नमस्कार मित्रांनो.
मंडळी हिंदू धर्म भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात. म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात. ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तिथे सुख आणि समृद्धी वास करत असते. असं म्हणतात तर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र, भांग, धतुरा यांसारख्या वस्तू अर्पित केल्या जातात.
मात्र काही वस्तू महादेवाला वाहन वर्ज मानलं जातं. त्यासोबतच आपल्यावर ही भगवान शिवाची कृपा व्हावी यासाठी उत्साहाच्या भरात काही चुकीचं गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना? याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आणि म्हणून पूजा करताना काही चुका अजिबात करू नका त्या कोणत्या चला जाणून घेऊयात.
शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही. आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असाल तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असूच शकत नाही. भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचा ही जप करावा. मात्र या काही वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नये .
१) शंख- शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंकासूर नावाच्या असुराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते आणि म्हणून शंकरांना कधीही शंख अर्पण करू नये.
२) हळदी कुंकू- भगवान शंकर आ जन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगारशी संबंधित कोणत्याही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. त्यामुळेच हळदी किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. मात्र याच गोष्टी भगवान विष्णू ना अर्पण केल्या जातात हळद हिंदू धर्मातील प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला विशेष महत्त्व दिले गेले पण शिवलिंगावर हळद अर्पण करू नये.
धर्मानुसार शिवलिंग हे पुरुष तत्त्वाचे प्रतीक आहे. आणि हळदीला ही सौंदर्यवर्धक मानलं जातं. असं मानलं जातं की शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होतो. हिंदू धर्मात कुमकुम आणि सिंदूर विशेष महत्त्व आहे . स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुमकुम किंवा सिंदूर लावतात. तसेच काही लोक शिवलिंगाला सिंदूर अर्पण करतात . शिवपुराणा सांगितलं जातं की शिवलिंगला चुकूनही कुंकू लावू नये.
३) तुळशीपत्र- असुरांचा राजा जलंदर यांच्या विषयी असलेल्या एका कथेनुसार, त्याची पत्नी रुंदा तुळशीचे रोपट म्हणून गेली होती. भगवान शंकरांनी जलंदराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा वृंदावनाने पण केला होता अस म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीला मात्र वैकुंठ चतुर्दशीचे हरिहर चे मिलन म्हणून भगवान शंकर तुळस वाहतात. तर भगवान विष्णूंना बेल वाहिल जात.
४) नारळ पाणी- नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. त्याला लक्ष्मीचा रूप मानलं जातं म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते. आणि नारळाचे पाणी निर्माल्य होऊ नये, हे त्या मागचं शास्त्र आहे.
५) उकळलेले दूध- उकळलेले दूध किंवा बाजारात मिळलेले पॅकेट मधले दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजल आणि अभिषेक करावा. किंवा बाजारात मिळलेले पॅकेट मधले दूध उकळलेलेच असते त्यामुळेच त्याचा वापर करणे ही टाळावे .
६) केवड्याचे फुल- भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवढ्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता आणि म्हणून भगवान शंकरांना केवड्याचे फूल अर्पण करू नये.
तर मंडळी भगवान शंकरांना देवांचे देव म्हणून ओळखले जाते. भोळा शंकर ,महादेव, शिव अशा वेगवेगळ्या नावाने भक्त त्यांना साथ घालत असतात. महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळावा हे प्रत्येकासाठीच शक्य आहे. त्यामुळेच तर हिंदू पुराणातील कथेनुसार ते राक्षसांवर सुद्धा प्रसन्न व्हायचे, आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिले गेले आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.