आज देवघरात ठेवा ही १ वस्तू कुलदेव खंडोबाची कृपा कायम आपल्यावर राहील.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आजपासून देव दिवाळी सुरू होत आहे. देव दिवाळी म्हणजे मल्हारी मार्तंडाचे षड रात्रोत्सव सुरू होत आहेत. जेजुरीचे जे खंडोबा आहेत खंडेराया आहेत त्यांचे नवरात्रोत्सव सुरू होत आहेत. पण हे नवरात्र सहा दिवसांचे असतात. देवीचे नवरात्र झाल्यावर दसरा असतो. तसेच हे खंडेरायाचे नवरात्र संपल्यानंतर शेवटच्या दिवशी सहाव्या दिवशी चंपाषष्ठी साजरी केली जाते.

खंडोबा हे आपले कुलदैवत आहे. जसा आपण देवीच्या नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी खूप काही करतो. पूजा पाठ करतो उपवास करतो तसेच खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात. पण आज फक्त आपल्याला देवघरात एक वस्तू ठेवायचे आहे तिच्यामुळे खंडोबा देव आपल्यावर प्रसन्न होईल. आणि त्यांची कृपा आपल्यावर कायम राहील. चला तर मग जाणून घेऊयात की कोणती वस्तू आपण देवघरात ठेवली पाहिजे.

श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडेरायाचे नवरात्र हे (मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी )सहा दिवस साजरे केले जाते. खंडोबाच्या भाविकांसाठी हा मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देव दीपावली साजरी करून पुढे चंपाषष्टी पर्यंत नवरात्री सन साजरा केला जातो.

चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरतात. तळी भरणे हा एक कुलाचार आहे. या सहा दिवसात खंडोबाला खूप मान दिला जातो. खंडोबाची पालखी काढली जाते. त्यांची सेवा केली जाते. खंडोबाचे वाघे आणि मुरळी जागरण गोंधळ करतात. आज पासून ते चंपाषष्टीपर्यंत खंडोबाचे उपवास करतात.

प्रत्येकाला वाटते की आपल्यावर खंडोबाचा आशीर्वाद असावा. यासाठी प्रत्येक जण प्रयत्नही करतो. आज तुम्हाला अगदी सोपा उपाय करायचा आहे. आणि तो केल्याने श्री खंडोबा तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. आज खूप महत्त्वाचा गुरुवार आहे आणि आज पासून मार्गशीर्ष महिना सुद्धा सुरू होत आहे.

मित्रांनो तुम्हाला एक वाटी खोबरे घ्यायचा आहे खोबऱ्याची वाटी ही शाबूत असली पाहिजे. सुकं खोबरं तुम्हाला घ्यायचा आहे. त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला भंडारा भरायचा आहे. आता भंडारा म्हणजेच हळद. खंडेरायाला हळद खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये पिवळी हळद म्हणजेच भंडारा भरायचा आहे.

आणि त्यानंतर म्हणजेच भंडारा भरल्यानंतर त्यावर एक बेलपत्र ठेवायचा आहे. त्या खोबऱ्यामध्ये अर्धीची हळद भरा त्याच्यावर ते बेलपत्र व्यवस्थित ठेवा. ते बेलपत्र खाली पडणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ११ बेलपत्र सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर ती भंडाऱ्याने भरलेली खोबऱ्याची वाटी ठेवा किंवा खंडोबाचे घट बसवत असाल तर त्या गटासमोर सुद्धा तुम्ही ती वाटी ठेवू शकता.

आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही आज दिवसभरात कधीही करू शकता. फक्त जास्त रात्र करू नका. सकाळपासून ते रात्र होईपर्यंत तुम्ही करू शकता हा उपाय खूप सोपा आहे. तुम्ही आवर्जून केला पाहिजे.

फक्त तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे भंडारा घ्यायचा आहे आणि एक बेलपत्र घ्यायचा आहे. आणि हे सगळं देवघरात ठेवायचा आहे. सहा दिवस ती वाटी आपल्याला देवघरात ठेवायचे आहे. आज पासून ते चंपाषष्ठी पर्यंत आता सहाव्या दिवशी त्या खोबऱ्याचं काय करायचं.
चंपाषष्ठीच्या दिवशी ते जे खोबरं आहे त्यातली हळद म्हणजेच भंडारा काढून घ्यायचा आहे सगळ्यांच्या कपाळावर लावायचा आहे.

आणि जर भंडारा उरला असेल तर तो नदीमध्ये सोडून द्यायचा आहे. आणि त्यानंतर त्या खोबऱ्याचे तुकडे करून सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे. आणि बाकीचे त्या खोबऱ्याचे ४ तुकडे तुमच्या घराच्या ४दिशांना टाकायचे आहेत. यामुळे तुमच्या घरात श्री खंडोबाचा आशीर्वाद टिकून राहील आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *