नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो वर्ष २०२२ जवळजवळ संपलं म्हणायचं. आता हे वर्ष कसं गेलं हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही. कारण हे वर्ष गेलं तसं गेलं. पण येणारे वर्ष २०२३ हे तरी कसं चांगलं जाऊ असं तुम्हाला वाटतंय का? या नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन घडावं काहीतरी चांगलं घडावं असं तुम्हाला वाटतंय का? असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा.
चला आता बघूया २०२३ हे वर्ष चांगलं जावं सुख समृद्धीने भरलेलं जावं असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात काही वस्तू लगेच बाहेर फेकायचे आहेत. लगेच म्हणजे अगदी लगेच बर का. अगदी नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी हे काम करा. अहो पण कुठल्या वस्तू सांगते सांगते.
१) बंद पडलेली घड्याळे- तुमच्या घरात जर तुम्ही वापरत नसलेली,बंद पडलेली घड्याळ किंवा वरची काच फुटले पण ते चालू आहे आशा परिस्थितीतील घड्याळे असतील कृपया तर ते आजच लगेच बाहेर फेका. कारण बंद पडलेली, तुटलेली घड्याळ तुमच्या नशिबात अडथळे आणतात. म्हणून सांगते अशी घड्याळ लगेच बाहेर टाका. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे घड्याळ घरात नको.
२) तुटलेले फर्निचर- एखादी खुर्ची तुटले, एखादा सोपा तुटलाय तो अडगळीत कुठेतरी पडलाय. किंवा काहीतरी खराब झालय. इलेक्ट्रॉनिक ची वस्तू आहे. आणि हे तुटलेले सर्व सामान तुम्ही घराच्या कोपऱ्यात टाकलेले असेल, तर आता ते नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधी बाहेर काढा.
कारण नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला उत्साहाने करायची असेलआणि माता लक्ष्मीचे आगमन तुम्हाला तुमच्या घरात व्हावं तुम्हाला वाटत असेल. तर या वस्तू तुम्ही घरातून बाहेर काढायलाच हवेत. कारण तरच तुमची नवी सुरुवात होऊ शकते. नवीन वर्ष येऊन सुद्धा तुमची परिस्थिती जैसे तैसे राहणार त्यात काय शंकाच नाही.
३) तुटलेले चपला आणि बूट- जुना चपला ज्या तुटला आहेत ज्यांची झीज झाली. त्या कशाला ठेवायचे. त्या चपला आजच बाहेर काढा. अशा वस्तू फेकून दिल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न मुद्रेने येते. आणि आपले घर धनधान्यांनी भरून जाते.
हे आपल्याला दिवाळी सुद्धा सांगितले जाते की, घराची साफसफाई करा. कारण तरच माता लक्ष्मी घरात येते. मंग आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. तर त्याआधी तुम्ही या वस्तू घरातून बाहेर काढायलाच हव्यात.
४) फुटलेली काच- तुमच्या घरात फुटलेली काच पडले का बघा. किंवा कुठल्या काचेला तडा गेलाय. आरशाला तडा गेलाय का. किंवा असा एखादा कप आहे का जो अर्धवट फुटलेला आहे. किंवा त्याचे टोक उडाले किंवा त्याची दांडी उडाली. आशा फुटक्या, तुटक्या वस्तू सुद्धा तुम्ही आधीच घराबाहेर काढा.
तरच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. घर स्वच्छ राहील तर तुमचे मन प्रसन्न राहील. प्रसन्न मनामध्ये सदविचार येतील. सद विचारातून चांगली कृती घडेल. त्या कृतीतून तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच सुख समृद्धी मिळेल.
नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.