‘येथे’ बांधा काळा दोरा, कसेही नशिबात असू द्या, चमकणार म्हणजे चमकणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

दृष्ट लागू नये म्हणून काळा दोरा बांधला जातो. पण या कारणकाळात महत्व आहे तरी काय, काळा दोरा नक्की कुठे बांधावा, कसा बांधावा. हे बांधण्यामागचं कारण नक्की काय आहे. मित्रांनो,काळा रंग नेहमीच अशुभ मानला जातो. या रंगाची अशुभ म्हणून ओळख आहे. काळया रंगाचे कपडे घालने किंवा काळा रंगाची वस्तू विकत घेणे अशुभ मानले जाते.

संक्रात सोडून इतर वेळी मात्र एखाद्याची वाईट नजर लागते तेव्हा असे म्हणतात, तेव्हा काळा रंगाला महत्त्व प्राप्त होते. ही नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ येऊ नये. सकारात्मक ऊर्जेचा संचार सतत रहावा यासाठी काळा दोरा बांधला जातो. नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी अनेकजण काळया धाग्यामध्ये देवाचा फोटो लॉकेट करून गळ्यात घालतात.

लहान बाळांना सुद्धा हा काळा धागा बांधला जातो. इतकंच काय तर कळ्या रंगाचा टिळा सुद्धा त्यांना लावला जातो. अगदी प्राचीन काळापासूनच हा उपाय आपले पूर्वज करत आलेले आहेत. आपले शरीर पंचतत्वांनी मिळून बनलेले आहे. ही पंचतत्वे म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नि,जल आणि आकाश यांपासून आपल्याला मिळणारी सकारात्मक ऊर्जा शरीराला उपयोगाला येते.

ज्यावेळी आपल्याला नजर लागते असे म्हणतात, तेव्हा या ऊर्जेमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरालाच नाही तर आपल्या कुटुंबावर सुद्धा होतात. अशी मान्यता आहे. आपला उद्योग धंदा अडचणीमध्ये येतो किंवा अचानक संकटे येऊ लागतात. सगळे चांगले चालत असताना अचानक काहीतरी घडते तेव्हा आपण म्हणतो कोणाची दृष्ट लागले कोणास ठाऊक म्हणूनच या काळा दोऱ्याचा उपाय बघणार आहोत.

जो केल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. आपण मंगळवारी किंवा शनिवारी बाजारातून रेशमी किंवा सुती काळया रंगाचा धागा किंवा दोरा विकत घ्यायचा आहे. दोन दोरे विकत घ्या. संध्याकाळी हनुमानाच्या मंदिरात जा. आणि हनुमानाच्या चरणाशी हे दोरे ठेवा. हनुमानाचे दर्शन घ्या आणि नंतर दोन दोऱ्यांना नऊ गाठी मारायच्या आहेत. पहिल्या दोऱ्याला नाव गाठी आणि दुसऱ्या दोऱ्याला गाठी मारायच्या आहेत.

त्यानंतर बजरंगबलीच्या चरणाचा जो शेंदूर आहे तो शेंदूर या गाठीला आपण लावायचा आहे. आणि दोन्ही दोरे आपण घरी घेऊन यायचे आहेत. घरी आल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे. प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वाराला जर बांधता आलं तर चांगलीच गोष्ट आहे. यातला एक दोरा प्रवेशद्वाराला बांधायचा आहे. जर त्या ठिकाणी आपल्याला बांधव शक्य नसेल, तर आपण आपल्या घरातील तिजोरी किंवा तुम्ही कुठे पैसे ठेवतात त्या ठिकाणी हा दोरा बांधू शकता.

हा दोरा बांधता येत नसेल तर तुम्ही चिकटपट्टीने हा दोरा चिटकू शकता. आणि दुसरा जो दोरा आहे तो आपल्या हातामध्ये बांधा. किंवा पायामध्ये किंवा पायामध्ये किंवा गळ्यात सुद्धा घालू शकता. हा उपाय केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहते. असं म्हटलं जातं. कोणाची ही दृष्ट लागत नाही. वाईट नजर लागत नाही. वाईट विचारांचा परिणाम आपल्यावर होत नाही.

आपल्या कुटुंबाचा रक्षण होतं. असं म्हटलं जातं. आणि जर नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून लांब राहिली, तर आपोआपच आपली प्रगती होते. आपला उद्योग धंदा तेजीत चालतो. आपण करत असलेल्या कष्टांना फळ यायला लागते. आपण घेत असलेल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला यश मिळायला लागते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *