नमस्कार मित्रांनो.
स्वामी भक्तांनो त्या ताईंनी सांगितले आहे मी आणि माझे पती आम्ही दोघेही स्वामी सेवा करतो. आमच्या घरामध्ये स्वामींचे छोटीशी मूर्ती आहे. आणि रोजच्या रोज आम्ही तिची पूजा करतो. अभिषेक सर्व काही स्वामींचा आम्ही करत असतो. स्वामींच्या कृपेने आमच्या सर्व काही व्यवस्थित चालू होत. माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे स्वामींची सेवा केली जाते. त्यानंतर त्या म्हणतात एक एक दिवस असंच माझ्या नवऱ्याला बाहेरगावी जायचं होतं.
त्यांचा जो व्यवसाय होता त्यामुळे त्यांना नेहमी बाहेर फिरावे लागत होते. असंच एक दिवशी त्यांना बाहेरगावी जायचं होतं म्हणून सकाळी मी त्यांना डबा वगैरे करून दिला आणि ते गेले. त्यानंतर दिवसभराची आपली जी कामे असतात. झाडू मारणे कपडे धुणे इतर सर्व कामे दुपारपर्यंत मी आवरून घेतली.
दोन नंतर जेवण करून जवळजवळ तीन वाजल्या होत्या तेव्हा मी म्हटले जरासा पडावा. म्हणून मी दुपारी थोडसं पडली. आणि जेव्हा माझा डोळा लागला तेव्हा मला एक स्वप्न पडलं स्वप्नामध्ये माझी आई आली आई दारामध्ये उभी होती. दारातून ती मला खुणवत होती जणू काय ती मला बोलवत आहे.
स्वप्नामध्येच बोलली घरामध्ये ये ग. ती माझ्याशी एकही शब्द बोलले नाही. फक्त ती हाताने फुलवत होती मला बोलता येत नाही असं खुणवत होती. असं तिच्याकडून खुना करण्यावरून लक्षात आलं. मला काही समजलं नाही आईला काय झालं असेल असं ते स्वप्न पडलं होतं. आई जेव्हा मला खुणवत होते तेव्हा मला अचानक जाग आली. मी खूप घाबरली अरे आईला काय झालं असेल.
स्वप्न तर कधी पडत नाही अस स्वप्न का पडले असेल. असे शंभर प्रश्न माझ्या मनामध्ये येऊन गेले. एक तर सकाळीच माझ्याशी माझ बोलण झाल होत. तेव्हा तर आई व्यवस्थित बोलली होती. तरीही मनातली शंका जावी म्हणून मी आईला फोन लावला. आणि तिला काही सांगितलं नाही अगदी सहज फोन केला अस सांगितल. आई माझ्याशी अगदी व्यवस्थित बोलली. आणि त्यानंतर मनावरच ओझ खाली झाल्यासारखं वाटल.
संध्याकाळी सहा सात वाजले होते तेव्हा माझा नवरा घरी आला. आल्यानंतर मी त्यांना पाणी दिल आणि त्यांनी मला सांगितल थोडा चहा ठेव ग. म्हणून मी चहा करायला गेले. जेव्हा मी चहा घेऊन आले तेव्हा त्यांच्या चेहरा थोडासा वेगळा जाणवला. नंतर ते म्हणाले अग माझी जीभ खूप जड पडले आहे माहित नाही काय झाल. आणि माहित नाही. अचानकपणे मला ते स्वप्न आठवल. अरे दुपारी मला असच काही स्वप्न पडत होतं. आणि माझा नवरा माझ्याशी आता तेच बोलत होता की माझे जीभ जाड झाली आहे.
तर मी काही विलब न करता तातडीने त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. अग काही झाले नाही असे ते म्हणायला लागले लगेच कशाला दवाखान्यात जायचं. त्या क्षणाला एकही शब्द ऐकून घेतला नाही आणि डॉक्टरकडे घेऊन गेले. नशिबाने त्यावेळी डॉक्टर फ्री होते आणि लगेच आमचा नंबर लागला. डॉक्टरांनी जेव्हा चेक केल तेव्हा ते म्हणाले तुम्हाला कसं काय समजलं हे तुमच्या हे लक्षात कसा आलं काय झालं होते. तेव्हा मी डॉक्टरला सांगितले की माझी जीभ जड पडले आहे म्हणून मी त्यांना दवाखान्यात घेऊन आले.
डॉक्टर बोलले तुम्ही जो निर्णय घेतला अगदी वेळेवर घेतला आणि अगदी योग्य घेतला. पाऊण तास उशीर झाला असता तर त्यांना पॅरॅलिसचा झटका आला असता. किंवा तुमच्या हाताबाहेर ही परिस्थिती निघून गेली असती. असे जेव्हा डॉक्टर म्हटले तेव्हा मी आणि माझे मिस्टर अगदी शॉक झालो. आणि मला माझ्या डोळ्यासमोर शाहारा आला आणि माझ्या डोळ्यासमोर स्वामी दिसले.
दुपारी जे स्वप्न पडल होत ते सारख माझ्या डोळ्यासमोर फिरत होत. त्यामुळे घरी आल्यानंतर ना माझ्या मिस्टरांना घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. डॉक्टरने सर्व औषध गोळ्या दिल्या होत्या त्यामुळे काही घाबराचे कारण नव्हते. तेव्हा मी त्यांना सांगितले हा मला संकेत दुपारी स्वामिनी येऊन दिला होता. त्यामुळे मी तुम्हाला तातडीने दवाखान्यात घेऊन गेले.
असा प्रसंग घडलेल्या सर्व प्रकार त्यांनी शब्दात मांडला. तर भक्तांना स्वामी कशा रूपात येतील काय संकेत देतील कधी दर्शन देतील हे काय सांगता येत नाही. या ठिकाणी आपल्यामध्ये तेवढी कुवत पाहिजे की ते आपल्याला ओळखता यावे. या ठिकाणी ताईंना संकेत आला आणि जे पुढे घडणार होत.
त्यावेळी त्या सावध झाल्या आणि त्यातून त्या बाहेर निघाल्या. जर त्यांनी ते ओळखलं असतं तर आज त्यांचा संसार उध्वस्त झाला असता. तर फक्त होळकरणीने सांगण्याचा उद्देश एकच आहे स्वामींची भक्ती मनापासून केली तर अनुभव प्रचिती नक्की येते आणि काही जर संकट येणार असेल तर त्या संकटाला सामोरे कसं जायचं हे स्वामी आपल्याला सांगतात. फक्त ते ओळखता आला पाहिजे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.