नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो दिवाळी अगदी तोंडावर आली आहे आणि तुमची दिवाळीची लगबग सुरू असेल. खरेदी करण साफसफाई करण ही सगळी काम चालू असतील. त्याबरोबरच तुम्ही लक्ष्मीपूजनाची तयारी सुद्धा करत असाल. पण लक्ष्मीपूजनाची तयारी करताना आणखीन एक गोष्ट करा. ही गोष्ट तुम्ही लक्ष्मीपूजनामध्ये केली तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही.
दिवाळीच्या दिवसात आपण आपल्या आनंदासाठी पैसे खर्च करतो. त्याचबरोबर पैसे धनधान्य सुबत्ता यावी म्हणून ही पूजा ही करतो. या पूजेमध्ये काही उपचारांची जोड ही असतात. यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते खात्री बाळगा. कुठली आहे ही गोष्ट तर स्फटिकाची श्रीयंत्र बाजारात उपलब्ध आहेत. एक खरेदी करा आणि यावेळी दिवाळीच्या दिवशी पंचामृत आणि गंगाजलाने स्नान घालून उदबत्ती नैवेद्य अर्पण करा.
आणि लक्ष्मी मातेचा जप करा. कमळाच्या बियांपासून बनवलेली दीपमाळ विकत आणा आणि त्याचाही लक्ष्मीपूजनामध्ये उपयोग करा. देवीच्या कृपादृष्टीने पावन झालेली माळ हाती घेऊन नियमित वेळ ठरवून देवीच्या मंत्राचा जप करा. या दिवाळीपासून रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करा. तिन्ही सांजेला देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावा.
गाई वासराची पूजा करा या गोष्टी लक्ष्मी मातेला प्रिय असतात. या सणाला आपण गोमातेची पूजा करतोच. पण शास्त्रानुसार सदा सर्वदा गोमातेची पूजा करणाऱ्यांना रक्षण करणाऱ्यांवर महालक्ष्मी मातेची कृपा होतेच. घर परिवारामध्ये अन्नाचा अनादर करू नका. तुमची जेवढी क्षमता असेल तितकंच अन्न बनवा आणि खा.
ज्या घरामध्ये धन धान्याचा आदर केला जात नाही अन्नाची फेकाफेक केली जाते. अन्न वाया जाते तिथे माता लक्ष्मी कधीच टीकत नाही. तेव्हा मित्रांनो या दिवाळीमध्ये स्पटिकाचे श्री यंत्र विकत आणा आणि त्याची पूजा नक्की करा. त्याचबरोबर या स्त्रियांच्या पूजा करताना श्री मंत्र म्हणा किंवा ऐका.
जर तुम्हाला येत असेल तर महालक्ष्मी अष्टकाचा सुद्धा पाठ करा. दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी अष्टक म्हटलं तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. तो अतिशय प्रभावी सोत्र आहे. हे तुम्हाला अनुभवातूनच लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे दिवाळीच्या दिवशी अर्थात ज्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात.
त्यादिवशी पैसे खर्च करू नका. ज्या वस्तू तुम्हाला आणायचे आहेत त्या आदल्या दिवशी जाणून ठेवा. दिवाळीच्या दिवशी शक्यतो पैसे खर्च करू नका. या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यापैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही केलीत तरीसुद्धा तुम्हाला त्याचा सकारात्मक फायदा मिळेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.