२०२३ मध्ये राहू मुळे ३ राशी होणार मालामाल. नवीन वर्ष या राशीच्या जीवनात घेऊन येणार आनंदाची बहार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

राहू किंवा केतू म्हटल की, आपण आधीच घाबरून जातो कारण राहू केतू कुंडली मध्ये वाईट फळ देतात अस मानल जात. पण तुम्हाला हे माहित आहे का की राहू केतू कधीकधी चांगली फळ ही देतात.२०२३ मध्ये सुद्धा असच होणार आहे. राहु काही राशींच्या लोकांना शुभ फळ देणार आहे. नक्कीच त्यांना लाभ पोहोचणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूयात.

राहू केतू यांना वैदिक ज्योतिकशास्त्र मायावी ग्रह मानलं जातं त्यांचा प्रभाव अचानक दिसून येतो.३० ऑक्टोंबर २०२३ रोजी राहू आणि केतू राशी बदलतील राशी परिवर्तन करतील आणि राहूच्या या राशी परिवर्तनामुळे ३ राशींना लाभ होणार आहे.

१) मिथुन रास- मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू संक्रमण खूपच शुभसिद्ध होऊ शकतात या लोकांना कामाच्या बाबतीत मोठे फायदे मिळू शकतात नोकरीत पदोन्नती होऊ शकते वेतन वाढही मिळू शकतो विशेषतः व्यावसायिक लोकांना याचा जास्त फायदा झालेला बघायला मिळेल.

त्यांचा व्यवसाय वाढेल भरपूर पैसा ते कमवतील त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ सुद्धा होऊ शकते जमीन किंवा मालमत्ते संदर्भातला एखादा व्यवहार सुद्धा होऊ शकतो म्हणजे थोडक्यात काय तर राहूच राशी परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगलं ठरणारे .

२) कन्या रास- राहूच राशी परिवर्तन शी बदल कन्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा ठरेल या लोकांना भागीदारीच्या कामात मोठे यश मिळेल जोडीदारासोबत यांचा चांगलं जमेल धनलाभ सुद्धा होईल त्याचबरोबर नवीन काम सुरू करायचा असेल भागीदारीमध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा हा काय चांगला आहे वैवाहिक जीवन सुद्धा चांगलं राहील आणि लाईफ पार्टनरच्या मदतीने तुम्ही एखादा मोठं काम पूर्ण करू शकाल सगळ्यात महत्त्वाचं अविवाहितांचे लग्न जमतील .

३) कुंभ रास- मीन राशीचा राहू चा प्रवेश कुंभ राशीच्या लोकांना खूप लाभ दे या लोकांना अचानक खूप पैसा मिळू शकतो. हा अनपेक्षित आर्थिक लाभ तुम्हाला आनंद देईल ,तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल .त्याचबरोबर वाणीतून लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. गोड बोलून काम करून घ्या व्यवसायिकांसाठी खूप चांगला काळ आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

या होत्या त्या राशी ज्यांना राहू परिवर्तनाचा फायदा होईल पण संपूर्ण वर्षभर हा फायदा होईल असं नाही तर जेव्हा राहू राशी परिवर्तन करेल ऑक्टोबर मध्ये तेव्हा त्याचे परिणाम तुम्हाला जाणवतील नाराज व्हायची गरज नाही कारण की नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगल जाव असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता.

नवीन वर्षामध्ये कुठलीही एक सेवा करायला ठरवा आणि नित्य नियमाने ती सेवा करा नक्कीच तुम्हाला तुमचं संपूर्ण वर्ष लाभदायी जाईल चांगलं जाईल कारण केलेली सेवा कधीही वाया जात नाही आपण चांगलं कर्म केलं तर त्याचा फळ आपल्याला चांगलंच मिळत आणि म्हणूनच नेहमी चांगल कर्म कराव अस आपल्याला सांगितल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *