अंघोळ करताना म्हणा २ शब्द, आजारपण दूर पळेल.. घरात सुख समृद्धी नांदेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आजारपण एकदा मागे लागली की मनुष्य बेजार आणि हैराण होऊन जातो. आणि म्हणूनच आजारपण मागे लागू नयेत यासाठी तुम्हाला आंघोळ करताना दोन शब्द म्हणायचे आहेत. काय आहेत ते दोन शब्द, त्यांचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होणार आहे. काय आहे हे सगळ चला जाणून घेऊया.

उत्तम आरोग्य आणि सुंदर शरीरासाठी रोज स्नान करणे आवश्यक जे लोक रोज स्नान करतात.त्यांना आरोग्य आणि धर्माच्या दृष्टीने सुद्धा अनेक फायदे होतात. तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगायच असेल तर सगळ्यात पहिली अट आहे की तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठल पाहिजे, आणि आंघोळ सुद्धा सूर्योदयाच्या आधीच करायला हवी.

सूर्योदय झाल्यानंतर उशिरा तुम्ही आंघोळ केली तर नक्कीच त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो यात काही शंकाच नाही. म्हणून सूर्य उगवायच्या आधी उठा आणि लवकर उठून आंघोळ करा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम जाणवेल. आरोग्याच्या दृष्टीने आणि मन तर प्रसन्न राहील यात काही शंकाच नाही.

पण हे सगळ करत असताना आंघोळ करताना सुद्धा तुम्हाला काही गोष्टीच पालन करायच आहे. प्राचीन काळी विद्वान आणि ऋषीमुनी सुद्धा सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचे. स्नाना नंतर सूर्याला जल अर्पण करायचे त्याला आपण अर्घ्य देणे असे म्हणतो. यामुळे सुद्धा आपला सूर्यग्रह बलवान होतो. तुमच्या जन्म कुंडलीत जर सूर्य कमकुवत असेल तर तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसत नाही.

जर तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ केली आणि सूर्याला जल अर्पण केल तर तुम्हाला दिसेल की तुम्ही करिअरमध्ये उच्च पदावर जाऊन पोहोचत आहात. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती दिसेल. या उपायाने तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा सुद्धा होते. तर स्नान करताना तुम्हाला काय करायच आहे. एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्यामुळे नक्कीच तुमची आंघोळ ही वेगळी होणार आहे.

रोज आंघोळ करण्यापूर्वी जी पाण्याची बादली तुम्ही भरायला आंघोळीसाठी त्या पाण्यामध्ये तर्जनीच्या मदतीने तुम्हाला त्रिकोण चिन्ह बनवायचे आणि त्यानंतर त्या त्रिकोणाच्या चिन्हांमध्ये ह्रीम हा मंत्र लिहायचा आहे. अस केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

स्नान करताना तुम्ही एका मंत्राचा जपही करायचा आहे. आणि तो मंत्र याप्रमाणे आहे गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती| नर्मदे सिंधू कावेरी जले स्मिन सन्निधिं कुरु|| या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र आम्ही देत आहोत. म्हणायला अगदी सोपा आहे. साधा आहे. या मंत्राचा अर्थ समजून घ्या. म्हणजे म्हणण्याला अजून बळ प्राप्त होईल. या मंत्राचा अर्थ असा आहे.

हे गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे आणि सिंधू कावेरी तुम्ही सर्व नद्या माझ्या या स्नानाच्या पाण्यामध्ये या. या प्रकारे आपण या पवित्र नद्यांना आवाहन केल्यामुळे त्या नद्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपलं स्नान आरोग्यदायी होत. केलेल्या स्नानातून सकारात्मकता आपल्या मनामध्ये शिरते आणि नक्कीच आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होते. जेव्हा तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होते तेव्हा बघा तुम्ही दिवस किती सुंदर जाईल.

एक दिवस तरी सकाळी लवकर उठून या पद्धतीने स्थान करून बघा आणि मग तुमच्या इतर दिवसांच्या मानाने तो दिवस कसा जातो ते बघा. तुमच्या मनात कसे भाव येतात. नकारात्मकता असते की सकारात्मकता असते हे तुम्ही स्वतः करून बघा. कुठलीही गोष्ट नाकारण्याआधी एकदा करून बघावी नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला दिसेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *