२०२३ मध्ये मीन राशीची साडेसाती होणार सुरू, होणार नवा जन्म..! या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२०२३ या नवीन वर्षामध्ये मीन राशीला साडेसाती सुरू होणार आहे. पण मग ही साडेसाती मीन राशीसाठी कशी असेल, त्याचबरोबर उपाय काय करायचे आहेत? बाकी २०२३हे वर्ष मीन राशीसाठी कसं असेल. जाणून घेऊयात. २०२३ ह्यावर्षी मीन राशींच्या लोकांना आर्थिक चढउतारांचा सामना करावा लागेल.

वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल राहील. आणि आर्थिक समतोल राखला जाईल. पण हळूहळू परिस्थिती बदलेल.१७ जानेवारीपासून तुम्हाला साडेसाती सुरू होईल. साडेसाती या शब्दाला आपण घाबरतो पण घाबरायचं कारण नाही कारण आम्ही तुम्हाला उपायही सांगणार आहोत.

तर साडेसातीचा प्रभाव नक्की कोणत्या गोष्टींवर होणार आहे तर मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक खर्च वाढेल. मुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. या काळात तुम्हाला आर्थिक समतोल राखणं खूप कठीण जाईल. कारण तुमचे काही खर्च वर्षभर सारखे चालतच राहतील. आणि इतकच नाही तर ते खर्च असे असतील की ते टाळता येणार नाही. ते तुम्हाला करावेच लागतील.

२२ एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंतचा काळ थोडा त्रासदायक असू शकतो. काळात तुम्हाला योग्य आणि आर्थिक सामंजस्य प्राप्त करावा लागेल. त्यानंतर परिस्थिती अनुकूल होईल. नोकरी आणि व्यवसायाचा विचार करता यावर्षी मीन राशींच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील. साडेसाती असली तरी सुद्धा वर्षाची सुरुवात चांगली होईल.

तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रशंसा होईल. आणि तुमचं काम पाहून तुम्हाला पदोन्नती सुद्धा दिली जाईल. हा काळ तुमच्या नोकरीसाठी अनुकूल असू शकतो. पण मे ते जुलै या काळात नोकरी गमावण्याची किंवा बदलण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात नोकरीची बदली होऊ शकते.

जर तुम्हाला नवीन नोकरी मिळवायची असेल तर या काळात तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. ज्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी आणि सन्मानही मिळेल. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांची २०२३यावर्षी प्रगती होईल .समाजात ज्येष्ठ अनुभवी व प्रतिष्ठित लोकांचे सहकार्य देखील तुम्हाला मिळेल.

कौटुंबिक बाबतीत विचार करता एक कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाने तुम्ही अस्वस्थ राहाल. तुमच्या स्वतःच्या आरोग्याच्या तक्रारी सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकतात. वैयक्तिक वाद होऊ शकतात किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्य चा अभाव जाणवेल. पण लक्षात ठेवा या सगळ्यांमध्ये तुम्हाला समंजस्याने पुढे जावे लागेल.

आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल. ३० ऑक्टोंबर पासून परिस्थिती जरा निवडेल तुमच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तोपर्यंत थोडा धीर धरा. मित्रांनो लक्षात घ्या की मीन राशींना २०२३ यावर्षी साडेसाती सुरू होत असली तरी संपूर्ण वर्ष खराब असेल असा त्याचा अर्थ होत नाही.

अनेक बाबतींमध्ये अनेक गोष्टींचा लाभही त्यांना यावर्षी मिळू शकेल. लक्षात घ्या की शनी महाराज कर्मफल दाता आहेत. आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतात. या काळामध्ये कुठलेही वाईट काम करायचं टाळा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काही छोटे-छोटे उपाय देखील करू शकता. त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास कमी होईल किंवा त्रासच होणार नाही.

काही उपाय याप्रमाणे-

१)शनी मंदिरात जाऊन तेल वहावे. २) शनी मंदिरात जाऊन रुईच्या पानांची माळ वाहावी. ३) काळया रंगाचे कांबळे शनि देवास अर्पण करावे. ४) शनि देवांना काळे उडीद वाहने. ५) दर शनिवारी मारुती समोर नारळ फोडावा.

६) गोरगरिबांची सेवा करणे. जास्तीत जास्त अन्नदान करावे. ज्यांना गरज आहे त्यांनाच दान करा. ७) गरीब किंवा निराधार व्यक्तीस काढा किंवा निळ्या रंगाचे ब्लॅंकेट द्या. ८) खरं बोलणे दुसऱ्याला न फसवणे. काही गोष्टी तुम्हाला या काळात पाळाव्यास लागतील. या गोष्टींचा पालन केल्यास नक्कीच तुमची साडेसाती सुकर जाईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *