मीन रास- नोव्हेंबर महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. तसेच मीन रास चिंतामुक्तीसाठी करा हा उपाय.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

नोव्हेंबर २०२२ मीन राशीसाठी कसा असणार आहे आणि या महिन्यात ज्या काही थोड्याफार अडचणी येणार आहेत. त्यावर उपाय काय आहे. चला यावर सविस्तर जाणून घेऊयात. आणि त्यावर उपाय नक्की करा. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. या काळात तुम्हाला तुमचे टार्गेट वेळेवर पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील.

नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाचा समतोल साधण्यात काही अडचणी येऊ शकतात. जमीन आणि इमारतीच्या वादात तुम्हाला कोर्टकचेरीच्या फेऱ्याही माराव्या लागू शकतात. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात केवळ तुमचंच नाही तर कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सुद्धा आरोग्य चिंतेचे बनू शकते. या महिन्यात जुनाट आजार उद्भवण्याचा समूह आहे. सावधगिरी बाळगा.

व्यवसाय करणाऱ्यांनी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यापूर्वी त्यांच्या हितचिंतकांचे मत नक्की घ्या. महिन्याच्या मध्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
पत्रकारिता संशोधन इत्यादी क्षेत्रात गुंतलेल्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. त्याचबरोबर या महिन्यात तुम्हाला तुमचा वेळ आणि तुमची शक्ती याचा व्यवस्थित उपयोग करावा लागेल.

दरम्यान कोणत्याही वादापासून स्वतःला दूर ठेवा अन्यथा अपयश येऊ शकत. महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोघांच्या सल्ल्याचा उपयोग करून घ्यावा लागेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर इतरांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याची चूक करू नका. आणि पैशांची संबंधित व्यवहार मिटवून पुढे जा.

यादरम्यान वाहन जपून चालवा अन्यथा इजा होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांच्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला काळजीपूर्वक विचार करूनच पाऊल पुढे टाकावे लागतील. जर तुम्ही एखाद्या समोर तुमच प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर थोड थांबा आत्ताच घाई करू नका. योग्य वेळेची वाट पहा.

जर तुम्ही आधीच प्रेम संबंधात असाल तर तुमच्या जोडीदारांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. नोव्हेंबरच्या मध्यात जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. जे वादा ऐवजी संवादातून दूर करण्याचा प्रयत्न करा. आता मी मगाशी म्हटल तस ज्या काही अडचणी नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आहेत. एक उपाय केला तर तुमच्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा होणार आहे.

उपाय म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये नारायण कवचचा पाठ करायचा आहे. तुम्हाला म्हणता येत नसेल तर कमीत कमी ऐका. दोन-तीन वेळा ऐकल तर ते पाठ सुद्धा होईल. त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाची उपासना जर तुम्ही या नोव्हेंबर महिन्यामध्ये तर लक्ष्मीनारायणाची कृपा तुमच्यावर होणार आहे. आणि सगळेच अडथळे दूर होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *