दत्त जयंतीला या ठिकाणी ३ दिवे लावा भाग्य उजळेल. जे हवे ते मिळेल. अचानक चमकुन उठेल तुमचे भाग्य.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्र साजरा होत असतो. दत्त जयंतीला दत्त तत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या दृष्टीने हजार पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होण्यास मदत होते. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एक स्वरूप आहे.

दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रचार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेय यांनी भारत भ्रमण केले. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने तुमचं भाग्य उजळेल आणि तुमच्या जीवनात नेहमी सुख समृद्धी टिकून राहील. तुम्हाला फक्त या ठिकाणी तीन दिवे लावायचे आहेत. मग बघा ह्याचा चमत्कार तुम्हाला लगेच जाणवेल चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या ठिकाणी दिवे लावायचे आहेत.

दत्त जयंती साजरी करण्याने शास्त्रात कोणताच विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस आधी श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रकार आहे यालाच श्री गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात. दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आधी कार्यक्रम आयोजन केले जाते. दत्तगुरूंची पूजा धूप दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात.

दत्ताच्या हातातील कमांडलू व जपमाळ हे महादेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र हे विष्णूचे प्रतीक आहे. त्रिशूल डमरू शंकराचे प्रतीक आहे. आजचा जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करावा लागेल.

सहा वाजल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घराच्या आसपास औदुंबराचे झाड किंवा पिंपळाचे झाड किंवा वडाचे झाड असेलच या तीन पैकी तुम्हाला जे कोणते झाड मिळेल तिथे हा उपाय करायचा आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे औदुंबराच झाड असेल तर अति उत्तम होईल. तर तुम्हाला तीन दिवे घ्यायचे आहेत.

तुम्ही दिवे धातूचे घेऊ शकता किंवा मातीचेही घेऊ शकता. तीन दिवे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हणून आपल्याला हे तीन दिवे लावायचे आहेत. आणि ह्या प्रत्येक दिव्यामध्ये एक एक कापूर टाकायचा आहे. किंवा तुम्ही त्या तीन दिव्यांच्या बाजूला एक एक कापूर सुद्धा जाळू शकता. तीन दिवे आणि तीन कापूर तुम्ही जाळायचे आहेत.

सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही झाडाजवळ जायचं आहे. तुम्ही त्या झाडाजवळ गेल्यानंतर त्या झाडाला पाणी घालायचं आहे. फुल व अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि हळदी कुंकू लावायचे आहे. आणि त्यानंतर ते तीन दिवे तुम्ही तिथे लावायचे आहेत. जर तुम्हाला वेळ असेल तर त्या झाडाजवळ बसून तारक मंत्र म्हणू शकता किंवा दत्ताचा नामस्मरण सुद्धा करू शकता.

आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पाणी वाहून हळद-कुंकू लावून अक्षदा अर्पण करून ते तीन दिवे लावायचे आहेत. जर औदुंबराचे झाड असेल, तर तुम्ही त्याला ११प्रदक्षिणा घालायचे आहेत. ही गोष्ट मनापासूनच करा . तुमचं सगळं लक्ष त्या उपायांकडे असलं पाहिजे. मन अगदी स्थिर ठेवायचा आहे.

आणि ज्यावेळी तुम्ही हा उपाय करत असाल, तेव्हा तुमच्या मनात दत्तगुरूंचा विचार असला पाहिजे. लक्ष देऊन हा उपाय करायचा आहे. आणि अवश्य हा उपाय तुम्ही केलाच पाहिजे. तुम्हाला हा उपाय दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्याच्या नंतर करायचा आहे. जे दिवस आहे ते अतिशय प्रभावी दिवस आहेत. आपण ह्या दिवसात जे काही चांगले काम करू चे फळ आपल्याला खूप फलदायी मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *