मकर संक्रांतीला सूर्य आणि शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी करा हे प्रभावी उपाय. तुमच्या आयुष्यातील १००% साडेसातीचा त्रास संपेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी जेव्हा सूर्य दुसऱ्या राशीत परिवर्तन करतो त्या परिवर्तनाला संक्रांती असे म्हणतात. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रात हा सण १५ जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. हे हिवाळा आणि अंधाराच्या समाप्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. हा सण वसंत ऋतुच्या आगमनाचे प्रतीक आहे. भारतीय परंपरेतील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो.

या दिवशी सूर्यग्रहण महिनाभरासाठी शनीच्या घरात प्रवेश करतो. मान्यतेनुसार मकर संक्रांति सन २०२३ नुसार हा खास असणार आहे. कारण या काळात हे दोन्ही ग्रह ३० वर्षानंतर मकर राशीतच असतील. ग्रहांच्या या योगाचा आपल्या जीवनावर परिणाम होणार आहे. एकाच राशीत दोन विरुद्ध ग्रहांची उपस्थिती ही सर्वात मोठी घटना आहे. कारण हे ग्रह क्वचितच एकत्र येतात.

पण जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा काही असामान्य घटना घडण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊयात सूर्यदेव आणि शनिदेव यांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत. मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे दान अवश्य करा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करा. आणि नंतर तांब्याच्या भांड्यात सूर्यदेवाला पाणी लाल फुल, तीळ इत्यादी अर्पण करा.

पाणी अर्पण करताना (ओम गुणी सूर्याय नमः) या मंत्राचा जप करत रहा. आणि तुमची नजर पडणाऱ्या पाण्यात परावर्तित सूर्याच्या किरणांवर असेल याची काळजी घ्या. तसेच या दिवशी सूर्याच्या संबंधित वस्तू जसे तांबे, गहू, गुळ, केशर, खसखस, तूप, गुलाबी रंगाचे कापड मीठ, कापूस, लोकरीचे कपडे इत्यादी दान करा. असे केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते. आणि व्यक्तीला सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. सूर्य आणि शनि देवाची कृपा प्राप्त होण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, खिचडी आणि धार्मिक पुस्तकांचे दान करणे शुभ मानले जाते. खिचडी बनवून गरीब आणि गरजू लोकांना खायला द्या. तसेच तीळ व धार्मिक पुस्तके दान करा. तसेच भगवान विष्णूंना तीळ अर्पण करावेत असे केल्याने घरात सुख शांती लाभ राहते आणि धनात वृद्धी येते. या दिवशी शनि देवाला पूजा करून काळे तीळ आणि तिळाचे लाडू खाल्ल्याने सूर्य आणि शनी दोघांची कृपा आपल्यावर राहते.

घरामध्ये धनसंपत्ती मुबलक राहावी यासाठी हा उपाय करा मकर संक्रांति च्या दिवशी मूठभर काळे तीळ घेऊन घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावर सात वेळा फिरवून घराच्या उत्तर दिशेला टाकावेत असे केल्याने घरात समृद्धी राहते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. यासोबतच काळा तिळाचे लाडू ,लोकरीचे कपडे, काळे तीळ, रेवडी दान करणे पुण्यकारक मानले जाते. कारण या गोष्टी सूर्य आणि शनीशी संबंधित मांडल्या जातात.

महालक्ष्मी प्रसन्न साठी हा उपाय करा. संक्रातीच्या दिवशी सकाळी १४ कवड्या घ्या आणि दुधात केशर मिसळून त्यांना आंघोळ घालून मग त्या कवड्या गंगेच्या पाण्याने स्वच्छ करून लाल कपड्यात महालक्ष्मी समोर ठेवा. त्यानंतर दोन दिवे लावा एक तुपाचा दिवा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा दिवा लक्ष्मीदेवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवा आणि डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा ठेवावा हातात घेऊन. (ओम संक्रांतीय नमः) या मंत्राचा जप चौदा वेळा करावा.

त्यानंतर दुपारी १२ वाजता शंख उचलून पर्स किंवा कपाटात ठेवावा. नंतर दिव्याचे स्थान बदला उजवीकडचा डावीकडे ठेवा व डावीकडचा उजवीकडे ठेवा आणि दिवा सतत तेवत ठेवा. संध्याकाळी दारावर तुळशीला तुपाचा दिवा व तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. आणि घरात कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही.

कुंडलिक सूर्य आणि शनीची स्थिती बलवान करण्यासाठी हा उपाय करा. मकर संक्रांतीच्या दिवशी गाईंना हिरवा चारा खायला द्यावा. तसेच पक्षांना सुद्धा धान्य खायला द्या. असे केल्याने चंद्र आणि शुक्र दोष दूर होतात. तसेच त्यांच्या कुंडलीतील स्थान सुद्धा मजबूत होतात.

तसेच पितरांच्या शांतीसाठी या दिवशी पाणी अर्पण करावे. पित्रान जल अर्पण केल्याने घरात आरोग्य सुख शांती येथे आणि पितरांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो. सुख आणि समृद्ध वाढीसाठी सौभाग्यवती महिलांनी १४संकेत सौभाग्याच्या वस्तू दान कराव्यात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *