२०२३ राशीनुसार करा ‘हे’ उपाय; लक्ष्मीची कृपा नक्की. लक्ष्मी योगामुळे ९२ वर्षानंतर जुळून येत आहेत हे शुभ योग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

येणार नवीन वर्ष हे तुमच्यासाठी चांगलं जावं असं तुम्हाला वाटतंय का? या येणाऱ्या वर्षी तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहावी, अशी तुमची इच्छा आहे का? असं असेल तर तुमच्या राशींवर हे उपाय करा. त्याचा परिणाम नक्कीच होईल. पण राशींवर काय उपाय करावे. चला जाणून घेऊया.

नवीन वर्ष आपल्यासाठी मंगलमय जावो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठीच आपण जर राशीनुसार खास उपाय केले, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. असे ज्योतिष शास्त्र सांगते.

१) मेष रास आणि वृश्चिक रास- त्यानुसारच मेष,वृश्चिक या राशींचा स्वामी आहे मंगळ. या दोन्ही राशींच्या व्यक्तींच्या जीवनात अडथळे, संकटे आणि समस्या असतील तर दर मंगळवारी पक्षांना अन्नदान करा. असं केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. माता लक्ष्मी तुमची सर्व संकटे दूर करेल. लक्षात घ्या हा उपाय तुम्हाला वर्षभर करायचा आहे.

२) वृषभ रास आणि तुळ रास- या राशींचा स्वामी आहे शुक्र. शक्य असल्यास दर शुक्रवारी गोमातेस किंवा पक्षांना अन्नदान करा. असं केल्याने सर्व समस्या,अडचणी दूर होतील. अशी मान्यता आहे.

३) मिथुन रास आणि कन्या रास‌- या राशींचा स्वामी आहे बुध. राहू ग्रह सुद्धा कन्या राशीचा स्वामी मानला जातो. या राशींच्या व्यक्तींनी गोमाता आणि पक्षांना अन्नदान कराव. याशिवाय शक्य असल्यास, दर बुधवारी ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.

आणि विष्णू सहस्त्र नामाचे पठण करावे. याशिवाय तुमचा काही गुरु मंत्र असेल, तर त्याचाही जप आवश्यक करावा. यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता. आणि करू शकता उपाय मात्र सातत्याने वर्षभर करणं आवश्यक आहे.

४) कर्क रास- कर्क राशीचा स्वामी चंद्र मानला जातो. कर्क राशींच्या व्यक्तींना शक्य असल्यास प्रत्येक सोमवारी त्यांनी पक्षांना अन्नदान करावे. त्याचबरोबर सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. शक्य असल्यास गंगाजल अर्पण करा. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करा. तसेच प्रत्येक पौर्णिमेला अर्घ्य अर्पण करा. अर्घ्य अर्पण करणे म्हणजे जल अर्पण करणे.

५) सिंह रास- सिंह राशीचा स्वामी सूर्य मानला जातो. सूर्याला रोज अर्घ्य द्यावे. म्हणजे रोज सकाळी सूर्य उगवायच्या वेळेला जल अर्पण करावे. शक्य असल्यास या राशींच्या लोकांनी दर रविवारी पक्षांना अन्नदान करावे. गोमातेलाही अन्नदान द्यावं. गोमाता न मिळाल्यास एखाद्या गरिबाला अन्न द्यावं. तसंच गुरु मंत्राचा भरपूर जप करावा.

६) धनु रास आणि मीन रास- धनु आणि मीन स्वामी गुरु आहे. त्याचबरोबर केतू ग्रही मीन स्वामी मानला जातो. धनु आणि मीन राशींच्या लोकांनी गुरुचा आदर करावा. आई-वडिलांना वाईट बोलू नये. तसेच गुरु मंत्राचा जप करावा.

७) मकर रास आणि कुंभ रास – मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनि. या लोकांनी शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करावे. आणि दर शुक्रवारी लक्ष्मीला गुलाबाचे फुल अर्पण करावे.

मंडळी हे उपाय अगदी साधे सुद्धा आहेत. तुमच्या राशीनुसार यातला कुठलाही एक उपाय निवडा आणि तो वर्षभर नवीन वर्ष चालू झालं, पहिल्या दिवसापासून अगदी पूर्ण वर्षभर करा. यामुळे काय होईल माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. तुमच्या हातून सत्कर्म घडेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *