चालताना चप्पल तुटणे काय अर्थ? हे चिन्ह देतात शुभ-अशुभ संकेत.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

घरातून बाहेर पडताना चप्पल तुटणे, प्राणी दिसणे किंवा मुंग्यांची रांग दिसने. भरलेल्या पक्ष्यांचे येणे आणि दिसणे या सगळ्यांचे वेगळे महत्त्व आहे त्याचे शास्त्रात शुभ आणि अशुभ संकेत सांगितलेत. आणि जर हे संकेत तुम्ही समजून घेतलेत आणि उपाय केले तर तुम्ही तुमचे दुर्दैव बऱ्याच अंशी टाळू शकता.

पण ही शुभ आणि अशुभ चिन्हे कोणती. त्याचबरोबर अशुभ चिन्हे टाळण्याचे मार्ग कोणते. ते आता आपण जाणून घेऊया. ज्याप्रमाणे चप्पल हरवणे तुमच्या भविष्यासाठी वाईट संदेश देत पण मग चप्पल वारंवार तुटण याचे काय संकेत असू शकतात. शास्त्राप्रमाणे शनीचा प्रभाव पायावर असतो. म्हणून चप्पल तुटायला लागली तर समजून घ्या हा शनीचा अशुभ प्रभाव आहे. आणि येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला एक ना एक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

त्यात आर्थिक नुकसान व्यवसायात नुकसान, कुटुंबात कोणीतरी आजारी पडण, अपघात, कोणाची फसवणूक, चोरी इत्यादी कोणत्याही प्रकारे अचानक आर्थिक नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली तर समजाव की शनीची वाईट स्थिती सुरू झालेली आहे. अशा मध्ये पुन्हा पुन्हा तुम्हाला कर्ज घ्याव लागल तर समजाव की परिस्थिती तुम्हाला मानसिक त्रास देईल.

तुम्ही शारीरिक आजाराला ही बळी पडू शूज आणि चप्पल तुटणे हे सुचित करते की तुमचा बाहेर चांगला दिवस जाणार नाही. तुम्ही ज्या कामासाठी जात होता ते काही दिवस पुढे ढकलाव. कारण तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो.

ज्याच्या प्रभावापासून केवळ मानवच तर देवता ही सुटू शकले नाहीत. पण तुम्हाला त्याच्या शिक्षा आधी पात्र बनण्याआधीच शनिदेव तुम्हाला काही संकेत देऊन त्याची माहिती देतात. होय आणि म्हणूनच हे शुभ आणि अशुभ संकेत तुम्ही ओळखले पाहिजेत तर अशावेळी शनि देवाचा अशुभ प्रभाव कसा टाळावा.

क्रूर ग्रहाव्यतिरिक्त शनीला न्यायाची देवता देखील मानले जाते. त्यामुळे शनीच्या नाराजगी मुळे काहीही वाईट घडलं म्हणजे तुम्हाला तुमच्या इतर वाईट कर्माचे फळ अशाप्रकारे मिळत असत म्हणून आपल्या कृतीचा विश्लेषण करताना आपल्या चुकांची क्षमा करण्यासाठी शनि देवाची प्रार्थना करावी.

आणि शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी लवकरात लवकर शास्त्रीय उपाय देखील करावेत. तर यामध्ये सर्वात प्रभावी म्हणजे गरीब आणि गरजूंना मदत करावी. आणि शनि देवांचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी शनिवारी एका भांड्यात मोहरीच्या तेलाचे दान करून त्यात तुमचा चेहरा पाहिल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जात.

शिवाय मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा करावी. त्यामुळे शनीच्या अशुभ प्रभावापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तर घरातून बाहेर पडताना जर गाईने तुम्हाला शेपूट मारली तर तुमचा प्रवास आणि दिवस खूप चांगला आहे. कबुतराचा कळप दिसनही शुभ मानला जात. त्याचबरोबर कोणाची अंत्ययात्रा दिसली तर समजून जा तुमच्या बाजूने काही शुभ प्रसंग येतील.

पूजेचा किंवा शंका चा आवाज ऐकू आला तर आनंदी व्हाव. मुंगूस मार्ग ओलांडल्याने देखील शुभ मानलं जात. साधू घराबाहेर दिसल्यास त्यांना नमस्कार करावा हे सुद्धा शुभ मानलं जात. घरामध्ये लाल मुंगी किंवा तिची अंडी दिसणे हे सुद्धा शुभ मानले जाते. घरातून बाहेर पडताना भांड्यात पाणी दिसल तर समजा तुमचा येणारा काळ चांगलाच जाणार आहे.

या उलट तुम्ही घराबाहेर जात असाल आणि कोण ओरडत असेल तर ते अशुभ मानलं जात. जर तुमच्या पायासमोर मेलेला पक्षी पडला तर तेही अशुभ मानले जात. याबरोबरच घराबाहेर पडताना कोणी तुम्हाला विचारल म्हणजेच टोकलं तर ते सुद्धा व अशुभ मानल जात. अस घडल्यास काही वेळ थांबाव घरी बसाव आणि काही वेळाने घराबाहेर जाव. तर मित्रांनो असे तुम्हाला अनुभव आले आहेत का आम्हाला नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *