७ डिसेंबर २०२२ श्री दत्त जयंती पर्यंत करा ७ दिवसांची ही सेवा, सर्व चिंता मिटतील. घरात धन धान्य येईल.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

७ डिसेंबरला आहे दत्त जयंती अर्थात दत्त जयंती पर्यंत तुम्ही काही सेवा केल्या तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. मग कुठली सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे आणि त्याचं नक्की काय फळ मिळणार आहे. चला जाणून घेऊया.

मित्रांनो दत्तगुरु हे मोठे जागृत दैवत आहे. आणि त्यांच्या कृपेचा अनुभव हा प्रत्येक भक्ताला वेळोवेळी आलेलाच आहे. जेव्हा आपण एखाद्या समस्येने त्रस्त होतो, आपल्याला काहीही सुचत नाही. दिशा दिसत नाही आता या संकटातून आपल्याला कोण वाचवेल हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा दत्तगुरु आपल्या मदतीला धावून येतात.

यासाठी आपण सुद्धा नक्कीच थोडीशी साधना थोडीशी उपासना करायलाच हवी. दत्त जयंती दत्त नवरात्र हा काळ तर दत्तगुरूंच्या उपासनेसाठी उत्तम काळ आहे. तेव्हा पृथ्वीवर दत्त तत्त्व जास्त प्रमाणात जागृत असतं. अशा स्थितीमध्ये सात दिवस आधी म्हणजे दत्त जयंती पर्यंत सात दिवसांपर्यंत एक सेवा करायची आहे. ती सेवा याप्रमाणे आहे.

एक मंत्र आहे जो तुम्हाला १०८वेळा दत्त जयंती पर्यंत म्हणायचा आहे. सात दिवस आधी सुरुवात करायची म्हणजे ३० तारखेला दत्त नवरात्र आहे तुम्ही त्या दिवसापासून सुरुवात करू शकता आणि दत्त नवरात्रीपासून तुम्ही सुरुवात केली की दत्त जयंती पर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप रोज १०८वेळा म्हणजे एक माळ जप करायचा आहे.

(ओम नमो भगवते दत्तात्रेय नमः) लक्षात घ्या या मंत्राचा जप तुम्हाला१०८ वेळा करायचा आहे काय होणार आहे या मंत्राचा जप केल्याने या दत्तगुरूंच्या मंत्राचा खरंतर नित्य जप व्हायलाच हवा त्यामुळे फलप्राप्ती शीघ्र होते. पण तुम्हाला नित्य जप करायला जमत नसेल तर कमीत कमी दत्त जयंती पर्यंत सात दिवस आधी तुम्ही ही सेवा सुरू करा. श्रीदत्त हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अवतार आहेत.

आणि म्हणूनच आपण जेव्हा या मंत्राचा जप करतो तेव्हा आर्थिक अडचणी पैशाच्या समस्या होण्यासाठी हा दत्त मंत्र आपल्याला मदत करतो. आर्थिक अडचणी नष्ट होतात. तुम्हाला त्यासाठी भक्ती भावाने १०८ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. च्या कुठल्याही प्रकारच्या आर्थिक समस्या असतील जसे एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील किंवा खूप कष्ट करतोय पण त्या प्रमाणात पैसा मिळत नाही.

घरात गरिबी आहे असा कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर सात दिवस ही सेवा तुम्ही करून बघा. भक्ती भावाने करा नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल. आता आपली काही आर्थिकच समस्या असते का असं नाही आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक त्रास असतात. कुणाच्या घरात लग्न होत नाहीये. कोणी घरात चिडचिड करतोय.

अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात कोणी आजारी आहे कितीही औषध पाणी केलं तरीही बरंच होत नाहीये. काही जणांना अशी समस्या असते की सगळं चांगलं आहे तरीही मन बेचैन आहे अस्वस्थ आहे. समजत नाहीये काय करावे. या वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक मानसिक समस्या आर्थिक समस्यांसाठी एक सेवा करू शकता.

सेवा सुद्धा तुम्हाला दत्त जयंती करायचे आहे. तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र अगदी साधा सरळ सोपा आहे. (दत्तात्रेय नमः) फक्त एवढाच मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. आमंत्र्याचा तुम्हाला दर गुरुवारी किंवा रोज करायचा आहे.रोज जमणार नाही तर दत्त जयंती पर्यंत १०८ वेळा करा जसा तुम्हाला जमेल तसा करा.

भक्तीभावाने करा. या मंत्राचा काय फळ मिळणार आहे आपल्याला श्री दत्तगुरु हा तुमचा मंत्र साधा सरळ सोपा म्हणायला सुलभ आहे. या मंत्रामुळे कोणत्याही समस्यांना तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. आपल्याला समस्या असतात आणि त्या समस्या म्हणजे आपल्याच कुठल्यातरी जन्माचे कुकर्म आपल्यापुढे उभे राहतात आणि मग ते कर्म बघून काढल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.

आणि मग अशावेळी जास्तीत जास्त दुःखी होण्यापेक्षा त्या समस्येला धीराने तोंड देण्याची गरज असते. पण तो धीर आणायचा कुठून मग त्याच वेळी साठी हा दत्त मंत्र आहे जो तुम्हाला सगळ्या प्रकारच्या समस्यांपासून तोंड देण्यापासून शक्ती देतो मानसिक बळ देतो. दत्त मंत्राचा जप देखील तुम्ही सात दिवस करू शकता दोन्हीपैकी कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही नित्यनेमाने सात दिवस करा त्याचबरोबर दत्त जयंती निमित्त तुम्ही काही नियम पाळा.

तसंच दत्त नवरात्र मध्ये सुद्धा तुम्ही दत्त बावनी म्हणा दत्त बावनी अतिशय प्रभावी आहे. सात दिवस तुम्ही सलगदत्त बावनी म्हणा. बरोबर तुम्हाला जी काही दत्त सेवा तुम्हाला करता येईल. ती तुम्ही करा. त्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. दत्तगुरु सगळ्याच प्रकारच्या समस्यांवर उपाय करतात. आपल्या जन्म पत्रिकेत काही दोष असेल ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल आपल्या कर्मांचा दोष असेल अशा सगळ्या प्रकारच्या दोषांवर दत्तगुरु आपल्या भक्तांना तारून नेतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *