नमस्कार मित्रांनो.
श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंचे जवळपास सर्वच मंत्र हे शक्तिशाली प्रभावशाली स्वरूपाचे आहेत. मनःशांती, संकटनाश, बाधा नाश, शत्रुनाश, मनोकामनापूर्ती , योग सिद्धी, रोगनाश, आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या समस्यांवर दत्तगुरूंचे वेगवेगळे मंत्र आहेत. आपली समस्या काय आहे त्यानुसार आपण मंत्राची निवड करू शकतो. आणि त्या मंत्राचा जप करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात की कोणता मंत्र म्हणल्याने त्या मंत्राचा फळ काय मिळतं. किती दिवस त्या मंत्राचा जप करावा.
दत्तगुरूंचे वेदमंत्र ,तंत्र मंत्र ,बीज मंत्र ,शाबरी मंत्र ,माला मंत्र, मूलमंत्र ,गायत्री मंत्र, असे अनेक स्वरूपाचे मंत्र आहेत. त्यापैकीच काही साधे सरळ सोपे मंत्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या मंत्रांचा जप केल्याने काय लाभ होतो हे सुद्धा सांगणार आहे. मग तुम्ही तुमच्या समस्येनुसार त्या मंत्राची निवड करू शकता.
दत्तगुरूंचा प्रसिद्ध आणि साधा सरळ सोपा मंत्र तो म्हणजे (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा) या मंत्राचा रोज रात्री झोपताना किमान ११ वेळा तरी जप करावा. हा दत्तगुरूंचा काम्य मंत्र आहे. याचा जप नित्य केल्यास दत्तगुरु आपले रक्षण करतात. त्यानंतरचा मंत्र म्हणजे (श्री गुरुदेव दत्त) हा मंत्र प्रत्येकाने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत रोज किमान ११ वेळा तरी म्हणावा.
अधिक जमत असेल तरीही करणे अतिउत्तम. जास्तीत जास्त तुम्ही रोज १०८ वेळा म्हणजे एक माळ जप याचा करू शकता. या जपा चे याप्रमाणे आहे. हा जप नित्य जपला मुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते. त्यांना पितृदोष याचा त्रास आहे. त्यांनी या मंत्राचा जप अवश्य करावा. या मंत्राच्या नित्य जपाने आपल्या पितरांची पिढे पासून सुटका होते. हा मंत्र तारक मंत्र म्हणून सुद्धा प्रचलित आहे. पीतरांना पिढीतून मुक्ती देण्याबरोबरच दत्तगुरूंच्या साधनेसाठी उत्तम मंत्र आहे
या मंत्राच्या साहाय्याने आपल्या साधनेत प्रचंड वाढ होईल. त्यानंतर एक एक अक्षरी मंत्र आहे. तो म्हणजे (द्रा) रोज हा मंत्र ११ किंवा २१ ,१०८ वेळा म्हणावा. कमीत कमी पाच वेळा तरी जप करावा. हा दत्तगुरूंचा एक अक्षरी मंत्र आहे. दा हे दत्ताचे बीज आहे. हा मंत्र तारक मंत्र आहे. या मंत्राच्या नित्य जपाने दत्तगुरूंची अखंड कृपा आणि सिद्धी सुद्धा प्राप्त होतात. त्यानंतरचा मंत्र आहे.
(ओम दत्तात्रय नमः) हा मंत्र रोज जितका जमेल तितका जपावा. म्हणजे ११ वेळा २१ वेळा किंवा १०८वेळा या मंत्राच्या नित्य जपाने आपल्यावर दत्तगुरूंची कृपा तर होईलच पण त्याचबरोबर हा मंत्र अगदी सोपा साधा असल्याने म्हणण्यास सुलभ असल्याने हा जप आपण जितका करू तितका झपाट्याने आपण समस्या मुक्त होऊ.
आता बघूया असा मंत्र की ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत. सगळ्यांनाच आर्थिक समस्या थोड्याफार प्रमाणात असतात. पण काही जण त्याखाली अगदी गुदमरून जातात. त्यांनी तर या मंत्राचा जप अवश्य करावा. तो मंत्र याप्रमाणे आहे. (ओम नमो भगवते दत्तात्रेय नमः) हा मंत्र रोज ११ वेळा तरी वेळा सुद्धा म्हणू शकता किंवा १०८ वेळा सुद्धा म्हणू शकता.
रोज एक माळ जप कराल तर नक्कीच शीघ्र फळप्राप्ती होईल. या दत्तगुरूंच्या मंत्रजापाने शीघ्रफलप्राप्ती होतेच पण त्याबरोबर या दत्त मंत्राच्या जपाने आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात. पैशांच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मदत होते. हमखास आर्थिक अडचणी नष्ट करणारा हा मंत्र आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.