फूड ऍस्ट्रोलॉजी सांगेल शरीरासाठी पोषक आहार..! राशीनुसार निवडा आपली आहार शैली.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

आपले शरीर पंच महाभूतांनी बनले आहे. त्यावर आपल्या राशीचा आणि ग्रहांचाही प्रभाव आहे. त्यानुसार शरीराचे हित कशात आहे जाणून घेऊया. मंडळी तुम्हाला माहिती आहे का? ज्योतिष शास्त्र हे केवळ आपल भूतकाळ आणि भविष्य सांगत नाही तर ज्योतिष शास्त्रात आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक बाबींचा समावेश असतो.

अनेक समस्यांवर उपायही दिले आहेत. तुमच्या राहणीमानापासून ते आहार शैलीपर्यंत सर्व गोष्टींचा ग्रहमानावर परिणाम होत असतो. त्यात तुम्ही सेवन करत असलेले अन्न तुमच्या ग्रहस्थितीवर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम पडत असतात. म्हणून तुम्हाला फूड एस्ट्रोलॉजी अर्थात खाद्य ज्योतिष शास्त्र याबद्दल ही माहिती ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशी विशिष्ट प्रकारच्या खाद्य सवयीन विषयी जोडलेली असते.

त्या सवयींचा तुमच्या जीवनशैलीवर प्रभाव पडत असतो. आपण सेवन करत असलेल्या अन्नाचा आपल्यावर योग्य प्रभाव पडावा यासाठी ज्योतिष शास्त्राचा घेतलेला आधार यालाच खाद्य ज्योतिषशास्त्र असेही म्हणतात. कोणत्या राशीच्या लोकांनी काय खाल्ले पाहिजे. आणि काय नाही यासंबंधी सर्व माहिती खाद्य ज्योतिष शास्त्रात दिलेली असते.

भोजनाचे प्रकार आणि प्रभाव कोणते ? अन्न ,वस्त्र ,निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. परंतु हवा पाणी आणि भोजन याशिवाय आपण जिवंत राहू शकणार नाही. या तीन गोष्टींपैकी हवा आणि पाणी मिळण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत नाही मात्र अन्न मिळविण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते. तरच आपण आपल्या आवडीचे अन्न निवडू शकतो.

श्रीमंत भगवत गीतेत भोजनाचे तीन प्रकार सांगितले आहेत. १) सात्विक २) राजस ३) तामस या तीनही प्रकारच्या भोजनांची विस्तृत माहिती आपण पौराणिक कथांमधून मिळवू शकतो. खाद्य ज्योतिष ज्योतिष शास्त्राने सुद्धा अन्न वर्ग करताना या तीन श्रेणीच्या अंतर्गत विभागणी केली आहे. शाकाहारी जेवणात सात्विक गुण असतात तर मांसाहारी जेवणात तामस गुण असतात. आणि ज्यांच्या जीवनात दोन्ही प्रकारचा समावेश असतो.

त्याला आहारात राजस गुण प्राप्त होतात. त्याला आपण तब्येतीत खाणे असेही म्हणतो. सात्विक आहार तुम्हाला अध्यात्म आणि शांतीमय जीवनाकडे नेईल. तर तामस आहार तुमची वृत्ती हिंसक बनवेल. राजस आहार ऐशो आरामासाठी प्रवृत्त करेल. अर्थात तुमच्या जन्मस्थान आणि भौगोलिक गोष्टी यावरही आहार रचना अवलंबून असते.

परंतु आपल्या प्रकृतीला मानवेल अशा पद्धतीने आहार शैलीत बदल केला पाहिजे. तर आता राशीनुसार तुम्ही आपली आहार शैली कशी निवडाल ते पाहूयात. ज्यामुळे तुम्ही तुमच्या राशीला अनुकूल आणि प्रभावी ठरणारे अन्न देऊ शकाल.

१) मेष- मसूर डाळ, बेसन, गहू यांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. २) वृषभ- दही दूध तांदूळ यापासून बनलेले पदार्थ खावेत. ३) मिथुन- प्रकारच्या डाळी ,गहू हिरवा भाजीपाला खावा. ४) कर्क- दही, दूध, तूप, तांदूळ अशा पांढऱ्या पदार्थांचे अधिक सेवन करावे.

५) सिंह- तुर ,दूध डाळींचा आहारात समावेश करावा.
६) कन्या- मुग, गहू, हिरव्या पालेभाज्या फलदायी आहेत.
७) तूळ- तांदूळ, दूध, दही यांपासून बनलेले पांढरे पदार्थ यांचा आहारात समावेश असावा. ८) वृश्चिक- मसूर, बेसन, गहू यांचा आहारात अधिक समावेश करा.

९) धनु- तुर, चणाडाळ, गुळ, पदार्थ लाभदायक.
१०) मकर- डाळीचा आपल्या आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. ११) कुंभ- ठराविक प्रमाणात तळलेले पदार्थ खावेत तसेच डाळीचा ही जेवणात समावेश करावा. १२) मीन- तूर आणि चणाडाळ लाभदायक. तुम्ही तुमच्या राशीला अनुकूल आणि प्रभावी ठरणारे अन्न जेवण करताय का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *