नमस्कार मित्रांनो.
उंबराच्या झाडाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहितीच आहे. श्री विष्णू यांनी नरसिंह या अवतारात असताना त्यांनी उंबराच्या झाडाला वरदान दिले होते. तसेच स्वामी समर्थ महाराज देखील या उंबराच्या झाडात वास करत असतात. उंबर हे खूप पवित्र झाड मानले जाते. कारण यात श्रीविष्णू आणि श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद आहे. उंबराचा एक फळ भिकाऱ्याला सुद्धा श्रीमंत बनवते.
उंबराच्या झाडाचे पान फुल या झाडाची प्रत्येक गोष्ट आपल्याला राजा बनवू शकते. शक्तिशाली बनवू शकते. मग आज आपण उंबराच्या झाडाचा कसा उपाय करून घ्यायचा आहे हे पाहुयात. मित्रांनो नरसिंह यांनी उंबराच्या झाडाला वरदान दिले होते की या पृथ्वीवरील मानवाच्या सर्व दुःख आणि वेदना दूर करतील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्यावर कायम राहील.
असे वरदान श्रीविष्णूंनी नृसिंह अवतारात असताना उंबराच्या झाडाला दिले होते. आणि तेव्हापासून उंबराचे झाड हे खूप पवित्र मानले जाते. आता पाहूयात उंबराच्या झाडाचे खास उपाय. तुम्हाला एक लाल कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर उंबराच्या दुधापासून स्वस्तिक काढायचा आहे. आणि तो कागद नंतर तुमच्या तिजोरी मध्ये ठेवायचा आहे.
तुम्ही जिथे तुमचं धनधान्य ठेवता तिथे तो कागद ठेवायचा आहे. अजून एक तुम्ही एक भोजपत्र घ्यायचा आहे त्या पत्रावर तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे. काही तुमची इच्छा असेल ती नोकरीसाठी ,पैशांसाठी किंवा ज्ञानासाठी या सगळ्या इच्छा त्या भोजपत्रावर लिहायच्या आहेत. आणि नंतर ते भोजपत्र तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे.
पाहून द्यायचा आहे त्या भोजपतरावर तुम्ही तुमची संकटे अडचणी सुद्धा लिहू शकता. म्हणजे ते दुःख सुद्धा वाहत्या पाण्यासोबत निघून जाईल. तुम्ही अडचणी पासून मुक्त होऊ शकतात. मित्रांनो अजून एक खास उपाय म्हणजे दिवस मावळल्यानंतर एक उंबराचा फळ घरात आणायचा आहे आणि ते फळ आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे जिथे आपण धना ठेवतो तिथे ठेवायचा आहे आणि घरातील जिथे आपण धान्य ठेवतो.
डाळी तांदूळ तिथे एक एक उंबराच फळ ठेवायचा आहे. यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी आकर्षित होते आणि देवीचा आशीर्वाद कायम असतो. आपलं घर नेहमी धनधान्याने भरलेलं असतं. अजून एक महत्त्वाचा उपाय उंबराच एक लाल तुम्हाला लाल चुनरी मध्ये बांधायचा आहे आणि तुमचं दुकान असेल तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकता.
घराच्या तिजोरी मध्ये ठेवू शकता. यामुळे तुम्हाला बरकत येईल आणि तुम्ही नेहमी सुखी आयुष्य जगू शकता. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ते फळ तुम्हाला दर आठ दिवसांनी बदलायचे आहे. आणि पुन्हा ज्या आधी ठिकाणी ठेवले होते तिथेच ठेवायचा आहे. हे सगळे उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले बदल दिसून येतील.
आणि कधीच आर्थिक संकटे तुमच्यावर येणार नाहीत. चा परिवार नेहमी आनंदाने जगेल. घरावर नेहमी श्रीविष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. चमत्कारी गोष्ट ही की जर उंबराच्या झाडाखालून जर एखाद्या व्यक्तीची अंतयात्रा निघत जाईल त्या व्यक्तीला सर्व पापा मधून मुक्त होतो. त्याला स्वर्गवास मिळतो.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.