या ६ राशी नोव्हेंबर मध्ये बनतील महा करोडपती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नोव्हेंबर मध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती ह्या सहा राशींसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये ग्रह नक्षत्रामध्ये अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे. ग्रहांची बदलती स्थिती राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा मार्गी होतो किंवा एखादा ग्रह वक्री होतो. त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येत असतो.

ग्रहांच्या प्रत्येक हालचालीचा व्यक्तीच्या जीवनावर शुभ अथवा अशुभ प्रभाव दिसून येत असतो. ज्योतिषानुसार ग्रहांच्या स्थितीचा व्यक्तीच्या जीवनावर राशीनुसार वेगवेगळ्या परिणाम दिसून येत असतो. दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी बुध ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करणार असून ३० ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रह वक्री होणार आहेत. ग्रहांच्या या स्थितीचा शुभ प्रभाव नोव्हेंबर पासून दिसून येण्यास सुरुवात होईल.

नोव्हेंबर मध्ये काळ या राशींसाठी अतिशय अनुकूल बनत आहे. या सहा राशींच्या जीवनातील वाईट आणि दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून नोव्हेंबर पासून जीवनाला एक नवी आणि सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. नोव्हेंबर २०२२ पासून जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मागील काळामध्ये चालू असणारी नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.

आता ग्रहनक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत असून ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश या सहा राशींच्या लोकांना आता प्राप्त होणार आहे. आता नशीब देखील यांना भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना यांच्यासाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी मंगळ ग्रहाचे वक्री होणे अतिशय लाभकारी ठरणार असून नोव्हेंबर मध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती अतिशय उत्तम ठरणार आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला लाभणार आहे.

या काळामध्ये मंगळाची कृपा आपल्या जीवनावर बसणार असल्यामुळे आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनामध्ये एक नवीन प्रेरणा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्याच प्रेरणेला आधार म्हणून जीवनाचा प्रवास आपण सुरू करणार आहात. आता काही नवीन कामाची सुरुवात किंवा काही नवीन योजना बनवून व्यवसायामध्ये आपण चांगला नफा प्राप्त करून घेणार आहात.

नोकरीसाठी सुद्धा येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. नोव्हेंबर मध्ये नोकरीसाठी शुभकाळ आपल्यासाठी ठरणार आहे. नोव्हेंबर मध्ये ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि नशिबाची साथ या काळामध्ये लाभणार असल्यामुळे जर या काळात आपण चांगले प्रयत्न केले चांगली मेहनत घेतली तर मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी नोव्हेंबर महिना अतिशय लाभदायक ठरणार आहे. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करावीच लागणार आहे. जर आपण चांगले प्रयत्न कराल तर निश्चित मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. मित्रांनो आता आपल्याला आळसाला दूर सारून नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात करावी लागणार आहे.

कामांमध्ये स्वतःला समर्पित करावे लागणार आहे. तर मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. जेष्ठ व्यक्तींसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. संततीविषयी आपल्या मनामध्ये ज्या काही कल्पना आहेत. आपण ज्या कल्पना केल्या आहेत. किंवा आपल्या मनामध्ये असणाऱ्या शुभ भावना आता फलित होणार आहेत. संततीच्या सुखामध्ये वाढ होणार आहे. नोकरीसाठी योग अनुकूल ठरणार आहेत. सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत.

अथवा खाजगी क्षेत्रांमध्ये मनासारखी नोकरी या काळामध्ये मिळू शकते. मानसन्मान यश कीर्तीमध्ये वाढ होईल. व्यवसायामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनासाठी सुद्धा काळ सुंदर ठरणार आहे. थोड्या बहुत अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग देखील निघणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. नोवेंबर महिना सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. फक्त या काळामध्ये आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक असेल.

कर्क राशि- कर्क राशि साठी नोव्हेंबर महिना सर्वोत्कृष्ट ठरू शकतो. आपल्या अनेक दिवसांच्या आपल्या मनामध्ये असणाऱ्या कल्पना आपल्या महत्त्वकांक्षात या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात. करियर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. जर आपण या काळामध्ये चांगली मेहनत घ्याल तर व्यापाराच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

जीवनामध्ये प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहात. व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला चांगला लाभ नफा प्राप्त होऊ शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मानात वाढ होईल. आता व्यापाराच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार करियर कार्यक्षेत्र आणि नोकरीमध्ये भरगोस यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुख शांतीची प्राप्ती होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मानात वाढ होईल. आर्थिक दृष्टीने येणारा काळ अनुकूल ठरणार आहे.

थोडा बहुत ताण या काळामध्ये आपल्याला जाणवू शकतो. पण ईश्वरीय भक्ती मध्ये मन लावल्याने मनाला शांती मिळणार आहे. या काळामध्ये भगवान भोलेनाथाची उपासना आपल्यासाठी अनुकूल ठरू शकते. अध्यात्मिक सुखामध्ये वाढ होईल. पैशांच्या दृष्टीने म्हणजे आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

कन्या राशि- कन्या राशि साठी येणारा काळा अनुकूल ठरणार असून भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे. नोव्हेंबर महिना आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये जर आपण आपले कर्म चांगले ठेवले. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले, आपल्या शब्दावर नियंत्रण ठेवले तर निश्चित आपल्याला चांगले लाभ या काळामध्ये प्राप्त होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तींना क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. मनामध्ये राग जरी आला तरी आपल्याला तोंडाने गोडच बोलावे लागणार आहे.

त्यामुळे परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल. आणि आपल्या मनाची चिडचिड थांबेल. या काळामध्ये ईश्वर भक्ती मध्ये मन लागणे आपल्यासाठी आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. अनेक दिवसापासून आढलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. शेअर मार्केट सारख्या क्षेत्रातून आपल्याला लाभ होऊ शकतो. त्यामुळे मन आनंदित राहील. मित्रांची सुद्धा चांगली मदत या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोस यश संपादन होणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार या काळात जमून येतील.

आपल्या महत्त्वाकांक्षा आणि आपले स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. ज्येष्ठ व्यक्तींना अध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळात होऊ शकते. एखाद्या अध्यात्मिक गुरुचा सहवास आपल्याला लाभू शकतो. त्यामुळे मन शांत आणि आनंदी बनणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींसाठी येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवन सुखाचे असेल.

थोडा बहुत मानसिक त्रास किंवा पैशाविषयी थोडी तंगी जरी निर्माण झाली असली तरी घाबरू नका. लवकरच परिस्थिती नियंत्रणामध्ये येणार आहे. आरोग्याची प्राप्ती देखील या काळामध्ये होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. या काळामध्ये व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. वाईट लोकांची संगत आपल्याला सोडावी लागणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी नोव्हेंबर महिना सर्वच दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला मिळणार आहे‌. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. करिअर मधून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील. कार्यक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये यश आपल्या पदरी पडणार आहे. सामाजिक क्षेत्रात स्थापन केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे.

व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे. या काळामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मदत देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते. जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार असून सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक समस्या आणि आर्थिक अडचणी आता पूर्णपणे दूर होणार आहेत. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *