तुळशी भोवती ठेवू नका या गोष्टी सकारात्मकतेला येईल अडथळा. तुम्ही तर करत नाही ना या चुका.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुळशीचे रोप पवित्र मानले जाते. परंतु ते लावण्यासाठी काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार त्या रूपाच्या सभोवती अन्य गोष्टी ठेवू नयेत. कोणत्या ते जाणून घेऊया. भारतीय संस्कृती तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. दैवी गुणधर्मा सोबतच ही वनस्पती औषधी गुणांनी ही परिपूर्ण आहे. त्यात अनेक अलौकिक आर्वेदिक गुण धर्म आहेत.

सनातन धर्मात तुळशीला अतिशय महत्त्व असल्याने देवळात खिडकीत दारात तुळशीचे रोप हमखास आढळते. पण ती नुसती लावून चालणार नाही बर का. तर त्याच्याशी संबंधित गोष्टींची माहिती असणे ही आवश्यक आहे. तुळशीच्या रोपा जवळ भगवान शिव गणेशाची मूर्ती असू नये. असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. शंकराला बेल प्रिय असतो. फक्त वैकुंठ चतुर्दशीलाच पिंडीवर तुळशी वाहिली जाते.

आणि गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय असतात. त्यालाही भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुळशी वाहिली जाते. एरवी नाही. म्हणून तुळशी जवळ या दोन्ही देवतांच्या प्रतिमा ठेऊ नये. तुळशी नेहमी कुंडीत किंवा तुळशी वृंदावनात लावली जाते. इतर रोपांप्रमाणे तिची जमिनीत लागवड करून चालत नाही. कुंडीत तिची वाड भरभर होते.

कारण तुळशीला खूप पाणी घालूनही चालत नाही. थोड्याशा जागेत योग्य मशागत आणि देखरेख मिळाली की ती चांगली फुलते. शिवाय तुळस ही इतर रोपांच्या तुलनेत अधिक पवित्र मानली जाते. त्यामुळे तिचे स्थानही पवित्र असावे या हेतूने तिची जमिनीत लागवड केली जात नाही. तुळशीचे रोप मोकळे आणि स्वच्छ ठिकाणी लावावे. असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. तुळशीभोवती अंधार असू नये.

म्हणून सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावण्याचा आपल्याकडे संस्कार आहेत. तुळस ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आहे. तिच्याजवळ लावलेल्या दिल्यामुळे तो प्रकाश प्रवर्तित होऊन त्या घराला मिळतो. तुळशीचे रोप उंचावर लावू नये. तुळशीला पाणी घालता यावे तिची देखभाल करता यावी आणि तिचे सानिध्य प्रभावी या हेतूने उंचावर किंवा लटकवलेली नसावी. तुळशीला माता असे आपण समजतो.

त्यामुळे तिला मानाची जागा देणे हे तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी तुळस नेहमी अंगणात गॅलरीत किंवा दाराजवळ असावी. जेणेकरून दारा वाटे येणारे वारे तुळशीच्या सानिध्यात येऊन वातावरण शुद्ध करते आणि त्याचे आरोग्यदायींल्य आपल्याला प्राप्त होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *