते. ते स्वतः माझा प्रसाद ग्रहण करायला आले होते. आपल्या घरी आले होते. मला आशीर्वाद दिला त्यांनी आणि खरोखर आम्हाला खूप आश्चर्य वाटले अक्षरशः आमच्या दोघांचे अंगावर काटा आला. आणि अगदी आमच्या डोळ्यातून अश्रू आले आनंदाश्रू होते खरंच स्वामी महाराज आहेत.
त्यांच्या मुलांकडे बाळांकडे जे कोणी हाक मारत त्यांची सेवा करत त्यांना दर्शन द्यायला ते येताच येतात. आणि ही प्रचिती माझ्या जीवनातील खूप मोठी प्रचिती होती. आतापर्यंत लहान मोठे खूप अनुभव आले पण हा जो प्रसंग होता अगदीच विलक्षण होता. मला असं झालं हा प्रसंग कोणाला सांगू आणि कोणाला नाही सांगू.
इतका आनंद होत होता आणि भरभरून सगळ्यांना सांगावं आणि ओरडून ओरडून सांगावं असं वाटतं होतं. स्वामी महाराज माझ्या दारात येऊन गेले, माझ्या हातचे जेवण करून गेले, माझ्यासमोर बसले होते. मला भरून आलं होतं त्यावेळी असा अनुभव त्या ताईंनी सांगितल आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.