या ७ सोप्या गोष्टी करतील तुमच्या आयुष्याच कल्याण. आयुष्यात आर्थिक दृष्टीने मजबूत व्हायच असेल तर या गोष्टी करायला विसरू नका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मी आज तुम्हाला अशा ७ गोष्टी सांगणार आहे त्यातली एखादी गोष्ट जरी तुमच्या हातून घडलीना तरी तुमच्या सात पिढ्यांचा कल्याण होणार आहे. तुम्ही पुंण्याची एक एफडी स्वतःसाठी बनवताय अस म्हणायला हरकत नाही. जी तुमच्या सोबत सदैव असणार आहेत. कोणत्या आहेत त्या ७ गोष्टी चला जाणून घेऊया.

मित्रांनो कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रंथ भेट द्या. जेव्हा जेव्हा कोणी त्या ग्रंथाचे पठण करेल तेव्हा तेव्हा पुण्य तुम्हाला मिळेल हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर रुग्णांची सेवा करण ही सगळ्यात मोठी सेवा आहे. म्हणून एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णांची सेवा करणाऱ्या एखाद्या संस्थेमध्ये विलचेअर दान करा. जेव्हा जेव्हा कोणी रुग्ण त्या विलचेअरचा उपयोग करेल पुण्य तुम्हाला मिळेल.

कोणत्याही अन्नक्षेत्रासाठी तुम्ही एखादी एफडी बनवून द्या. त्याच्या व्याजावर कोणाच तरी पोट भरेल आणि पुण्य तुम्हाला मिळेल. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वॉटर कुलर लावा किंवा एखाद्या स्वच्छ पाण्याचा माठ तरी भरून ठेवा. नेहमीच पुण्य मिळत राहील. अहो पाणी पाजण्या इतक मोठ पुण्य कुठलच नाही.

एखाद्या अनाथाला शिक्षित करा. म्हणजे एखादा मुलगा असेल मुलगी असेल जी अनाथ आहे जे शिकू शकत नाही. तिच्या शिक्षणासाठी थोडा खर्च करा किंवा तिच्या शिक्षणासाठी जी कुठली सुविधा तुम्हाला पुरवता येईल ती पुरवा.

त्यामुळे काय होईल त्याची येणारे पिढी सुद्धा तुमच्या सुखाची प्रार्थना करेल. तो मुलगा किंवा ती मुलगी शिकली तर त्याच्या पुढच्या पिढ्यांचा उद्धार होईल. आणि तुमच्या हातून केवढ मोठ पुण्या घडेल. त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांनाही परोपकारी बनवा. सदैवच पुण्य मिळत राहील.

तुमची मुलं सुद्धा तुमच्यासारखी परोपकारी बनली तर ते सुद्धा अशाच प्रकारचे दानधर्म करत राहतील. आणि तुमच्या पुढच्या मागच्या सात पिढ्या उद्धार होऊन जातील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा या गोष्टी सांगा. त्यातला एकाने जरी तुमचा ऐकलं तरी सुद्धा पुण्य तुम्हाला मिळेल.

तुमच्या नावाने पुण्याच झाड लागत राहील आणि तुम्हाला फळ मिळत राहतील. म्हणूनच म्हणते थांबू नका निरंतर चालत रहा. मित्रांनो थोडा विचार करून बघा. यातली एखादी गोष्ट जरी तुम्ही करू शकलात तरी सुद्धा ती तुमच्याच फायद्याची आहे. आपण ग्रह पिळा वास्तु पिडा अशा पिढ्यांनी जेव्हा त्रस्त असतो तेव्हा मग काहीतरी उपाय करायचा बघतो. मग ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राची मदत घेतो.

त्यात सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही दान करा. तुम्ही अमुक अमुक व्यक्तीला अमुक अमुक गोष्ट द्या. आणि मग तुमचे ग्रहमान ठीक होईल. पण मी काय म्हणते आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तुम्ही असा जर पुण्याचा साठा सतत करतच गेलात तर समस्या येणारच नाही.

आजार तुम्हाला होणारच नाही. म्हणूनच जिथे गरज आहे तिथेच दान करा. जिथे ज्या वस्तूची गरज आहे. तिथे तीच वस्तू द्या. दान करताना सुद्धा समोरच्या व्यक्तीची गरज लक्षात घेणे गरजेच आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *