नशीब पालटण्यासाठी वेळ लागणार नाही २०२३ मध्ये या ६ राशींच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार शनिदेव.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनावर जेव्हा शनीची कृपा बरसते, तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. जीवनामध्ये जर प्रचंड यश प्राप्त करायचं असेल, जीवनामध्ये मोठं काही साध्य करून दाखवायचं असेल, तर मनुष्याच्या जीवनावर शनीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषानुसार या सहाराशी त्यासाठी २०२३ हे वर्षअतिशय अनुकूल ठरणार असून या वर्षांमध्ये भगवान शनीची विशेष कृपा या सहा राशींच्या जीवनावर बसण्याची संकेत आहेत.

आता यांच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत. भगवान शनीच्या कृपा कृपेमुळे यांच्या जीवनात आनंद सुख समृद्धी भरभराट होणार आहे. आता इथून पुढे या सहा राशींच्या जीवनात सुखाचा काळ येणार आहे. भगवान शनि हे कर्मफलाचे दात आहेत. आणि न्यायाचे देवता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. अनेक लोक शनीला क्रूर आणि अशुभ मानतात.

पण असे नाही भगवान शनी हे ज्योतिष्य अनुसार कर्मफलाचे दात आहेत. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. त्यामुळे जे लोक जीवनामध्ये चांगले कर्म करतात अशा लोकांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत, पण जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात वाईट कर्म करतात विनाकारण दुसऱ्यांचे नुकसान करतात अशा लोकांना शनिदेव निश्चित प्रकारे दंडित करतात. शनि एकमेव असे देवता आहेत ज्यांना मोक्षाचे देवता मानले गेले आहे.

शनी हे अतिशय सकारात्मक मानले जातात. शनीची कृपा जर आपल्याला प्राप्त करायचे असेल तर, आपले कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण नेहमी चांगले कर्म करणे आवश्यक आहे. २०२३ या नवीन वर्षात शनी या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न होणार असून, त्यांच्या जीवनातील दारिद्र्य आता समाप्त होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील संकटाचा काळ आता बदलणार असून, सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट या राशींच्या जीवनावर होणार आहे. चला पाहूयात कोणत्या आहेत त्या सहा भाग्यवान राशी.

१) मिथुन रास- मिथुन राशि वर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत शनीच्या आशीर्वादाने सुख-समृद्धीचे भरभराट आपल्या आयुष्यात होणार आहे. इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आता भाग्य आपल्याला साथ देणार असून आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.

जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे त्यामुळे शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे आपल्यासाठी शुभ ठरेल. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे तील काळे उडीद अर्पण करणे शुभ ठरू शकते. या काळामध्ये शनि चालीसा पाठ करणे आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकते. हा काळ अत्यंत अनुकूल आणि आपल्या भरभराटीचा काळ असल्यामुळे आपल्याला आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक कामांमध्ये सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. जेवढे सुंदर आपले कर्म असतील तेवढेच फळ आपल्याला सुंदर प्राप्त होईल.

२) सिंह रास- सिंह राशि वर भगवान शनि चे विशेष कृपा बरसणार आहे. शनिदेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मानसिक ताण तणावापासून आपण पूर्णपणे मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

नोकरीमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. नोकरी विषयी कॉल आपल्याला येऊ शकतो. २०२३हे वर्ष सुखाचे जाणार असून, कोर्ट कचऱ्यातील कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. सरकारी कामांमध्ये देखील यश प्राप्त होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करणार आहात. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल . मागील अनेक दिवसांच्या अपुऱ्या इच्छा आता पूर्ण होतील. या काळामध्ये आपल्याला आपल्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा घडवून आणावी लागेल.

आपल्या स्वभावामध्ये महत्त्वपूर्ण बदल देखील आपल्याला घडवून आणावी लागतील. प्रत्येक शनिवारी शनि देवाच्या नावाने गरजू लोकांना काळे वस्त्र दान करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. शनि चालीसा पाठ करणे किंवा शनी मंत्राचा जप करणे आपल्यासाठी लाभदायक ठरेल. आर्थिक देवाण-घेवाण करताना सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. या काळामध्ये एखाद्या नवीन व्यवसाय जर आपल्याला सुरू करायचा असेल, तरीदेखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. इथून पुढे भाग्य देखील मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. शनीचे विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. शनि अतिशय शुभ फल देणार आहेत. एखादा नवीन व्यवसाय एखादी नवीन कल्पना आपल्याला सुचणार आहे. नवीन कामावर लक्ष केंद्रित करणार आहात. आणि त्यामध्ये आपण जर सातत्य ठेवले तर मोठे यश प्राप्त होऊ शकते. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे किंवा आपल्या कामांमध्ये जर आपल्याला काही बदल करायचे असतील तर, हा काळ अनुकूल ठरणार आहे.

नातेसंबंध मधुर बनतील घर परिवारामध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये चालू असलेले विवाद आता दूर होणार आहेत. ज्या लोकांच्या विवाह मध्ये अडचणी येत आहेत अशा लोकांचा विवाह लवकरच जुळून येईल. पौर्णिमेनंतर आपल्या जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे . कन्या राशीसाठी इथूनच शनीचा आशीर्वाद आपल्यासाठी बरसणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये आपले कर्म अत्यंत शुभ ठेवणे आवश्यक आहे.

४) तुळ रास- तूळ राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि आपल्याला शुभ फळ देणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होईल. प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होणार आहात नशीब नवी कलाटणी घेईल. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. एखाद्या नवीन उद्योगपतीची किंवा आपल्या एखाद्या जुन्या मित्राची मदत या काळात आपल्याला लागू शकते.

त्यांच्या मदतीने नव्या व्यापाराची नव्या व्यवसायाची सुरुवात आपण करू शकता. घरातील लोकांचे सहकार्य देखील आपल्याला लाभणार आहे. पती-पत्नीमध्ये प्रेम आपुलकी मध्ये वाढ होईल. नातेसंबंध पुन्हा एकदा मधुर बनतील. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. आत्मविश्वासाने केलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. संसारिक जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. प्रत्येक शनिवारी शनि देवाच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे.२०२३ पासून एका नव्या व्यवसायाची किंवा नव्या कामाची सुरुवात आपण करू शकता. नवीन योजना नवीन कल्पना आता साकार होणार आहेत. आपल्या मनाला एक सकारात्मक प्रेरणा प्राप्त होणार आहे. मोठे ध्येय गाठण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा योग्य वापर करून यश आपण प्राप्त करणार आहात. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि शनीचा आशीर्वाद आपले स्वतःचे प्रयत्न मिळून जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येईल.

प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. प्रेमाचे नवीन नाते आता निर्माण होणार आहे, त्यामुळे मन अतिशय आनंदित राहणार आहे या काळामध्ये प्रेमविवाह देखील जमून येऊ शकतात. २०२३ हे वर्ष आपल्या जीवनातील अतिशय सुंदर आणि प्रगतीचे वर्ष ठरू शकते. आपल्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. आत्मविश्वासाने नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात करणार आहे. प्रत्येक शनिवारी शनि चालीसा पाठ करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि आता आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत, त्यामुळे हा काळ जीवनाला वेगळ्या प्रगतीवर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. आता जीवनातील दुःख दारिद्र्याचा काळ समाप्त होणार असून, धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करणारा हा नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार असून, शुभ काळाची सुरुवात होणार आहे त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

प्रत्येक प्रयत्न फळाला येतील या काळामध्ये आपल्या वाणीमध्ये आपल्याला सुधारणा करावी लागेल. आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर मनातील गुपित गोष्टी कोणालाही सांगू नका. आर्थिक व्यवहार अतिशय दक्ष पद्धतीने करावे लागतील. सरकारी कामांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होईल. मनासारखी नोकरी या काळामध्ये मिळू शकते. विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये गोडवा निर्माण होईल. प्रेम जीवनात देखील आता यश प्राप्त होणार आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आता लाभ होऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *