सिंदूर मध्ये ठेवा ही एक वर वस्तू अखंड सौभाग्यवती भव: आशीर्वाद मिळेल.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

महर्षी यांनी सिंदूर चे महत्व ( सिंधुराम सौभाग्यवर्धनम ) असे सांगितले आहे. मित्रांनो सिंदूर हे एक सौभाग्यवतीच लेणं असतं. प्रत्येक स्त्री तिच्या सौभाग्याचे रक्षण करते. सिंदूर घरातील बाधा सुद्धा दूर करतात. सिंदूर लावल्यानंतर स्त्रियांचा सौंदर्य अधिकच खुलत. सिंदूर लावल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर तेज येतं. सिंदूर फक्त सौभाग्याचा रक्षण करत नाही तर त्याचे अजून बरेच फायदे देखील आहेत.

सिंदूर लावल्यानंतर स्त्रियांचे मन स्थिर राहते. सिंदूर लावल्यानंतर त्यांच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि सोबतच घरातील दोष सुद्धा काढून टाकते. तुम्हाला जर तुमच्या सौभाग्याचा दीर्घायुष्य वाढवायचा असेल आणि घरात सुख शांती सोबतच धनलाभ हवा असेल तर सिंदूरच्या डबी मध्ये किंवा तुम्ही सिंदूर ज्या बॉक्समध्ये ठेवत असाल त्यात फक्त एक रुपयाचं नाणं ठेवा.

यामुळे देवी पार्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो. आणि तुमच्या सौभाग्याचा रक्षण सुद्धा देवी पार्वती करते. सिंदूर मध्ये एक रुपयाचं नाणं ठेवणं खूप शुभ मानले जाते. विशेष म्हणजे देवी पार्वती कडून तुम्हाला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद प्राप्त होतो. वैवाहिक जीवन सुखाचे होते. नवरा बायकोतील प्रेम सुद्धा घट्ट होते. म्हणून सिंदूर मध्ये एक रुपयाचं नाणं अवश्य ठेवा.

सौभाग्यवती स्त्रियांसाठी देवी कामाख्याचे सिंदूर खूप शुभ मानले जाते. विशेष मंत्रांचा जप करून देवीचे सिंदूर बनवलेले असते. म्हणून जर तुम्ही देविका मक्याच्या दर्शनाला जात असाल तर तेथून देवीचे सिंदूर अवश्य आणा. हे सिंदूर खूप चमत्कार असते. जर कामाख्या देवीचे सिंदूर एखादी स्त्री लावते तर तिच्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहते. आणि घरात देवीचा आशीर्वाद कायम राहतो.

सिंदूर लावण्या बाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी- एखाद्या सणाला किंवा एखाद्या कार्यक्रमातला जर नवऱ्याने बायकोच्या भांग मध्ये सिंदूर भरले तर हे खूप शुभ मानले जाते. आणि त्यांचे प्रेम अजून वाढते. स्त्रियांनी सिंदूर लावताना नेहमी नवऱ्याच्या सुखाचा व दीर्घायुष्याचा विचार करावा ज्याने नवऱ्याचे भाग्य खुलते. सिंदूर नेहमी तुमच्या स्वतःच्या किंवा नवऱ्याच्या पैशानेच खरेदी करा.

विवाहित स्त्रीला जर कोणी उपहार मध्ये सिंदूर दिले तर त्यांनी ते सिंदूर लावू नये. कारण हे खूप अशुभ मानले जाते. तुमचं सिंदूर कधीही कोणाला लावायला देऊ नका. व कोणाकडून घेऊ पण नका. असं केल्याने दांपत्य जीवनात क्लेश निर्माण होतो. जी स्त्री सिंदूर तिच्या केसात लपवत असेल. तर तिच्या नवऱ्याला समाजात प्रतिष्ठा मिळत नाही.

तिचा नवरा नेहमी मागेच राहतो. व त्याला यश सुद्धा प्राप्त होत नाही. यामुळे सिंदूर नेहमी लांब व समोरच लावावा. यामुळे नवऱ्याचा भाग्य उजळून निघेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या अनोळखी स्त्रीकडून म्हणजेच पार्लर मधून तिथल्या स्त्रीकडून सिंदूर लावून घेत असाल तर ही खूप अशुभ गोष्ट आहे.

म्हणून कधीच कोणाकडून सिंदूर लावून घेऊ नका. आणि सिंदूर कधीच कोणासमोर लावू नका. कारण तुम्ही जर सिंदूर दुसऱ्यांसमोर लावत असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनाला दृष्ट लागू शकते. म्हणून सिंदूर नेहमी एकांतात लावले पाहिजे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *