दिव्याची जळणारी अर्धी व पूर्ण वात कोणता संकेत देते. हे भयंकर संकट समजून घेऊन टाळू शकतात.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

मंडळी दिवा लावणे खूप पवित्र गोष्ट आहे. अंधकार दूर करून सगळीकडे प्रकाशमय करणारे साधन म्हणजे दिवा. एका छोट्या दिव्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आज आपण जाणून घेणार आहोत की दिवा लावण्याचे किती फायदे आहेत व दिवा कुठे लावला पाहिजे. कोणत्या दिशेला लावल्याने प्रगती करू शकाल आणि जीवनातील बाधा समाप्त होतील. चला तर मग जाणून घेऊया दिव्यातील जळणारी वात आपल्याला कोणता संकेत देते.

मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की घरातील देव्हाऱ्यात रोज दिवा लावला पाहिजे. हा क्रम खंडित होऊ देऊ नका. अन्यथा घरात विपरीत परिणाम होऊ शकते. नकारात्मक ऊर्जा घरात वास करू शकते. घरातल्या करत्या व्यक्तीवर संकटे येऊ शकतात. म्हणून रोज देवघरात दिवा लावा आणि नमस्कार करा.

यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर निघून जाते‌ आणि घरात देवांचा आशीर्वाद कायम राहतो. दिवा लावताना नेहमी वितीचा समोरचा छोटा भाग पेटवला पाहिजे. असा दिवा पेटवला तरच घरात देवांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील वाईट ऊर्जा बाहेर निघून जाते. आणि घर आनंदमय होते. पण बरेच लोक असा विचार करता जर आपण जास्त वात पेटवली तर उजेड मोठा पडेल. पण ही चुकीची गोष्ट आहे.

तुम्ही जर दिव्यातील अर्धीवात जाळली तर घरात विपरीत घडेल म्हणून दिवा लावताना हे लक्षात ठेवा. काही संध्याकाळची वेळही हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते म्हणून जे लोक संध्याकाळच्या वेळी घरात तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावत नाही.त्यांच्या घरात कायम संकटे येतच असतात. घरात सतत भांडणे होतात. घरातील मुल सुद्धा त्यांच्या पालकांच्या विरोधात जातात.

अशा प्रकारे घरातील वातावरण दुःखाने भरून जाते. मित्रांनो संध्याकाळची वेळ खूप प्रबळ असते या वेळेत नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाहत असते. आणि घरात प्रवेश करते. ज्यावेळी सूर्यास्त होतो त्यावेळी नकारात्मक ऊर्जा व वाईट शक्ती घरात मोठ्या संख्येने येते म्हणून संध्याकाळी देवासमोर दिवा लावला पाहिजे. ज्या घरात लोक नेहमी आजारी राहतात.

उपचार घेऊनही आजार बरा होत नाही. अडचणींमध्ये वाढच होते. आर्थिक संकटांना सामना करावा लागतो. तर अशावेळी तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी देवघरात शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा पूर्व दिशेला लावला पाहिजे. ही गोष्ट तुम्ही रोज करा. तरच तुम्हाला याच फळ मिळेल. अन्यथा घरात वाईट परिणाम जास्त वेळ टिकेल.

धनलाभासाठी तुम्ही संध्याकाळी उत्तर दिशेला दिवा लावावा. महत्वाची गोष्ट ही ज्यावेळी तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावता त्या दिव्यातून निघणारी ऊर्जा घरातील वातावरण सुखमय बनवते आणि घरातील दोष बाहेर काढते. म्हणून संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावलाच पाहिजे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *