या ५ वस्तू कधीही फुकट घेऊ नका नाहीतर शनि देवांची नाराजी येईल. भयंकर साडेसातीचा त्रास सहन करावा लागू शकतो.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

सूर्यपुत्र शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत एखाद्या व्यक्तीने गरीब गरजू व लाचार व्यक्तीला त्रास दिला कोणाचे नुकसान केले कोणाचा अपमान केला तर त्या व्यक्तींना शनि देवाच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. ते कोणाच्या कुंडलीत जाऊन बसले त्यांना खूप त्रास देतात परंतु जे व्यक्ती चांगल्या स्वभावाचे आहेत गरीब आहेत जे त्यांना त्रास देत नाहीत त्यांच्यासाठी शनिदेव वरदानच आहे. अशा व्यक्तींना शनिदेव कधीही त्रास देत नाही.

देवांशी संबंधित काही नियम आहेत आणि जर आपण या नियमांचे पालन केले नाही तर शनि देवांच्या क्रोधाचा आपल्याला सामना करावा लागतो. अशा काही वस्तू आहेत ज्या कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नयेत . त्या वस्तूंची योग्य किंमत देऊनच त्या वस्तू घ्याव्यात. जर या वस्तू आपण कोणाकडून फुकट घेतल्या तर शनि देवांच्या क्रोधाचा सामना आपल्याला करावा लागतो. शनिदेव आपल्यावर नाराज होतात म्हणून या वस्तू पैसे देऊनच घ्या. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या वस्तू.

१) तेल- शनि देवांना तेल अर्पण केले जाते. तसेच त्यांच्या पुढे राईच्या तेलाचा दिवा लावला जातो कोणाकडून फुकट तेल घेतल्यास शनिदेव आपल्यावर नाराज होतात म्हणून कधीही कोणाकडूनही तेल फुकट घेऊ नये. किंवा तेलाचे पैसे बुडवू नयेत. यामुळे शनि देवांच्या अशुभदृष्टीपासून आपला बचाव होतो.

२) लोखंड- संबंधित आहे म्हणून लोखंड हा धातू शनी देवांशी संबंधित आहे म्हणून हे कोणाकडूनही फुकट घेऊ नये. लोखंडी सामान अवजारे फर्निचर काहीही असेल तर त्याचे पूर्ण पैसे देऊन मगच या वस्तूंची खरेदी करावी. तसेच शनिवारी लोखंडाची खरेदी करणे ही टाळावे शनिवारी लोखंडाची खरेदी विक्री करणे अशुभ मानले जाते. लोखंड कोणाकडून फुकट घेतले तर आपली आर्थिक स्थिती बिघडते. आपल्या उत्पन्नावर परिणाम होतो. पैशाची चणचण निर्माण होते.

३) उडदाची डाळ किंवा उडीद- उडदाची डाळ किंवा उडीद हे शनि देवांना अर्पण केले जातात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात परंतु ही फुकट घेऊ नये यामुळे आपल्याला शनिदोष लागू शकतो तसेच शनिवारी शनि मंत्राचा जप करावा. त्यामुळे ही शनिदेव प्रसन्न होतात व शनीदोष यापासून आपली सुटका होते .

४) पांढरे तीळ- पांढरे तीळ कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नयेत. जर आपण कोणाकडून पांढरे तीळ फुकट घेतले तर आपल्याला शनि देवांच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. आपण कोणाकडून तीळ फुकट घेतले तर शनि देवा ण दोष आपल्या आपण फुकट उडवून घेतल्यासारखे होते. जर आपल्या कुंडलीत शनि दोष असेल.

शनिदेव अशुभस्थितीत असतील तर अशा अवस्थेत कधीही ही चूक करू नये. तिळाचे योग्य मूल्य देऊनच तीळ खरेदी करावेत . शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. आणि कोणावर अन्याय झालेला शनिदेवांना रुचत नाही. म्हणून कधीही कोणावर अन्याय अत्याचार करू नये. कोणाकडूनही फुकट काम करून घेऊ नये. सेवा करून घेऊ नये.

५) मीठ- मीठ कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नये. मीठ शनि देवांना अर्पण केले जाते. यामुळेही आपला शनीदोष नष्ट होतो. परंतु मिठाचेही पैसे आपण जर बुडवले तर शनिदेव आपल्याला बुडवतात. मित्रांनो या वस्तू आहेत ज्या कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नयेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *